मुंबई : जग्वार लँड रोव्हर इंडियाने आज न्यू मॉडेल इयर २०२० डिस्कव्हरी स्पोर्ट या अधिक स्वयंप्रेरित (इंट्युइटिव्ह), व्यवहार्य आणि आधुनिक एसयूव्हीची घोषणा केली. एस आणि आर-डायनॅमिक एसई प्रकारांमध्ये उपलब्ध असलेली न्यू डिस्कव्हरी स्पोर्ट बीएस४ची पूर्तता करणाऱ्या १८३ किलोवॅट इंजेनियम टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन व १३२ किलोवॅट इंजेनियम टर्बोचार्ड डिझेल इंजिन अशा दोन पर्यायांत उपलब्ध आहे. जग्वार लँड रोव्हर इंडिया लिमिटेडचे (जेएलआरआयएल) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रोहित सुरी म्हणाले:
”न्यू डिस्कव्हरी स्पोर्ट ही मूळ डिझाइनची अधिक ठळक उत्क्रांती आहे. यामध्ये नवीनतम तंत्रज्ञानात्मक प्रगतीचा अंतर्भाव करण्यात आला आहे. साहसाच्या स्फुल्लिंगाला चेतना देत या वाहनामध्ये सुधारित सुविधांची भर करण्यात आली आहे. यामुळे गाडीची क्षमता तर वाढली आहेच, शिवाय यातून ड्रायव्हिंगचा परिपूर्ण अनुभव प्राप्त होणार आहे. डिस्कव्हरी स्पोर्टला लँड रोव्हर पोर्टफोलिओमधील आघाडीच्या मॉडेल्सपैकी एकीचे स्थान देणारी वैशिष्ट्यपूर्ण रचना व वैविध्य या नवीन मॉडेलमध्ये अधिक खुलले आहे.”
ऍब्झॉर्बन्ट स्वच्छता उत्पादने बनवणाऱ्या नोबेल हायजीनचा आयपीओसाठी अर्ज दाखल
Nashik : नोबेल हायजीन लिमिटेड, आर्थिक वर्ष 2026 मधील प्युअर-प्ले (केवळ विशिष्ट उत्पादनांवर लक्ष...




