गोदावरीत गटाराचे पाणी येता कामा नये यासाठी प्रशासनाने खबरदारी घ्यावी; अन्यथा सरकारी बडगा उगारला जाईल – ना.छगन भुजबळ

Feb 6, 2020

नाशिक :- गोदावरी नदी स्वच्छ झाल्याशिवाय नाशिक शहर हे स्मार्ट सिटी होऊ शकत नाही. त्यामुळे गोदावरी स्वच्छतेला प्राधान्य देत गोदावरीत गटाराचे पाणी येता कामा नये यासाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी असे आदेश राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना. छगन भुजबळ यांनी सबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच नुकत्याच झालेल्या कॅबिनेट बैठकांमध्ये नदी शुद्धीकरण तसेच प्रदुषण रोखण्याच्या दृष्टीने सरकारने योग्य ती पाऊल उचलली आहे. त्यादृष्टीने अधिक सुधारणा करण्यासाठी आदेश देण्यात येतील त्यानंतरही जर यामध्ये सुधारणा होणार नसेल तर सरकारी बडगा उगारला जाईल तसेच एसटीपी सेंटर दोषी आढळ्यास त्या ठेकेदाराला काळ्या यादीत समाविष्ट केले जाईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला.आज ना.छगन भुजबळ यांनी गोदावरी साक्षरता यात्रेच्या पार्श्वभूमीवर जलतज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांच्यासह गोदावरी नदीची पाहणी केली. यावेळी नमामी गोदा फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश पंडित, अतिरिक्त जिल्हाधिकारी निलेश सगर, जिल्हा प्रशासन, पर्यारण विभाग यांच्यासह व सबंधित विभागाचे अधिकारी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, नगरसेवक गजानन शेलार, गुरुमित बग्गा, विक्रांत मते यांच्यासह  पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी ना. छगन भुजबळ म्हणाले की, जलतज्ञ डॉ. राजेंद्र सिंह नाशिकमध्ये गोदावरी साक्षरता यात्रेसाठी आल्यामुळे गोदावरी नदी स्वच्छता कामाबाबत नागरिकांमध्ये पुन्हा एकदा जागरूकता निर्माण होऊन स्वच्छतेच्या कामाला अधिक गती मिळणार आहे. प्रत्येकाने नागरिक म्हणून गोदावरीची आरती करत असतांना आपण शुद्ध गोदावरीची पूजा करत आहोत का ? यांचा योग्य विचार करण्याची गरज आहे. त्यामुळे नदी स्वच्छतेच्या कार्यक्रमात नागरिक, प्रशासन आणि सेवाभावी संस्थांनी या सर्वांनी एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.ते म्हणाले की, जलतज्ञाच्या विचारांनुसार गोदावरी पात्रात कुठलेही बांधकाम करण्यात येऊ नये तसेच आवश्यक असल्यास एका मर्यादेपर्यंत इको फ्रेंडली कामे करण्यास हरकत नसावी. केवळ बांधकामे करून नदी स्वच्छ करून गोदावरी स्वच्छ होणार नाही. तर फक्त किनारा नव्हे तर गोदावरी स्वच्छ व्हायला हवी ही आपली जबाबदारी आहे. त्यासाठी गोदा पात्रात कुठल्याही परिस्थितीत गटारींचे तसेच कंपन्यामधून येणारे दुषित पाणी येता कामा नये अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.यावेळी जलतज्ञ डॉ.राजेंद्र सिंग म्हणाले की, पर्यावरणीय दृष्टीने गोदावरी नदी प्रवाहित होणे आवश्यक आहे. त्यासाठी गोदावरीची जमीन गोदावरीसाठी रहावी त्यामध्ये काँक्रीटीकरण करू नये, तसेच त्यामध्ये गटारींचे पाणी जाणार नाही याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. जर गोदावरी नदी निर्मल केली नाही तर पुढच्या पिढीचे भविष्य सुरक्षित राहणार नाही. त्यामुळे गोदावरीचे पारंपरिक स्रोत जिवंत ठेऊन गोदावरीला जिवंत करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

 

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

नाशिक : "सागरा प्राण तळमळला..." या अमर ओळींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली...

read more

तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची ३ ऑगस्ट रोजी शेगाव येथे राज्यस्तरीय बैठक

Nashik : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक रविवार, (दि. ३,...

read more
Breaking News