देशातील पहिली वाईल्ड लाईफ वाईन ‘काडू’ महाराष्ट्रात दाखल

Jan 3, 2020

वाघांच्या संवर्धन, संरक्षणासाठी वाईनची विशेष शृंखला बाजारपेठेत दाखल

नाशिक: देशातील सर्वात मोठ्या आणि सर्वाधिक पुरस्कार पटकावणाऱ्या सुला विनियार्ड्सतर्फे ‘काडू’ ही भारतातील पहिली वाईल्ड लाईफ वाईनची शृंखला महाराष्ट्रात अवगत केली आहे. देशातील वाघांचे संवर्धन करण्याच्या सामाजिक जाणिवेतून निर्मिती केली जाणारी काडू ही देशातील पहिली अशा प्रकारची वाईन आहे. शाश्वत वाईनरी म्हणून जगभरात ओळख निर्माण करणाऱ्या सुलाच्या कर्नाटक येथील प्रकल्पात ही वाईन निर्मित केली जात आहे. ही वाईनची अनोखी शृंखला महाराष्ट्रात दाखल झाली आहे.वाईन मेकर करण वसानी यांनी उच्च प्रतीच्या वाईन ग्रेप्सची निवड करतांना काडू शृंखलेतील चार वाईन्सची निर्मिती केली आहे. काडू चेनिन ब्लँक ही काहीशी गोडसर चवीची अनुभूती करून देते. तर काडू सौविगनॉन ब्लँक ही वाईन हलक्या सुगंधसह हिरवी मिरपूड आणि उत्कट स्वरूपातील फळाची अनुभूती करून देते. काडू शिराझ रोज ही वाईन लुसलुशीत बेरी फ्लेवरचा आनंद मिळवून देते. तर वाईनच्या बाबत चोखंदळांसाठी काडू कॅबरनेट शिराझ ही वाईन हमखास पसंतीला उतरणारी आहे. काडू च्या शृंखलेतील वाईनच्या बाटलींवर नामांकित डिझाईनर सिमॉन फ्रॉउस यांनी आपल्या खास शैलीतील हस्तकलेतून वाघाचे चित्र साकारले आहे.या वैभवशाली प्राण्यासाठी कर्नाटक हे घरासारखे राहिले आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांत शिकार व अन्य काही कारणांमुळे देशाचा राष्ट्रीय प्राणी नामशेष होण्याच्या परिस्थितीत आला आहे. वाघांचे संरक्षण आणि संवर्धनाच्या दृष्टीने काम हाती घेतांना सुला विनियार्ड्स वाईन क्षेत्रात आमूलाग्र बदल प्रस्थापित केला आहे. काडूच्या प्रत्येक बाटलीच्या विक्रीतून मिळणाऱ्या रकमेतून सुलातर्फे वाघांच्या रक्षणासाठी देणगी दिली जाणार आहे.संकलित होणाऱ्या निधीचा प्रभावीपणे वापर करण्याचा अनुषंगाने सुला विनियार्ड्सतर्फे सॅनच्युरी नेचर फाउंडेशन यांच्या सोबत समन्वय साधला जातो आहे.शृंखलेच्या अनावरण प्रसंगी सुला विनियार्ड्सचे संस्थापक आणि सीईओ राजीव सामंत म्हणाले की व्यावसायिकांना पर्यावरणाप्रति त्यांच्या जबाबदारीची जाणीव होणे अत्यंत आवश्यक आहे. भारतातील वाईन निर्मितीत आघाडीवर असतांना, वाघांच्या संवर्धन कार्यात योगदान देण्याचा निर्धार होता. सर्वोत्कृष्ट वाईन निर्मिती करतांना काडू च्या माध्यमातून वन्यजीव संरक्षणाबाबत आमचे प्रेम व आदरभाव व्यक्त होतो. कर्नाटकनंतर आम्ही या उदात्त उपक्रमाला महाराष्ट्रातही पाठबळ देणार असल्याचे त्यांनी नमूद केले.सॅनच्युरी नेचर फाउंडेशनचे संस्थापक बिट्टू सहगल म्हणाले की सुला विनियार्ड्सतर्फे काडू च्या विक्रीतील काही हिस्सा देण्याचे आश्वासन दिले आहे. आमच्या मड ऑन बुट्स प्रकल्पाला या माध्यमातून बळकटी मिळणार आहे. कर्नाटकातील वन्यजीव संरक्षणासाठी परिश्रम घेणाऱ्या कार्यकर्त्यांना याद्वारे प्रोत्साहन मिळेल. महाराष्ट्रामध्ये काडू च्या अनावरणाचे आम्ही स्वागत करतो, व येथे देखील तळागाळातील परिस्थितीत सकारात्मक बदल घडविण्यात यशस्वी होऊ असा विश्वास व्यक्त करतो. सामाजिक उपक्रमाने प्रेरित या शृंखलेचा आपणही आस्वाद घेऊ शकतात. नजीकच्या दुकानांमध्ये काडूची शृंखला उपलब्ध असून 750 मिलिलिटरची बाटली 625 रुपयांना आणि 375 मिलिलीटरची बाटली 350 रुपयांना महाराष्ट्रात उपलब्ध आहे.

