१०-१५ वेगवेगळी ॲप्स डाऊनलोड करण्याचे गरज नाही
नाशिकच्या सोहम व देवयानी यांचे यश
नाशिक – इंटरनेट आणि सोशल नेटवर्किंग साइट्सच्या जगतात अक्षरशः क्रांती घडवनाऱ्या संपूर्ण भारतीय बनावटीचं असलेलं पहिलं सोशल नेटवर्क डिग मी अप (Digg me up )हे नाशिकच्या सोहम गरुड व देवयानी लाटे या युवकांनी तयार केले असून याद्वारे तुमची सामाजिक ओळख निर्माण करणारं, संघटन बांधणारं आणि ८० हून अधिक ॲप्सना आपल्यात सामावून घेणारं सोशल व्यासपीठ त्यानं तयार केलं आहे.या ऐप नुकतेच लौंच झाले असून सुरवातीच्या काही दिवसातच यास उत्तम प्रतिसाद मिळत असल्यचे सोहम गरुड व देवयानी लाटे यांनी सांगितले .
१२ वी पर्यंत चे शिक्षण नाशिक मध्ये घेतल्यानंतर चार वर्षं सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग करून उच्च शिक्षण घेण्यासाठी सोहम पाच वर्षं अमेरिकेला . तिथं लॉस एंजेलिसमधील कॅलिफॉर्निया स्टेट युनिव्हर्सिटीतून मास्टर्स डिग्री घेतल्यानंतर सॅन फ्रान्सिस्कोमधील हिल्स फिजिशियन्स मेडिकल ग्रुपसाठी काम करण्याची त्यास संधी मिळाली. पण आपल्या शहरात, देशात वेगळं काही करून दाखवायचं होतं. यामुळे २०१५ साली नाशिकला परतलो परतल्यावर स्वतःचं स्टार्ट अप सुरू करण्याचा निर्णय घेतला . त्यात मी इतरांची ॲप्स किंवा संकेतस्थळं विकसित करून देत होतो. नंतर मी ‘प्रॉडक्ट बेस्ड स्टार्ट’अपध्ये काम करायचं ठरवलं. सरकारच्या स्टार्ट अप इंडिया उपक्रमांतर्गत मान्यताप्राप्त उपक्रम म्हणजे Digg me up हे सोशल नेटवर्क तयार केलं असेही त्यांनी नमूद केले .या सर्वात त्याला साथ लाभली ती त्याची पत्नी देवयानी ची . पुण्यातील सिंबायोसिस मधून प्रॉडक्ट डिझाईनमधली पदवी घेतल्या ती नंतर उच्च शिक्षणासाठी इटलीला गेले. त्यानंतर अमेरिकेत आयओएस, अँड्रॉइड गेम्स व ॲप्स डिझाईन करणाऱ्या कंपनीची ती सहनिर्माती होते. परदेशात अनुभव घेतल्यावर तिने भारतात येऊन स्वतःचं स्टर्ट अप सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सोहमबरोबर ती डिग मी अप या मोठ्या प्रोजेक्टमध्ये सहभागी झाली .
डिग मी अप बाबत माहिती देतांना सोहम गरुड म्हणाले की हे नेटवर्क ट्विटर, फेसबुकसारखं काम करतं. सगळ्या गोष्टी एकाच ॲपमध्ये मिळतील अशी यामागची संकल्पना आहे. हे ॲप अँड्रॉइडसाठीही तयार केलं आहे. यामध्ये फेसबुक, लिंक्डइन, ट्विटर, इन्स्टाग्रामसारखे ८० हून अधिक नेटवर्क तयार केले आहेत, ते तुम्ही या एका ॲपद्वारे ऑपरेट करू शकता. त्यामुळे एखाद्याला आपल्या व्यवसायाची जाहिरात करणं सहज शक्य होईल. एकाच वेळी अनेक व्हर्चुअल ठिकाणांची माहिती समजेल. त्यामुळं भरपूर वेळ वाचेल. म्हणजे आता आपल्याला फेसबुक बंद करून लिंक्डइन चालू करावं लागतं. त्यातल्या नोंदी तपासाव्या लागतात. त्यात वेळ जातो. पण ‘diggmeup’ या नेटवर्कमुळं सर्व गोष्टी एकाच ॲपवर समजतील. त्यासाठी १०-१५ वेगवेगळी ॲप्स डाऊनलोड करावी लागणार नाहीत.
