मुंबई, जून 28, 2019: महिंद्रा अँड महिंद्रा लि. (एमअँडएम लि.) या 20.7 अब्ज डॉलरच्या महिंद्रा समूहाचा भाग असणाऱ्या कंपनीने ग्राहकांना नवा अनुभव देण्यासाठी आज वर्ल्ड ऑफ एसयूव्हीज ही नव्या स्वरूपातील, अत्याधुनिक डीलरशिप सादर केली. ऑटोमोटिव्ह रिटेलमध्ये परिवर्तन आणण्याच्या हेतूने कंपनीने केवळ 6 महिन्यांच्या विक्रमी कालावधीमध्ये 300 हून अधिक वर्ल्ड ऑफ एसयूव्हीजची स्थापना केली आहे.
कंपनीने ब्रँड व ग्राहकांना मिळणारा अनुभव यांना अत्याधुनिक आकार देण्यासाठी भविष्याचा वेध घेतला आणि वर्ल्ड ऑफ एसयूव्हीजची निर्मिती केली. ही नव्या स्वरूपातील डीलरशिप असून, ती डिजिटल तंत्रज्ञानामुळे ग्राहकांना अविस्मरणीय अनुभव देणार आहे. महिंद्राच्या ‘लिव्ह यंग, लिव्ह फ्री’ या महिंद्राच्या डीएनएवर डीलरशिपची नवी संकल्पना आधारित आहे.
वर्ल्ड ऑफ एसयूव्हीज दर्शवताना, महिंद्रा अँड महिंद्रा लि.चे
ऑटोमोटिव्ह डिव्हिजनचे सेल्स व मार्केटिंग प्रमुख वीजय राम नाकरा यांनी सांगितले, “महिंद्रा वर्ल्ड ऑफ एसयूव्हीज ग्राहकांना पूर्णतः वेगळा अनुभव देणार आहे. त्यासाठी, अत्याधुनिक तंत्रज्ञान व ‘लिव्ह यंग लिव्ह फ्री’ या ब्रँडच्या आश्वासनाची पूर्तता करणारे प्रत्यक्षातील वातावरण यांची सांगड घालण्यात आली आहे. सोय, पारदर्शकता व वैयक्तितीकरण करण्याच्या पायावर या संकल्पनेची निर्मिती करण्यात आली आहे.”
नाकरा यांनी स्पष्ट केले, “ग्राहकांना खरेदी व वाहनाची मालकी यांचा नव्याने अनुभव देण्यासाठी आम्ही महिंद्रामध्ये नेहमी तंत्रज्ञानाची मदत घेतली आहे. वैयक्तिक स्वरूपाचा अनुभव देण्यासाठी, आम्ही SYOUV.com, ब्रिंग द शोरूम होम असे या उद्योगातील अनेक पहिलेवहिले उपक्रम सुरू केले आहेत आणि खरेदी-पूर्व टप्प्यात आमच्या वाहनांचे ऑनलाइन बुकिंग करण्यासाठी पोर्टलबरोबर सहयोग केले आहेत. तसेच, सुरळितपणे गाडीची मालकी वागवण्यासाठी आमच्या ग्राहकांसाठी विथ यू हमेशा ही डिजिटल सुविधा उपबल्ध आहे.”
व्हर्च्युअल विश्वाची सांगड फिजिटल (फिजिकल+डिजिटल) सुविधेशी घातल्याने, कार्यक्षम बॅकेंड व्यवस्थेमुळे, वर्ल्ड ऑफ एसयूव्हीजमुळे महिंद्राचा खरेदी-पूर्व व खरेदी या टप्प्यांतील सहभाग अधिक सक्षम झाला आहे.
वर्ल्ड ऑफ एसयूव्हीजविषयी
नवीन रूप व रचनेबरोबरच, वर्ल्ड ऑफ एसयूव्हीज ग्राहकांना उत्तम अनुभव देण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाची मदत घेणार आहे.
