‘टाटा टी’च्या वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओमधील टाटा टी गोल्डचा प्रीमियम प्रकार म्हणून नावाजल्या जाणाऱ्या टाटा टी गोल्ड मिक्श्चरला महाराष्ट्रात रिलॉन्च केल्याची घोषणा करण्यात आली आहे. नवीन टाटा टी गोल्ड मिक्श्चर खास तयार करण्यात आले असून यामध्ये डस्ट चहासोबत १५% प्रमाणात चहाची पाने देखील आहेत. त्यामुळे या चहाने कडक स्वाद आणि मन ताजेतवाने करणारा सुगंध हे दोन्हीही मिळतात.टाटा टी गोल्ड मिक्श्चरच्या नवीन पॅकिंगसाठी पाहताक्षणी लक्ष वेधून घेईल असा चमचमणारा लाल आणि सोनेरी रंग निवडला गेला आहे. उत्पादनाबरोबरीनेच पॅकेजिंगमधूनही ब्रँडची गुणवत्ता दर्शविण्याची ही अनोखी कल्पना आहे. डस्ट आणि १५% प्रमाणात चहाची पाने हे कडक स्वाद आणि मनमोहक सुगंध देणाऱ्या या मिश्रणाची खासियत जास्तीत जास्त ग्राहकांना अनुभवता यावी यासाठी या रिलॉन्चची मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी केली जात आहे.भारतात चहाचे जास्तीत जास्त चाहते महाराष्ट्रात आहेत, मन आणि शरीर ताजेतवाने करेल असा स्वाद आणि सुगंध असलेल्या चहाला महाराष्ट्रात खूप मानले जात असल्यामुळे ब्रॅंडने महाराष्ट्रातील आपल्या ग्राहकांसाठी हे धोरणात्मक पाऊल उचलले आहे.या रिलॉन्चमागील धोरण आणि विचार यावर प्रतिक्रिया देताना टाटा कन्ज्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडचे व्हाईस प्रेसिडेंट – मार्केटिंग – इंडिया श्री. पुनीत दास यांनी सांगितले, “स्थानिक चवी, खास आवडीनिवडी यांना अनुसरून असलेल्या आमच्या खास तयार करण्यात आलेल्या चहांमधून आमच्या ग्राहकांना दर्जेदार चहाचा अनुभव मिळवून देण्याचे उद्धिष्ट डोळ्यासमोर ठेवून टाटा टी भारताच्या वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये विशिष्ट धोरणात्मक पावले उचलत आहे. महाराष्ट्रात चहाप्रेमींची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे आमच्यासाठी ही अतिशय महत्त्वाची बाजारपेठ आहे. स्थानिक चवी आणि आवडीनिवडींना डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आलेले टाटा टी गोल्ड मिक्श्चर नवीन आणि अधिक जास्त चांगले असल्यामुळे महाराष्ट्रातील चहाप्रेमींना नक्कीच आवडेल याची आम्हाला खात्री आहे. आमच्या या नवीन चहाचा दर्जा त्याच्या नवीन, अनोख्या पॅकेजिंगमधून देखील दर्शवला जात आहे. आधीच्या पिवळ्या रंगाऐवजी आता लाल आणि सोनेरी रंगाचे आकर्षक पॅकेजिंग आमच्या नवीन चहाची अनोखी खासियत दर्शवते. आम्हाला आशा आहे की टाटा टी गोल्ड मिक्श्चर महाराष्ट्रातील चहाप्रेमींना पुरेपूर आनंद मिळवून देईल.”
टाटा टी गोल्ड मिक्श्चर महाराष्ट्रातील सर्व जुन्या, नवीन दुकानांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.




