नाशिक : भारतातील सर्वात मोठी चेन आणि लॉजिस्टिक्स कंपनी सेफ एक्स्प्रेसचा शुभारंभ आज बुधवार(दि. ४) होणार आहे.
कंपनीचे ५० वे अत्याधुनिक लॉजिस्टिक पार्क असून दीड लाख चौरस फूट क्षेत्रामध्ये पसरलेली ही जागतिक दर्जाची सुविधा न्यू एअरपोर्ट रोडवरील ओझर विमानतळापासून २ किलोमीटर अंतरावर जानोरी येथे आहे. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग, दिल्ली-चेन्नई राष्ट्रीय महामार्ग तसेच मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गासह प्रमुख महामार्गांद्वारे संपूर्ण भारताला कनेक्टिव्हिटी प्रदान करते. हे लॉजिस्टिक पार्क नाशिक आणि आसपासच्या विविध उद्योगांच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी बांधण्यात आलेले आहे. अशी माहिती कंपनीचे व्हाइस प्रेसिडेंट एस के जैन आणि प्रादेशिक प्रबंधक अजय खन्ना, संदीप जैन यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पार्क एकाच वेळी २५ पेक्षा जास्त वाहनांचे लोडिंग आणि अनलोडिंग करण्याची क्षमता ठेवते. यामुळे मालाची सुरळीत आणि अखंडित ट्रान्सपोर्ट सुनिश्चित होते. लॉजिस्टिक पार्कमधील नाशिकला देशातील सर्व पिनकोडपर्यंत सर्वात वेगवान वेळेत देण्यास कटिबध्द आहे. सर्व वस्तूंचे लोडिंग आणि अनलोडिंग सक्षम करण्यासाठी ही सुविधा १६ फूट रुंद कॅन्टिलिव्हर शेडसह सुसज्ज आहे. हे लॉजिस्टिक पार्क वेळेत निश्चित वितरण करण्यासाठी वर्षातील सर्व दिवस २४ तास कार्यरत असेल.गेल्या वर्षी केवळ सेफ एक्सप्रेसने देशात विविध भागात १४ अल्ट्रा-मॉडर्न लॉजिस्टिक पार्क सुरू केले.
ऍब्झॉर्बन्ट स्वच्छता उत्पादने बनवणाऱ्या नोबेल हायजीनचा आयपीओसाठी अर्ज दाखल
Nashik : नोबेल हायजीन लिमिटेड, आर्थिक वर्ष 2026 मधील प्युअर-प्ले (केवळ विशिष्ट उत्पादनांवर लक्ष...



