शेलतर्फे देशात फ्लीट सोल्युशन्स उत्पादने सादर

Mar 4, 2020

बंगळुर : व्यवसाय आणि फ्लीट ऑपरेटर्सना भेडसावणा-या फ्लीट व्यवस्थापनासंदभासतील समस्यांवर तोडगा काढण्यासाठी शेल या विविध क्षेत्रातील उद्योगांची विश्वासार्ह भागीदार असलेल्या कंपनीने भारतात त्यांचे
फ्लीट सोल्युशन्स उत्पादन सादर केले आहे.
फ्लीट मालकांसाठी मालकी खर्च (टोटल कॉस्ट ऑर्फ ओनरशीप – टीसीओ) कमी करण्याच्या उद्देशाने सादर करण्यात आलेल्या शेल प्रीपेड प्रोग्राम आणि शेल टेलिमॅटिक्स या उत्कृष्ट दर्जाच्या अनोख्या उत्पादन आणि
सेवांमधून कार्यचलनावर अधिक नियंत्रण येईल आणि घोटाळे किंवा गैरव्यवहारांवर अधिक अंकुश राहील.जागतिक स्तरावरील फ्लीट व्यवस्थापन व्यवसायातील गेल्या 60 वर्षांचा अनुभव आणि 60 लाखांहून अधिक फलीट
कार्डस या आधारे भारतात विविध पर्याय सादर करण्यात आले आहेत. त्यामुळे भारतीय फलीट मालकांना अनोखे शेल ॲडव्हांटेज देण्यासाठी शेलचा जागतिक अनुभव आणि तज्ज्ञता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि जागतिक
दर्जाची नाविन्यता यांचा मेळ साधण्यात आला आहे.शेलची खास आणि फिट-फॉर-पर्पझ फलीट व्यवस्थापन उत्पादने फलीट मालकांना इंधनाचे पेमेंट आणि वापर यावर नियंत्रण, त्यांच्या वाहनांची रीअल टाईम माहिती यातून कार्यक्षमता लक्षणीय प्रमाणात वाढण्यात साहय करण्यासाठी आधुनिक दळणवळण तंत्रज्ञानाचा वापर करतात,तसेच त्यांना उदयोग मार्गदर्शन आणि उपयुक्त माहितीही देउ करतात.

शेल उत्पादने :
1) शेल फयुएल- या तंत्रज्ञानात काही जटील मिश्रणे आहेत.या मिश्रणांमुळे नव्या इंधनांच्या घटकांमध्ये दमदार क्लिंनिंग एजंटसचा समावेश्‍ होतो आणि त्यामुळे इतर इंधनांच्या तुलनेत अधिक लाभ मिळतो.
2) शेल फ्लीट प्रीपेड – या उपक्रमातून इंधनावरील खर्च, कार्यचलनातील सुलभत, अधिक सोयीस्कर आणि गैरव्यवहार टाळण्यासाठी आणि ते ओळखण्यासाठी जागतिक दर्जाची सुरक्षिता यामुळे फ्लीट मालकांना त्यांच्या
कार्यचलनात पादर्शकता आणता येते.
3) शेल टेलिमॅटिक्स – ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री स्टँडर्ड 140 ची पुर्तता करणारे आहे आणि यातून अधिक नियंत्रण, सुरक्षा आणि फ्लीट ऑपरेशन्सची आधिक परिणामकारकता मिळते.

अजून बातम्या वाचा..

ऍब्झॉर्बन्ट स्वच्छता उत्पादने बनवणाऱ्या नोबेल हायजीनचा आयपीओसाठी अर्ज दाखल

Nashik : नोबेल हायजीन लिमिटेड, आर्थिक वर्ष 2026 मधील प्युअर-प्ले (केवळ विशिष्ट उत्पादनांवर लक्ष...

read more
“ऑटोमेशन एक्स्पो 2026′  मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

“ऑटोमेशन एक्स्पो 2026′ मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

ऑटोमेशन एक्स्पो 2026 मध्ये तैवान एक्सलन्स पॅव्हेलियनमध्ये 22 पुरस्कारप्राप्त ब्रँड्स AI एज...

read more
Breaking News