डेथ क्लेमचा परतावा आता एका दिवसात

Feb 18, 2020

मुंबई, फेब्रुवारी १७, २०२०-आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफच्या क्लेम फॉर शुअर योजनेच्या माध्यमातून डेथ क्लेमचा परतावा एका दिवसात देण्यात येणार आहे.

घरातील व्यक्तीचे निधन विशेषतः, कर्त्या व्यक्तीचे निधन, भावनिक आणि आर्थिक ताण निर्माण करणारा असतो.क्लेम फॉर शुअर योजनेची सुरुवात करून, या भरून न निघणाऱ्या नुकासानात बाधितांच्या कुटुंबाला आर्थिक नुकसानातून मदतीचा हात देण्यासाठी कंपनीने क्लेम फॉर शुअर या योजनेची सुरुवात केली आहे. ज्या पोलिसिज तीन वर्षे सतत सुरू आहेत आणि परताव्याची रक्कम दीड कोटी रुपयांच्या आत असेल त्यांच्या विषयी कोणतीही तपासणी केली जाणार नाही. हा वेगवान परतावा मिळविण्यासाठी अर्जदाराने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह अर्ज करणे आवश्यक आहे.

जुलै २०१९ मध्ये या योजनेची सुरुवात झाल्यापासून,क्लेम फॉर शुअर योजनेतर्गत कंपनीकडे ६५ टक्के डेथ क्लेम दाखल झाले आहेत.त्यापैकी ९९.४ टक्के प्रकरणांमध्ये एका दिवसात परतावा देण्यात आला आहे.आर्थिक वर्ष २०२० पर्यंत संपलेल्या९ महिन्याच्या कालावधीत सरासरी १.६७ टक्के दिवसांत परतावे मिळाले आहेत. आर्थिक वर्ष २०१९ मध्ये कंपनीने ९८.६ टक्के दराने परतावे देण्यात आले आहेत आणि डेथ क्लेम अंतर्गत दिलेल्या एकूण निधीचे मूल्य ८२६.६६ कोटींची रक्कम परतफेड २.३४ दिवसात करण्यात आली आहे.आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्सचे उपव्यवस्थापकीय संचालक श्री.पुनीत नंदा म्हणाले की, विमाधारकाच्या अनुपस्थितीत त्यांच्या कुटुंबाची काळजी घेण्याचं वचन म्हणजे आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्सच्या विमा पोलिसिज आहेत. ही एक सत्य परीस्थिती आहे. आमच्या धोरणाचा भक्कम आधार ग्राहकहित हेच आहे. वेगवान पद्धतीने डेथ क्लेमचा परतावा करण्यासाठी तंत्रज्ञानावर आधारित असल्यामुळे प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे.आपल्या पश्चात कुटुंबियांची काळजी घेण्यास समर्थ आधार असल्याबद्दल ग्राहकांना निश्चिंत राहता येते.ग्राहकांना त्यांच्या सवलतीनुसार आणि ताबडतोब परताव्याचा हक्क सदर करता येणार आहे.

अजून बातम्या वाचा..

ऍब्झॉर्बन्ट स्वच्छता उत्पादने बनवणाऱ्या नोबेल हायजीनचा आयपीओसाठी अर्ज दाखल

Nashik : नोबेल हायजीन लिमिटेड, आर्थिक वर्ष 2026 मधील प्युअर-प्ले (केवळ विशिष्ट उत्पादनांवर लक्ष...

read more
“ऑटोमेशन एक्स्पो 2026′  मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

“ऑटोमेशन एक्स्पो 2026′ मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

ऑटोमेशन एक्स्पो 2026 मध्ये तैवान एक्सलन्स पॅव्हेलियनमध्ये 22 पुरस्कारप्राप्त ब्रँड्स AI एज...

read more
Breaking News