चार दिवसीय औद्योगिक प्रदर्शन, दि. ६ ते ९ फेब्रुवारी २०२० दरम्यान कृषी महाविद्यालय पटांगण (नवीन), सिंचननगर, शिवाजीनगर, पुणे येथे सुरु होत आहे
नाशिक – १७ व्या महाटेक २०२० या व्यावसायिक प्रदर्शनाची सुरुवात दि.६ ते ९ फेब्रुवारी २०२० दरम्यान कृषी महाविद्यालय पटांगण (नवीन), सिंचननगर, शिवाजीनगर, पुणे येथे सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत होणार आहे. नाशिकमधील सम्राट ऑटोमेशन, सवालराम एंटरप्राइजेस,एस.के.डी, कन्सल्टेंट्स प्रा.लि, या प्रतिष्ठित कंपन्याचा महाटेक २०२० मध्ये सहभाग घेणार आहेत
महाटेक – एक परिपूर्ण औद्योगिक प्रदर्शन
महाटेक २०२० साठी सहकार्य – उद्योग मंत्रालय (भारत सरकार), COSIA (चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्रीज असोसिएशन), TSSIA (ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीजअसोसिएशन). प्रायोजक – स्कूल ऑफ इन्स्पिरेशनल लिडरशिप आणि फ्युएल इंस्ट्रुमेंट्स अँड इंजिनिर्स प्रायव्हेट लिमिटेड व नेटवर्किंग पार्टनर – सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट. या प्रदर्शनात ३०० पेक्षा जास्त कंपन्या सहभागी होणार असून भारत व भारता बाहेरील जवळपास ४०,००० ते ५०,००० हजार हून अधिक उद्योजक भेट देणार आहेत. याविषयी माहिती देताना मराठे इन्फोटेक प्रा. लि च्या संचालिका गौरी मराठे म्हणाल्या की, आम्हाला कळविण्यात आनंद होत आहे की, महाटेक- २०२० प्रदर्शकांच्या प्रतिक्रिया आणि प्रेक्षकांच्या प्रतिसादामुळे आम्हाला मोठ्या प्रमाणात यश मिळाले आहे त्यामुळे या वर्षीचे महाटेक हे अधिक चांगले व भव्य असेल.दरवर्षी आमचे लक्ष आमच्या प्रदर्शकांना त्यांनी वर्षभरात विकसित केलेल्या नाविन्यपूर्ण उत्पादनांचे प्रदर्शन बाजारपेठेत प्रक्षेपित करण्यासाठी सर्वोत्तम व्यासपीठ उपलब्ध करून देण्यावर असते. महाटेक ऍप व वेबसाइट द्वारे सर्वजण पूर्वनोंदणी करू शकतात.याविषयी अधिक माहिती देताना मराठे इन्फोटेक प्रा. लि चे संचालक श्री. विनय मराठे म्हणाले की, महाटेक ने अनेक वर्षापासून पुण्यातील उत्पादनाच्या क्षेत्रात (जो पुण्याचा पाया आहे) आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे. महाराष्ट्रातील अनेक प्रमुख कंपन्या महाटेक प्रदर्शनात सहभागी झाल्या आहेत. यावर्षी देखील सर्वत्र भारतातून एमएसएमइ (MSME) वएसएमइस (SME) कडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे.ते पुढे म्हणाले की महाटेकचे मूळ उद्दीष्ट, उत्पादन क्षेत्राचा प्रसार करणे आणि योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदिजींचे व्हिजन ‘मेक इन इंडिया’ला पाठींबा देणे हा आहे. प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही प्रदर्शनासह एसएमईसाठी ४ वेगवेगळ्या परिषदेचे आयोजन देखील केले आहे. या परिषदेच्या पहिल्या दिवशी डिजिटल मार्केटिंग परिषद होईल, दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी व्हेंडर डेव्हेलपमेंट मीट असेल ज्यात अग्रगण्य ओईम (OEM) चा सहभाग असेल, तसेच चौथ्या दिवशी उद्योजकतेवर स्कूल ऑफ इन्स्पिरेशनल लीडरशिप ची परिषद होईल.प्रदर्शनाचे वर्गीकरण प्रक्रिया औद्योगिक उपकरणे, इलेक्ट्रीकल आणि इलेक्ट्रॉनिक, मशिनरी आणि मशीन टूल, इन्स्त्रूमेंटेशन आणि ऑटोमेशन उपकरणे, फार्मा आणि केमिकल औद्योगिक उपकरणे, औद्योगिक आणि तांत्रिक सेवा या प्रकारामध्ये करण्यात आले आहे. महाटेकच्या बीटूबी प्रदर्शनात फक्त व्यावसायिकांचे स्टॉल असतात.या प्रदर्शनात, प्रत्येक विभागात, भारत आणि परदेशातील अद्ययावतउत्पादने, यंत्रसामग्री, उपकरणे आणि उद्योगातील नाविन्यपूर्ण वस्तूंचे प्रदर्शन केले जाणार आहे. महाटेक प्रदर्शन हे सर्व स्तरांच्या उद्योजकांसाठी एक आदर्श व्यासपीठ आहे. महाटेकच्या माध्यमातून अनेक उद्योजकांनी आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आपला व्यवसाय मोठा केला आहे.अद्वितीय प्रकाशन सुव्यवस्थापनामूळे, महाराष्ट्र इंडस्ट्रीज् डिरेक्टरी ने आपला पाया औद्योगिक व्यापार मेळा व तांत्रिक परिषदा आणि औद्योगिक क्षेत्रात भक्कम केला आहे. हे औद्योगिक प्रदर्शन विवेकी लक्ष्य प्रेक्षकांना आपल्या उत्पादनांचा प्रसार करण्यासाठी एक प्रमुख माध्यम आहे.



