इंटरनॅशनल ट्रेड कौन्सिलने ऑटोमोटिव्ह रिटेलर एशिया पॅसिफिक क्षेत्रातील ‘बिजनेस ऑफ द इयर’ श्रेणीतील मानाचा ‘ग्लोबल अवॉर्ड २०१९’ वासन टोयोटाला देऊन वासन टोयोटाच्या ऑटोमोबाईल विक्री व विक्रीपश्चात सेवेचा सन्मान केला. त्यामुळे वासन टोयोटाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
ग्राहक समाधान, सामाजिक बांधिलकी, व्यवसाय प्रणाली, स्वतंत्रपणे केलेली पाहणी अशा अनेक मापदंडावर आधारित अभ्यासानंतर हा पुरस्कार वासन टोयोटाला देण्यात आला.
नवी दिल्ली येथील इंटरनॅशनल सेंटर येथे संपन्न झालेल्या एका दिमाखदार सोहळ्यात ‘ग्लोबल अवॉर्ड २०१९’ वासन टोयोटाचे सी.ई.ओ. सुरेंद्र पुजारी यांना प्रदान करण्यात आला. वासन टोयोटाच्या या सन्मानामुळे वासन टोयोटा आणि कर्मचाऱ्यांच्या कार्याचं सर्वच क्षेत्रातून कौतूक केलं जातय.
ऍब्झॉर्बन्ट स्वच्छता उत्पादने बनवणाऱ्या नोबेल हायजीनचा आयपीओसाठी अर्ज दाखल
Nashik : नोबेल हायजीन लिमिटेड, आर्थिक वर्ष 2026 मधील प्युअर-प्ले (केवळ विशिष्ट उत्पादनांवर लक्ष...




