नाशिक :- भारतीय वाहन उद्योग क्षेत्रात बजाज समूहाला मानाचे स्थान आहे. बजाज ऑटो लिमिटेडच्या पल्सर या लोकप्रिय ब्रँडला नुकतीच १८ वर्षे पूर्ण झाली. त्याचे औचित्य साधून बजाज ऑटोने रविवार दिनांक २३ फेब्रुवारी २०२० रोजी तब्ब्ल १०० शहरांमध्ये पल्सर मोटारसायकल रॅलीचे आयोजन केले होते.याचाच एक भाग म्हणून नाशिक येथेहि बजाज ऑटो व वासन बजाज यांच्या संयुंक्त विद्यमाने पल्सर मोटारसायकल रॅलीचे आयोजन वासन बजाज मुंबई नाका ते जलालपूर गंगापूर रोड पर्यंत करण्यात आले होते. बजाज ऑटो लिमिटेडने निर्माण केलेला पल्सर ब्रँड चांगला असून सर्व्हिस देखील चांगली असल्याचं मत यावेळी ग्राहकांनी व्यक्त केले. ग्राहक समाधान, सामाजिक बांधिलकी, व्यवसाय प्रणाली, स्वतंत्रपणे केलेली पाहणी अशा अनेक मापदंडामुळे आज पल्सर ब्रँड लोकांपर्यत पोहचला आणि ग्राहकांनी दिलेल्या सहकार्यामुळेच आज १८ वर्षे यशस्वीपणे पूर्ण झाल्याचं आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले. या रॅलीत बजाज ऑटो लिमिटेड चे एरिया सेल्स मॅनेजर आदर्श सुराणा, वासन बजाजतर्फे दिलीप ओभान, मंजूर पटेल, जयंत साळवी तसेच ग्राहक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
ऍब्झॉर्बन्ट स्वच्छता उत्पादने बनवणाऱ्या नोबेल हायजीनचा आयपीओसाठी अर्ज दाखल
Nashik : नोबेल हायजीन लिमिटेड, आर्थिक वर्ष 2026 मधील प्युअर-प्ले (केवळ विशिष्ट उत्पादनांवर लक्ष...




