न्युट्रिशन सप्लिमेंट असलेल्या Quista kidz ला मिळाले दोन पुरस्कार

Mar 4, 2020

मुंबई – हिमालया ड्रग कंपनी तर्फे वय वर्ष ३ ते १० या वयोगटांतील मुलांसाठी सुपर टेस्टी पोषक सप्लिमेंट असलेल्या Quista kidzला बाजारपेठेतील दोन सन्मान प्राप्त झाले आहेत. सीआयएमएस मेडिका तर्फे आयोजित करण्यात येणार्‍या ‘न्युट्रिशन ॲन्ड वेलनेस२०१९’ यापरिषदेच्या पाचव्या पर्वांत या उत्पादनाला मोस्ट ‘इन्नोवेटिव्ह पेडिॲट्रिक न्युट्रास्युटिकल ब्रॅन्ड’ चा एक पुरस्कार असून दुसरा पुरस्कार म्हणजे ईटी नाऊ- राईझ विथ इंडिया तर्फे आरोग्य विभागातील सर्वोत्कृष्ट कार्यासाठी ‘इमर्जिंग पेडिॲट्रिक न्युट्रास्युटिकल ब्रॅन्ड’ होय. ‘न्युट्रिशन ॲन्ड वेलनेस २०१९’ या परिषदेकडून कंपन्यांद्वारे सकारात्मक आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोनाचा वापर केलेल्या कंपन्यांचा तसेच नाविन्याचा उपयोग करून कंपन्यांमध्ये असलेल्या स्पर्धात्मकतेचा गौरव केला जातो. ईटी नाऊ-राईझ विथ इंडिया हा विश्वसनीय मंचांपैकी एक असून या मंचा द्वारे संस्थां कडून आपापल्या क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामांची दखल घेतली जाते. हे दोन पुरस्कार मिळल्या बद्दल आपले मत व्यक्त करतांना हिमालया ड्रग कंपनी च्या फार्मास्युटिकल्स विभागाचे बिझनेस डायरेक्टर श्री सुरेश टी एल यांनी सांगितले “ ग्राहकांचा एक वेलनेस भागिदार म्हणून आम्ही नेहमीच ग्राहकांच्या सध्या खूपच गरज असलेल्या मायक्रोन्युट्रियंट्स आणि व्हिटॅमिन्स ची गरज पूर्ण करण्यावर लक्ष देत आहोत. यामुळे मुलांमध्ये ‘हिडन हंगर’ निर्माण होऊन मुलांचा विकास आणि वाढ खुंटते. क्विस्टा किड्स ची निर्मिती ही शास्त्रोक्त पध्दतीने संशोधन करून पोषक घटक आणि समयोचित अशा परंपरागत
घटकांपासून करण्यात आल्याने मुलांची वाढ व विकास होण्यास मदत होते.” न्युट्रिशन ॲन्ड वेलनेस २०१९ या परिषदेचे आयोजन सीआयएमएस मेडिका द्वारे करण्यात येत असून ही संस्था न्युट्रास्युटिकल बाजारपेठेतील विविध क्षेत्रातील जसे संशोधन आणि विकास, उत्पादन, पॅकेजिंग,वितरण इत्यादी क्षेत्रातील कामाची दखल घेते. आरोग्य क्षेत्रातील सर्वोत्कृष्टता निवडून बाजारपेठेत एक पाऊल पुढे जाण्यावर जोर दिला जातो. आरोग्य सेवा प्रदात्यां बरोबर काम करून या मंचा तर्फे आता भारतीय आरोग्य क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा ही येथे गौरव केला जातो.
Quista kidz मध्ये वनौषधींचे गुणधर्म आहेत यांतील घटकांमध्ये दूधाची प्रथिने जी मुंलाच्या वाढीस मदत करतात, आल्या मुळे पचनक्रिया सुधारते, इनुलिन मध्ये प्रोबायोटिक फायबर असल्याने पोटाचे आरोग्य सुधारते. यपामध्ये कोलोस्ट्रम, तुळस आणि ए, सी आणि ई सारखी व्हिटॅमिन्स असल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते फॉलिक ॲसिड, व्हिटॅमिन बी १२, लोह, आयोडीन तसेच बदाम आणि मंडूकपर्णी सारख्या घटकांमुळे स्मरणशक्ती वाढीसही मदत होते.

अजून बातम्या वाचा..

ऍब्झॉर्बन्ट स्वच्छता उत्पादने बनवणाऱ्या नोबेल हायजीनचा आयपीओसाठी अर्ज दाखल

Nashik : नोबेल हायजीन लिमिटेड, आर्थिक वर्ष 2026 मधील प्युअर-प्ले (केवळ विशिष्ट उत्पादनांवर लक्ष...

read more
“ऑटोमेशन एक्स्पो 2026′  मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

“ऑटोमेशन एक्स्पो 2026′ मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

ऑटोमेशन एक्स्पो 2026 मध्ये तैवान एक्सलन्स पॅव्हेलियनमध्ये 22 पुरस्कारप्राप्त ब्रँड्स AI एज...

read more
Breaking News