सुला विनयार्ड्सतर्फे तेराव्या हंगामातील सुलाफेस्टचे आयोजन येत्या 1, 2 फेब्रुवारी 2020 ला केले आहे. भारतातील सर्वात मोठ्या विनयार्ड म्युझिक फेस्टिव्हलमध्ये सहभागी होताना जगप्रसिद्ध वाईनची चव घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. सुलाचे वीस वर्षे पूर्ती निमित्त यंदाचा महोत्सव आणखी मोठा, उत्कृष्ट असणार आहे. डोंगराळ परिसर वसलेल्या गंगापूर धरणाच्या सानिध्यात होणारा हा महोत्सव नक्कीच अविस्मरणीय ठरणार आहे.
या दोन दिवसीय महोत्सवात जगभरातील संगीतकार रसिकांच्या भेटीस येणार आहेत. भारतात आपले पहिले सादरीकरण करणाऱ्या ब्रिटिश चार्ट टॉपर ‘हॉट चिप’च्या तालावर थिरकण्याचा मोह आवरता येणार नाही. रबने बना दी जोडी, धूम, मुझसे शादी करोगी अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांना संगीत दिलेल्या मर्चंट बंधू अर्थात सलीम-सुलेमान यांची जोडी बॉलिवूड तडका लावतांना विनयार्ड्सच्या खुल्या अँफीथिएटरच्या साक्षीने विक्रमी सादरीकरण करणार आहेत.
उत्कृष्ट अशा सादरीकरणाच्या यादीत अँफिथिएटर व्यासपीठावर भारतातील पहिले वोकल आणि बिटबॉक्सने बनलेले वोकट्रोनिका यासह जॅस, हिप-हॉप शैलीतील इलकट्रोफाझ (फ्रांस), लॅटिन, फंक आणि स्विंग म्युझिक वैशिष्ट्य असलेले रुम्बा दे बोदास (इटली), रेगे आणि डान्सहॉल शैलीत माहीर जाह सन अँड राईझींग टाईड (अमेरिका) अशी काही उल्लेखनीय नावे आहेत.
आणि तुम्ही जर इलेक्ट्रिक टेक्नो बिट्सच्या शोधत असाल तर इलेक्ट्रिक लेन स्टेज तुमचे पुरेपूर मनोरंजन करेल. येथे डॉक्टर द्रु (जर्मनी), जोनस रॅथस्मन (स्वीडन) यांच्या संगीत रचनांवर मनसोक्त थिरण्याची संधी देणार आहे. यांसह बोक्सिया (युके), कोहरा (भारत), सशांती (रशिया) यांसह अनेक आंतरराष्ट्रीयस्तरावरील कलावंत आपल्या नावीन्यपूर्ण संगीत रचना सादर करणार आहेत.
या उत्साहवर्धक वातावरणात सुला विनियार्ड्सच्या लोकप्रिय शृंखलेतील सर्वोत्कृष्ट वाईन्स उपलब्ध असणार आहे. यावर्षीचे आकर्षण ठरणाऱ्या ‘विनोस्फिअर’ येथे वाईन्सची टेस्टिंग, मास्तरक्लासेस, मनोरंजक गेम्स आणि ग्रेप स्टॅम्पिंगचा देखील आनंद लुटता येणार आहे. इंडिया बेलूगा बारटेंडर चॅम्पियनशिप 2019 चा विजेता संचयन जाना याने ‘बेलूगा नोबेल रशियन वोडक्यासह’ साकारलेल्या कॉकटेलचा आनंद घेता येणार आहे. वैविध्यपूर्ण असा कॉकटेलचा मेन्यू सर्वाना भावणारा ठरेल. कॉइनट्रेऊ आणि ‘बॉटनिस्ट जिन’ पासूनचा कॉकटेल फ्रेश व आनंददायक ठरेल. तर बियरसाठी ‘असाही’ आणि ‘बडवार’ चा पर्यायदेखील उपलब्ध असणार आहे.
