ब्लेंडर्स प्राईड फॅशन टूर 2019-20 चे समापन

Mar 4, 2020

मुंबई : जीवनातील अभिमानास्पद आनंदाची सृष्टी दर्शवत, सादर केला जाणारा ब्लेंडर्स प्राईड फॅशन टूर त्याच्या पारंपारिक पद्धतीच्या पुढे जाऊन माइलस्टोनमधील 15 व्या आवृत्तीमध्ये असामान्य स्वरुपात फॅशनचा नवीन चेहेरा उघड करत आहे. फॅशनच्या या भव्य समारंभाची सांगता ‘द प्राईड ऑफ इंडीया’ असामान्य आणि आकर्षक अशा फिनाले द्वारे झाली असून त्यामध्ये एफडीसीआय चे सहकार्य लाभले व प्रख्यात 15 डीझायनर्स चा सहभाग होता ते म्हणजे अब्राहम व ठाकोर, अबु जानी संदीप खोसला, अनामिका खन्ना, अंजू मोदी, आशिष एन सोनी, गौरव गुप्ता, जेजे वालाया, मनिष मल्होत्रा, मोनिशा जयसिंग, नम्रता जोशीपुरा, राघवेंद्र राठोड, राजेश प्रताप सिंग, रोहीत गांधी व राहुल खन्ना, सुनीत वर्मा आणि वेन्डेल रॉड्रीक्स. त्या सायंकाळची शान वाढवली ती ब्रान्ड एम्बेसेडर प्रियंका चोप्रा जोनास हीने जी अनन्यसाधारण दिसत होती.
एका अद्वितिय कार्यक्रमाच्या स्वरुपात, 15व्या वर्षीचा हा आयकॉनिक ब्लेंडर्स प्राईड फॅशन टूर अगदी वेगळ्या स्वरुपाचा असून आशिष सोनी हे क्युरेटर-इन-चिफ होते तसेच इंडस्ट्रीतील नावाजलेला लीडर समजले जाणाऱ्या डीझाईन काऊंसील ऑफ इंडीया(एफडीसीआय), चे सहकार्य या समारंभाला लाभले. केवळ फॅशनला केंद्रस्थानी ठेवत, या फॅशनच्या समारंभामध्ये त्याच्या तीन थीम्स च्या माध्यमातून प्राईड ची सृष्टी निर्माण करण्यात आली होती त्या म्हणजे- क्राफ्ट, ब्लेंड व आयडेंटीटी. तसेच ‘प्राईड(अभिमान)’ म्हणजे यशाचे अर्थपूर्ण स्वरुप असून या एडीशन मध्ये व्यक्तित्व हे स्टेज च्या केंद्रस्थानी होते,खरे तर भारताच्या मूळ ‘क्राफ्ट’, ‘ब्लेंड’ च्या प्रदर्शनात विविधतेचा प्रभावही होता, आणि वेगळे असे ‘व्यक्तित्व’ देखील प्रकटीकरणाच्या कॅनव्हस वर होते.नेहमीप्रमाणे फॅशनच्या क्षेत्रामध्ये पुढे वाटचाल करत, या टूर मध्ये -द शोकेस- हा नवीन एलीमेंट देखील लाँच करण्यात आला ज्याद्वारे महत्वाकांक्षी फॅशन डीझायनर्स आणि मॉडेल्स ला मार्गदर्शनासह ब्लेंडर्स प्राईड फॅशन टूर मध्ये स्वतःची क्षमता दर्शवता आली.
मुंबी येथील ब्लेंडर्स प्राईड फॅशन टूर मधील फॅशनच्या समारंभामध्ये वेगवेगळ्या सेगमेंट्स चा समावेश करण्यात आला होता जसे कलेक्शन गॅलरी, द शोकेस आणि स्टाईल फोरम ज्यातील प्रत्येकामध्ये फॅशनचा नवनवीन पैलू दर्शवण्यात आला. यामध्ये 82 आयकॉनिक पीसेस चा कलात्मक डीसप्ले होता. कलेक्शन गॅलरीमध्ये तीन क्षेत्र समाविष्ट होते- क्राफ्ट, ब्लेंड, आयडेंटीटी ज्यामध्ये 78 प्रख्यात डीझायनर्स होते जसे कुणाल रावल, अल्पना नीरज, अकारो बाय गौरव, जय गुप्ता, शंतनु व निखिल, अनाविला मिश्रा, ईकाइ बाय रागिणी आहुजा, किरण उत्तम घोष, शाहाब दुराझी, नौशाद अली, स्वाती कलसी, पायल जैन, राहुल मिश्रा, पंकज व निधी आणि ध्रुव कपूर. शोकेस अंतर्गत विजेत्या डीझायनर्स ची डीझाईन्स प्रदर्शित केली होती जसे इक्षित पांडे(क्वॉड), सुशांत अब्रोल(कंट्रीमेड) आणि स्टँझिन पाल्मो (झिलझॉम).स्टाईल फोरम वर, आशिष सोनी, डेव्हीड अब्राह, नम्रता जोशीपुरा, चिंकी सिन्हा आणि सुनिल सेठी सारखे या उद्योगातील निष्ठावान समर्थक मॉडरेटर अनाइता श्रॉफ अडाजानिया बरोबर एकत्र आले आणि फॅशन एरीना मधील एकमेकांच्या कल्पनांवर बौद्धिक देवाणघेवाण झाली, तसेच ‘भारतीय फॅशन इंडस्ट्रीचा प्रवास कसा होता आणि त्याचे भविष्य कसे असेल?’ हा विषय केंद्रस्थानी होता.

अजून बातम्या वाचा..

ऍब्झॉर्बन्ट स्वच्छता उत्पादने बनवणाऱ्या नोबेल हायजीनचा आयपीओसाठी अर्ज दाखल

Nashik : नोबेल हायजीन लिमिटेड, आर्थिक वर्ष 2026 मधील प्युअर-प्ले (केवळ विशिष्ट उत्पादनांवर लक्ष...

read more
“ऑटोमेशन एक्स्पो 2026′  मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

“ऑटोमेशन एक्स्पो 2026′ मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

ऑटोमेशन एक्स्पो 2026 मध्ये तैवान एक्सलन्स पॅव्हेलियनमध्ये 22 पुरस्कारप्राप्त ब्रँड्स AI एज...

read more
Breaking News