नाशिक महिंद्राने आतापर्यंत तयार केली 25 लाख वाहने !

Feb 4, 2020

नाशिक : महिंद्रा अँड महिंद्रा लि. (एमअँडएम लि.) या 20.7 अब्ज उलाढाल असणाऱ्या महिंद्रा समूहाचा भाग असणाऱ्या कंपनीने नाशिकमधील उत्पादन प्रकल्पामध्ये 25 लाखाव्या वाहनाची निर्मिती केली आहे. या प्रकल्पामध्ये उत्पादन करण्यात आलेले 25 लाखावे वाहन महिंद्राचा लोकप्रिय ब्रँड स्कॉर्पिओ हे होते.

“हा मैलाचा टप्पा साध्य करणे हा ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील आमच्या वाटचालीतील अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे आणि त्याचे श्रेय अथक परिश्रम करणाऱ्या नाशिक प्रकल्पामधील आमच्या प्रत्येक सदस्याचे आहे. या प्रकल्पाने सातत्याने उत्पादनातील उत्कृष्टता साध्य केली आहे. आमची राईज ही विचारसरणी कायम राखण्यासाठी कोणतीही मर्यादा न ठेवण्याची प्रकल्पाची प्रेरणा आणि बांधिलकी दिसून येते. या मैलाच्या टप्प्यानंतर आगामी काळामध्ये आमचा नाशिक प्रकल्प आणखी अनेक गौरव प्राप्त करणार आहे, याची खात्री आहे”                 –  विजय कारला,  उत्पादन प्रमुख 

महिंद्राचा इतिहास
महिंद्राच्या नाशिक उत्पादन प्रकल्पाची वाटचाल 1981 या वर्षामध्ये सुरू झाली. हा प्रकल्प एकूण 147 एकरांमध्ये विस्तारलेल्या क्षेत्रामध्ये सुरू झाला. त्या वेळी प्रकल्पाची उत्पादन क्षमता 210,000 होती. एफजे मिनी बस हे पहिले वाहन तयार केल्यानंतर या प्रकल्पाने दररोज 8 वाहनांचे उत्पादन करण्यास सुरुवात केली. आज, अॅसेम्ब्ली लाइनमध्ये दररोज 700 वाहनांचे उत्पादन केले जाते आणि ही वाहने जगभरातील 34 हून अधिक देशांमध्ये पोहोचली आहेत. या प्रकल्पामध्ये सध्या स्कॉर्पिओ, मराझ्झो, XUV300, बोलेरो, ई-व्हेरिटो, अॅम्ब्युलन्स, स्कॉर्पिओ SC/DC व विविध महिंद्रा उत्पादने यांची निर्मिती केली जाते.

नाशिक प्रकल्पाला पुढील पुरस्कार मिळाले आहेत – आयएमईए: ‘फ्युचर रेडी फॅक्टरी’ पुरस्कार, टीपीएम: ‘कन्सिस्टन्सी’ पुरस्कार, एमपीसीबी: ‘वसुंधरा’ पुरस्कार (सीएमकडून पुरस्कार), हेल्दी वर्क प्लेस: मॅन्युफॅक्चरिंग एक्सलन्ससाठी प्लॅटिनम लेव्हल अवॉर्ड आणि टीपीएम: जेआयपीएमकडून ‘एक्सलन्स अवॉर्ड’. महिंद्राने केंद्र सरकारच्या मेक-इन-इंडिया उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी प्रचंड बांधिलकी दर्शवली आहे.
महिंद्रा नाशिक आपल्या प्रमुख सीएसआर कार्यक्रमांद्वारेही समाजामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. या कार्यक्रमांमध्ये प्रामुख्याने एड्स जनजागृती व पुनर्वसन, ग्रामीण खेळाडूंचा विकास, रक्तदानासह थॅलेसेमिया रुग्णांची जबाबदारी, भव्य वृक्षारोपण, तसेच चेक डॅम व व्हिलेज सपोर्ट प्रोग्रॅम यांचा समावेश आहे.

महिंद्राविषयी
20.7 अब्ज डॉलर उलाढाल असलेल्या या कंपन्यांच्या समूहाचा नेहमीच प्रयत्न असतो की, वाहतूक सुविधांमध्ये नावीन्य आले पाहिजे, ग्रामीण भागात भरभराट झाली पाहिजे, शहरातील जीवनशैली सुधारली पाहिजे आणि व्यवसायाची कार्यक्षमता वाढली पाहिजे. त्यामुळे लोकांना चालना मिळून त्यांचा विकास होईल. समूह भारतात युटिलिटी व्हेइकल्स, माहिती तंत्रज्ञान, वित्तीय सेवा व व्हेकेशन ओनरशिप यामध्ये आघाडीच्या स्थानी आहे व व्हॉल्युमच्या बाबतीत जगातील सर्वात मोठी ट्रॅक्टर कंपनी आहे. कृषिव्यवसाय, एअरोस्पेस, कम्पोनंट्स, सल्ला सेवा, संरक्षण, ऊर्जा, औद्योगिक उपकरणे, लॉजिस्टिक्स, रिअल इस्टेट, स्टील, रिटेल, व्यावसायिक वाहने व दुचाकी व्यवसायांतही अग्रेसर आहे. मुंबईत मुख्यालय असलेल्या महिंद्रामध्ये 100 देशांत अंदाजे 240,000 कर्मचारी आहेत.महिंद्राविषयी अधिक माहितीसाठी पाहा www.mahindra.com / ट्विटर व फेसबुक: @MahindraRise

अजून बातम्या वाचा..

ऍब्झॉर्बन्ट स्वच्छता उत्पादने बनवणाऱ्या नोबेल हायजीनचा आयपीओसाठी अर्ज दाखल

Nashik : नोबेल हायजीन लिमिटेड, आर्थिक वर्ष 2026 मधील प्युअर-प्ले (केवळ विशिष्ट उत्पादनांवर लक्ष...

read more
“ऑटोमेशन एक्स्पो 2026′  मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

“ऑटोमेशन एक्स्पो 2026′ मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

ऑटोमेशन एक्स्पो 2026 मध्ये तैवान एक्सलन्स पॅव्हेलियनमध्ये 22 पुरस्कारप्राप्त ब्रँड्स AI एज...

read more
Breaking News