या ॲपच्या वैशिस्ठ्या बाबत सांगताना देवयानी लाटे म्हण्याला की यामध्ये सामाजिक व संपर्क प्रोफाइल्ससाठी एकच युजरनेम आहे. त्यातून युजर्स व उद्योजकांना आपल्या संपर्क यादीची (फेसबुक, व्हॉट्सअप, फोन, लोकेशन इत्यादीबाबतची) माहिती एकाच युजरनेम अंतर्गत मिळेल. मार्केटिंगच्या दृष्टीने ही यंत्रणा अतिशय सोपी ठरेल. सोशल कार्डवरून एखाद्याची माहिती चुटकीसरशी मिळेल. सोशल कार्डच्या माध्यमातून त्या युजरपर्यंत ईमेलद्वारे संदेश जाईल. त्याच्या डिगमीअप प्रोफाईल, ईमेल, व्हॉट्स अप या सर्व माहितीची नोंद होईल. हे कार्ड डिजिटली सेव्ह झालं असल्यानं ते हरवण्याचा प्रश्नच येणार नाही. हे कार्ड नियमित तुमच्याबरोबरच असेल. वापरकर्ता त्याच्या सामाजिक किंवा खासगी नेटवर्कच्या सहाय्याने आपली संपूर्ण माहिती व ठिकाणही येथे त्याच्या गरजेनुसार शेअर करू शकेल. या नवीन शोधाबद्दल डिगमीअपने पेटंटसाठीही अर्ज केला आहे.
या ॲपची मेमरी स्पेस इतकी आहे की वापरकर्त्यांना वेगळी सोशल नेटवर्किंग ॲप्स डाऊनलोड करण्याची गरज नाही. अधिकाधिक सोशल नेटवर्किंग ॲप्स डिगमीअपच्या अंतर्गतच ऑपरेट करता येतील, एवढी यात स्पेस आहे. तसंच फोटो आणि व्हिडिओ अशा गोष्टींसाठीही यामध्ये भरपूर स्पेस असेल. वेगवेगळी ॲप्स बंद-उघड करण्याचा वेळ वाचेल, श्रमही वाचतील. डिगमीअपमध्ये मार्केटिंग टूल्सचे वैविध्य असल्याने त्याचा व्यावसायिकांना खूपच फायदा होईल असेही त्यांनी नमूद केले .
तंत्रज्ञान क्षेत्रातील कार्याबाबत सोहम गरुड यांना याआधी विविध पुरस्काराने गौरविण्यात आले असून त्यांना २०१६ मध्ये अमेरिकेतील हेल्थकेअर ॲपसाठी प्रथम पारितोषिक, २०१७ साली भारत सरकारच्या स्टार्ट अप इंडियाअंतर्गत भारत सरकारचा तसंच हेल्थकेअरमधील बिझ्झअप पुरस्कार तसेच २०१८ साली नाशिक देशदूतचा तेजस पुरस्कार मिळाला.
देवयानी लाटे यानाही विविध पुरस्कार मिळाले असून यामध्ये २०११ साली मिलानमधील दिवा ॲवॉर्ड अंतर्गत द्वितीय पारितोषिक,२०१६ साली हेल्थकेअर क्वालिटी मेजरिंग ॲपसाठी अमेरिका सरकारचं प्रथम पारितोषिक, २०१७ साली बिझ्झअप ॲवॉर्ड, २०१७ मध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भरीव कामगिरी केलेल्या महिलांना दिल्या जाणाऱ्या शी लिड्स टेक बाय फेसबुकने पुरस्कारानेहि देवयानी हिला सन्मानित करण्यात आले आहे .
सोहम चे वडील विवेक गरुड हे चार्टर्ड अकौंटंट असून आई या वास्तुविश्राद आहेत
ऍब्झॉर्बन्ट स्वच्छता उत्पादने बनवणाऱ्या नोबेल हायजीनचा आयपीओसाठी अर्ज दाखल
Nashik : नोबेल हायजीन लिमिटेड, आर्थिक वर्ष 2026 मधील प्युअर-प्ले (केवळ विशिष्ट उत्पादनांवर लक्ष...





