मुंबई : जग्वार लँड रोव्हर इंडियाने घोषणा केली की, भारतामध्ये नवीन लँड रोव्हर डिफेण्डरच्या बुकिंग्जना सुरूवात झाली आहे. २.० लिटर, २२१ केडब्ल्यू (३०० पीएस) पेट्रोल इंजिनसह ४०० एनएम टॉर्क असलेली नवीन डिफेण्डर कम्पलीटली बिल्ट युनिट (सीबीयू्) म्हणून एलिगंट ९० (३ डोअर) आणि व्हर्सिटाइल ११० (५ डोअर) या दोन आकर्षक बॉडी स्टाइल्समध्ये उपलब्ध असेल. या नवीन वेईकलची किंमत ६९.९९ लाख रूपयांपासून (एक्स-शोरूम भारत) आहे. जग्वान लँड रोव्हर इंडिया लि. (जेएलआरआयएल)चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रोहित सुरी म्हणाले: ” नवीन डिफेण्डरच्या आधुनिक २१व्या शतकातील पॅकेजमध्ये संपन्न लीनेजची भर करण्यात आली आहे. ज्यामुळे ही वेईकल ऑन- रोड व ऑफ-रोडवर अत्यंत क्षमताधिष्ठ आहे. भारतात या आयकॉनच्या प्रवेशासह आम्हाला आमच्या ग्राहकांना लँड रोव्हर पोर्टफोलिओमधील सर्वात क्षमताधिष्ठ व टिकाऊ उत्पादन सादर करण्याचा अभिमान वाटत आहे. तसेच या वेईकलमध्ये मूळ वैशिष्ट्ये व कॅरेक्टर कायम ठेवण्यात आले आहेत.”
नवीन डिफेण्डर ९० व ११० या दोन्ही बॉडी स्टाइल्समध्ये बेस, एस, एसई, एचएसई आणि फर्स्ट एडिशन या पाच व्हेरिएण्ट्समध्ये ऑफर करण्यात येईल. साहसी व जिज्ञासू ड्रायव्हर्ससाठी डिझाइन करण्यात आलेल्या नवीन लँड रोव्हर डिफेण्डरमध्ये बसण्यासाठी एैसपैस जागा, अॅक्सेसरी पॅक्स आणि सर्वोत्तम वैशिष्ट्ये आहेत. भारतासाठी नवीन डिफेण्डरमध्ये ३६० सराऊंड कॅमेरा, वेड सेन्सिंग, इलेक्ट्रॉनिक एअर सस्पेंशन (११० मध्ये स्टॅण्डर्ड), स्मार्टफोन पॅक, कनेक्टेड नेव्हिगेशन प्रो,ऑफ-रोड टायर्स, सेंटर कन्सोलसह रेफ्रिजेरेटेड कम्पार्टमेंट (पर्यायी) अशी वैशिष्ट्ये असतील. नवीन लँड रोव्हर डिफेण्डरबाबत अधिक माहिती www.landrover.in येथे उपलब्ध आहे.
ऍब्झॉर्बन्ट स्वच्छता उत्पादने बनवणाऱ्या नोबेल हायजीनचा आयपीओसाठी अर्ज दाखल
Nashik : नोबेल हायजीन लिमिटेड, आर्थिक वर्ष 2026 मधील प्युअर-प्ले (केवळ विशिष्ट उत्पादनांवर लक्ष...