अत्याधुनिक, प्रगत डीलरशिप
महिंद्राच्या वर्ल्ड ऑफ एसयूव्हीजमध्ये ग्राहकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या समावेशाबरोबर, डिझाइनचाही विशेष अनुभव घेता येईल व त्यामुळे त्यांना त्यांच्या इच्छेनुसार सहभागी होता येईल. दणकट व मजबूत महिंद्राच्या डीएनएच्या अनुषंगाने डीलरशिपमध्ये बदल करण्यात आले आहेत आणि हे बदल ‘लिव्ह यंग, लिव्ह फ्री’ला अनुसरून आहे.
o उदाहरणार्थ, षटकोन हा डीएनएच्या आकाराचे प्रतिनिधीत्व करतो. त्यामुळे, महिंद्रा एसयूव्हीचा डीएनए व्यक्त करण्यासाठी सर्व डीलरशिपमध्ये वापरलेले षटकोनी डिझाइन समर्पक ठरते.
o वाय-फाय कनेक्टेड, आलीशान कस्टमर लाउंज व री-फ्युएल काउंटर्स ग्राहकांना उत्तम सेवा देतील
o प्रदर्शित केलेल्या प्रत्येक वाहनासाठी व्हीआयपी सेवा
ग्राहकांना अविस्मरणीय अनुभव
o हाय-एंड डिस्प्ले एरिया – अल्तुरास जी4 अशा हाय एंड एसयूव्हीसाठीच्या डिस्प्ले झोनमध्ये देखरेखीसाठी टीव्ही स्क्रीनबरोबर, ग्राहकांना व्हर्च्युअल रिअॅलिटीचा अनुभव मिळेल.
o 86 इंची स्क्रीनवर टॅब्लेट कण्टेण्ट दिसणार असल्यामुळे संपूर्ण कुटुंबाला चांगला अनुभव मिळेल
o एम्बडेड स्क्रीन आणि मिरर्ड डिस्प्लेसह व्हर्च्युअल रिअॅलिटी यामुळे अधिक सोयीस्कर
o वैयक्तिक स्वरूपाची सेवा देण्यासाठी या झोनमध्ये विशेष प्रशिक्षित रिलेशनशिप मॅनेजरही असतील
डिजिटल उपक्रमांद्वारे सेल्स असिस्टन्स – यामुळे पुढील बाबींद्वारे जागा व पेपरलेस संवाद साधणे शक्य होते:
o या उद्योगातील पहिला व्हर्च्युअल रिअॅलिटी अनुभव
o टॅब्लेट्स – ग्राहकांची माहिती घेण्यासाठी व त्यांना प्रत्यक्षिक दाखवण्यासाठी
o जास्तीत जास्त पारदर्शकतेसाठी प्रत्येक वाहनाबरोबर डिजिटल इन्फो पॅनल
o चौकशी हाताळण्यासाठी सेल्स जिन अॅप्लिकेशन
o टेस्ट ड्राइव्ह वाहनांमध्ये पर्सनल व्हॉइस असिस्टन्स
o केव्हाही, कोठेही टेस्ट ड्राइव्ह नियोजित करणे सोपे
o ड्रेस युवरसेल्फ ‘महिंद्रा स्टाइल’ युनिट मर्चंडाइज व अॅक्सेसरीज झोनसाठी
सोशल मीडिया अपडेटसाठी पुढील हॅशटॅग वापरावेत:
#MahindraWorldofSUVs
#FutureOfAutoRetail
महिंद्राविषयी
20.7 अब्ज डॉलर उलाढाल असलेल्या या कंपन्यांच्या समूहाचा नेहमीच प्रयत्न असतो की, ग्रामीण भागात भरभराट झाली पाहिजे, शहरातील जीवनशैली सुधारली पाहिजे आणि व्यवसायाची कार्यक्षमता वाढली पाहिजे. त्यामुळे लोकांना चालना मिळून त्यांचा विकास होईल. समूह भारतात युटिलिटी व्हेइकल्स, माहिती तंत्रज्ञान, वित्तीय सेवा व व्हेकेशन ओनरशिप यामध्ये आघाडीच्या स्थानी आहे व व्हॉल्युमच्या बाबतीत जगातील सर्वात मोठी ट्रॅक्टर कंपनी आहे. कृषिव्यवसाय, एअरोस्पेस, कम्पोनंट्स, सल्ला सेवा, संरक्षण, ऊर्जा, औद्योगिक उपकरणे, लॉजिस्टिक्स, रिअल इस्टेट, स्टील, रिटेल, व्यावसायिक वाहने व दुचाकी व्यवसायांतही अग्रेसर आहे. मुंबईत मुख्यालय असलेल्या महिंद्रामध्ये 100 देशांत अंदाजे 240,000 कर्मचारी आहेत.
महिंद्राविषयी अधिक माहितीसाठी पाहा www.mahindra.com / ट्विटर व फेसबुक: @MahindraRise
मीडियासाठी संपर्क:
मोहन नायर