सुला विनियार्ड्स विषयी
बाजारपेठेतील प्रमुख आणि गेल्या दोन दशकांपासून भारतीय वाईनमध्ये लोकप्रिय असलेला, सुला विनियार्ड्स हा भारतीय वाईनचा समृध्द वारसा विशद करत आहे. वाईन टुरिझम ही संकल्पना रुजवितांना वाईन कॅपिटल ऑफ इंडिया म्हणुन नाशिकची ओळख निर्माण करण्यात सुलाचे मोठे योगदान आहे.
2005 मध्ये देशातील पहिले वाईन टेस्टिंग रूम साकारले. तर ‘बियॉंड बाय सुला’ हे पहिले विनियार्ड रिसॉर्ट साकारण्याचा बहुमान सुलाला मिळाला आहे. संस्थापक आणि सीईओ राजीव सामंत यांच्या दूरदृष्टिकोनातून या संकल्पना साकार झाल्या आहेत. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या अन गंगापूर धरण परिसरातील ‘बियॉंड बाय सुला’ पर्यटकांचे लक्ष वेधनारा ठरतो आहे. वाईन टुरिझमला चालना देतांना ‘द सोर्स ऍट सुला’ची उभारणी 2017 ला झाली. देशातील पहिले हेरिटेज वाईनरी रिसॉर्ट होण्याचा बहुमानमिळालेल्या या रिसॉर्टच्या माध्यमातून अनोख्या विनियार्ड जीवनशैलीची अनुभूती घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. जागतिक दर्जाच्या उभारणीमुळे हे ठिकाण जगभरातील पर्यटकांसाठी सुट्यांच्या काळात पसंतीचे ठिकाण बनले आहे. सुला विनियार्ड्स हे जागतिक स्तरावर सर्वाधिक पर्यटक भेट देणाऱ्या वाईनरी पैकी एक असून, दरवर्षी येथे 4 लाखहून अधिक लोक येत असतात. लोक आयुष्यात प्रथमच वाईनची चव घेत असणाऱ्या अव्वल ठिकाणांमध्ये सुलाचा समावेश आहे.

अजून बातम्या वाचा..

ऍब्झॉर्बन्ट स्वच्छता उत्पादने बनवणाऱ्या नोबेल हायजीनचा आयपीओसाठी अर्ज दाखल

Nashik : नोबेल हायजीन लिमिटेड, आर्थिक वर्ष 2026 मधील प्युअर-प्ले (केवळ विशिष्ट उत्पादनांवर लक्ष...

read more
“ऑटोमेशन एक्स्पो 2026′  मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

“ऑटोमेशन एक्स्पो 2026′ मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

ऑटोमेशन एक्स्पो 2026 मध्ये तैवान एक्सलन्स पॅव्हेलियनमध्ये 22 पुरस्कारप्राप्त ब्रँड्स AI एज...

read more
Breaking News