भव्य महोत्सवात चविष्ट खाद्यपदार्थांचे भरपूर पर्याय उपलब्ध असणार आहेत. यात प्रामुख्याने ‘सोडा बॉटल ओपनरवाला’ यांच्यातर्फे लज्जतदार पदार्थांना सुलच्या चविष्ट वाईनची जोड दिली जाणार आहे. द ऑलिव्ह कॅफे यांच्यातर्फे पेअरींगचे पर्याय सुचविले जाणार आहेत. पॉल अँड माईकतर्फे दिले जाणारे चॉकलेटची चव सुलाच्या वाईन नक्कीच वाढवतील. पंझानी द्वारे पास्ता वाईनसोबत खाताना अधिकच चविष्ट ठरणार आहे. बॉम्बे फूड ट्रक, वोक एक्सप्रेस, मलाका स्पाईस, पफ्स अँड रोल्स, कॅफे ब्लिस, मकालू, बिर्याणी बाय किलो असे अन्य पर्याय खवय्यांनातृप्त करणार आहेत.
सुलाफेस्ट 2020 ही वेगळी अनुभूती ठरावी यासाठी अनेक दिग्गजांशी समन्वय साधला आहे. गोप्रो यांच्यातर्फे मिरॅकल कॅमेरा वापर व जोडणीबद्दल उपयुक्त माहिती दिली जाणार आहे. सोबतच त्यांच्या प्रतियोगीतेत सहभागी होऊन रोज गोप्रो कॅमेरा कॅमेरा जिंकण्याची संधी उपलब्ध असेल. रॉयल इन्फिल्डतर्फे शक्तिशाली अशी ‘जिटी’ची टेस्ट ड्राईव्ह घेता येणार आहे. ‘लेट्स कॅम्प आउट’ यांनी साकारलेल्या टेंट सिटीमध्ये विश्रांती करताना वेळ निवांत घालवता येईल.
आणि तुम्ही जर इंस्टाग्राम प्रेमी असाल, तर तुम्हाला येथे असंख्य पर्याय उपलब्ध होतील हे निश्चित. लिव्हिंग फूड्सच्या माध्यमातून निऑन आणि 360 डिग्री गिफ फोटो बूथद्वारे अविस्मरणीय क्षण टिपण्याची संधी असेल. ग्रेपस्टोम्पिंग, ग्रेप सिड ऑइलपासून टॅरो कार्ड रिडींग, फूट मसाज, वाईन गेम्स, फन मास्टर क्लासेस, विनो स्पा असे भरपूर काही सुलाफेस्टची रंगत वाढवेल.
विकेंड अधिक रंजक बनविण्यासाठी बझार येथे खरेदीचा मनमुराद आनंद घेता येईल. यु.एस. पोलो असन यांची शृंखला पाहण्यासाठी थांबायलाच हवे. पर्यावरणाविषयीच्या प्रेमापोटी या ब्रँडने एक पाऊल पुढे टाकत रिसायकलिंग कॉटन पासून बनवलेले डेनिमस उपलब्ध करून दिले आहेत. इतकेच नाही तर पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल उचलत प्लास्टिक बॉटलसह अन्य घटक टाकण्यासाठी वेंडिंग मशीन उपलब्ध करून दिले आहे. संकलित टाकाऊ पदार्थांचा जबाबदारीपूर्वक वापर करण्यात येईल. वेंडीग मशीनच्या ठिकाणी आपला मोबाईल क्रमांक नोंदवत आकर्षक सवलत कुपन मिळवून युएसपीए दालनात घसघशीत सवलत मिळवता येईल.
इतकेच नव्हे तर प्रत्येक तिकीटविक्री सोबत सुला विनियार्ड्सतर्फे एक रोपटे लावले जाणार आहे. यासोबतच देशातील सर्वात शाश्वत संगीत महोत्सव घडविला जाणार आहे.
मग आताच तिकीट मिळवले पाहिजे, सुला विनियार्ड्स तुमचा ग्लास कायमस्वरूपी आठवणींनी भरण्यासाठी सज्ज झाले आहे.
‘सुलाफेस्ट’मध्ये सहभागी होण्यासाठी..
दिनांक: 1 आणि 2 फेब्रुवारी 2020
ठिकाण: सुला विनियार्ड्स, नाशिक.
एक दिवसासाठी : 2,800
दोन दिवसांसाठी : 4,600/-
लिंक: https://insider.in/sulafest-feb-2020/event
कॉल: ९८६०१९००३२/३३
९९७००९००२६/४६




