ज्ञानाला कला नैतिकता देते-देशमुख , प्रेमानंद गज्वी यांचा सत्कार

Jan 7, 2020

नाशिक : कला आणि ज्ञानात अनन्य संबंध आहे. ज्ञान अनैतिक असते, कला त्याला नैतिकता देते. म्हणजेच चांगल्या विचारामुळे अणुउर्जेपासून विज बनविता येते, तर वाईट विचारातून विध्वंसक अणुबॉम्बही बनवता येतो, असे प्रतिपादन बडोदा येथील 91 व्या मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले.ते नाशिक येथील प्रज्ञापर्व संस्थेच्यावतीने आयोजित ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी बोलत होते. प्रेमानंद गज्वी यांनी 99 व्या अ. भा. मराठी नाट्य संमेलनात संमेलनाध्यक्ष म्हणून अध्यक्षीय भाषण केले. अशा अध्यक्षीय भाषणावर चर्चा घडल्या पाहिजे. त्यातून समाजात बदल घडू शकतो, असे सांगतांना त्यांनी कला आणि ज्ञानाचे एक नाते आहे, ते बोधी साहित्य अधोरेखित करू इच्छिते असे देशमुख यांनी स्पष्ट केले. शहरातील मु. श. औरंगाबादकर सभागृहात गुरूवारी (दि. 2) प्रज्ञा पर्व संस्थेच्या वतीने ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांचा सत्कार समारंभ व 99 व्या अ. भा. मराठी नाट्य संमेलनातील त्यांचे अध्यक्षीय भाषण : एक आकलन या विषयावर परिसंवाद आयोजित करंण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर लक्ष्मीकांत देशमुख, प्रज्ञा पर्वचे अध्यक्ष वसंतराव रोहम, प्रेमानंद गज्वी, पालीभाषा अभ्यासक नंदकिशोर साळवे, प्रा. गंगाधर आहिरे, विजय होर्शिळ, भगवान हिरे, प्रा. एम. एल नकोशे आदी उपस्थित होते. यावेळी प्रज्ञा पर्वचे अध्यक्ष वसंतराव रोहम यांच्याहस्ते गज्वी यांचा सहृदय सत्कार करण्यात आला.
यावेळी गज्वी यांनी बोलतांना, नाट्य संमेलनाचा अध्यक्ष झालो म्हणून, मित्रांनी सत्कार केला तो आपुलकीचा आणि प्रेमाचा आहे. नुसताच सत्कार नाहीतर, अध्यक्षीय भाषण केले त्यावर परिसंवाद घडवून आणला. बडोदा येथील 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली हा परिसंवाद घडवून आणला, त्याबद्दल ऋणी आहे, असे सांगितले.
झालेल्या परिसंंवादात प्रज्ञा पर्वचे अध्यक्ष वसंत रोहम यांनी, प्रेमानंद गज्वी हे संमेलनाध्यक्ष झाले म्हणून समाजासाठी भूषवाह बाब आहे. आमच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला, ही खरोखरच आनंदाची बाब आहे.तसेच पालीभाषा अभ्यासक नंदकिशोर साळवे यांनी बोलतांंना सांगितले की, गज्वी यांनी मराठी साहित्याला नवनवे शब्द, संकल्पना आणि नवीन विषय दिले. त्यांनी मानवी मनासह समाजाचा मानसशास्त्रीय दृष्टीने शोध घेऊन नाटकांची निर्मिती केली आहे, असे सांगून अभिनेत्याने अ‍ॅथेलिट फिलोसॉफर असायला हवे, असे त्यांचे मत आहे, असे सांगितले. यासह प्रा. गंगाधर आहिरे यांनी बोलतांना, गज्वी यांच्या नाट्यसंमेलनातील लिखित भाषणावर चर्चा होण्याएवजी जर त्यांच्या नाटकांवर चर्चा झाली असती तर, ते आधिक उचित झाले असते, असे सांगून गज्वी यांननीबोध्धी कला म्हणजे ज्ञानदर्शी कला अशी केलेली व्याख्या समर्पक आहे, असे स्पष्ट केले.

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

नाशिक : "सागरा प्राण तळमळला..." या अमर ओळींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली...

read more

तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची ३ ऑगस्ट रोजी शेगाव येथे राज्यस्तरीय बैठक

Nashik : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक रविवार, (दि. ३,...

read more
Breaking News