१२ वी वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सरावासाठी मोफत अॅप

Feb 10, 2020

नाशिक :- १२ वी ची परीक्षा हि विद्यार्थ्याच्या जीवनात टर्निंग पॉईंट असते. त्याकरिता विदयार्थी वर्षभर कॉलेज व क्लासेसच्या माध्यमातून अभ्यास करतात पण असेही असंख्य विदयार्थी आहेत की, ज्यांना क्लासेस परवडत नाही. अशा विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेऊन नाशिकमधील युवा चार्टड अकौंटंट ऋषिकेश एकबोटे यांनी टी टी कॉमर्स (T T Commerce) या नावाने १२ वी च्या परीक्षेच्या सरावासाठी अॅप तयार केले आहे.  या अॅपचा आज सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र भावे यांच्या सातचा चहा या उपक्रमात उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी सोशल नेट्वर्किंग फोरमचे प्रमोद गायकवाड, चार्टड अकौंटंट ऋषिकेश एकबोटे, महेंद्र एकबोटे व जनसंपर्क तज्ञ अभिजित चांदे उपस्थित होते.
याबाबत सांगतांना ऋषिकेश एकबोटे म्हणाले की, या अॅप मध्ये विषयानुरूप लेक्चर, विविध सराव परीक्षा यांचा समावेश करण्यात आले असून विदयार्थी त्यास अमर्यादित वेळे करिता बघू शकतात व परीक्षेचा सराव करू शकतात. हे अॅप वापरण्यासाठी कोणतेही शुल्क नसून हे गुगल प्ले स्टोअर मधून डाउनलोड करता येऊ शकते.

अजून बातम्या वाचा..

ऍब्झॉर्बन्ट स्वच्छता उत्पादने बनवणाऱ्या नोबेल हायजीनचा आयपीओसाठी अर्ज दाखल

Nashik : नोबेल हायजीन लिमिटेड, आर्थिक वर्ष 2026 मधील प्युअर-प्ले (केवळ विशिष्ट उत्पादनांवर लक्ष...

read more
“ऑटोमेशन एक्स्पो 2026′  मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

“ऑटोमेशन एक्स्पो 2026′ मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

ऑटोमेशन एक्स्पो 2026 मध्ये तैवान एक्सलन्स पॅव्हेलियनमध्ये 22 पुरस्कारप्राप्त ब्रँड्स AI एज...

read more
Breaking News