हिंदवेअर अप्लायन्सेसचे सिलिंग फॅनच्या क्षेत्रात पदार्पण

Mar 7, 2020

मार्च २०२०: ग्राहकोपयोगी उपकरणांच्या क्षेत्रातील आपले स्थान बळकट करण्यासाठी हिंदवेअर अप्लायन्सेसची निर्माती असलेल्या सोमाणी होम इनोव्हेशन लिमिटेडने आपल्या ‘हिंदवेअर स्नोक्रेस्ट’ या ब्रँडच्या नावाने सिलिंग फॅनच्या क्षेत्रात पदार्पण केले आहे.
आजच्या चाणाक्ष ग्राहकांच्या घरांना एक नवा ताजा लूक देण्याच्या दृष्टिने हिंदवेअर स्नोक्रस्ट पंख्यांचे डिझाइन तयार केले असून, नव्या युगातील भारतीय घरांसाठी विशेषत्वाने हे पंखे तयार करण्‍यात आले आहेत. प्रीमियम, डेकोरेटिव्ह आणि क्लासिक या श्रेणींमध्ये या पंख्यांची सहा मॉडेल्स उपलब्ध होणार आहेत. शुभारंभाची किंमत म्हणून १४९९ ते २९९९ रुपयांदरम्यान या मॉडेल्सच्या किंमती असतील, जे दुकानांत आणि ई-कॉमर्स वेबसाइटवर उपलब्ध असतील. स्वच्छ करायला सोपी अशी धुळप्रतिरोधक पाती, हवेचे समान वाटप व्हावे यासाठी एरोडायनॅमिक पाती, कमी व्होल्टेजमध्येही अधिकाधिक हवा देणारे अशी या पंख्यांची वैशिष्ट्ये आहेत. या पंख्यांवर २ वर्षांची वॉरंटी असून, ते चॉकलेट गोल्ड, मेटॅलिक बिइंग कॉपर, डार्क वॉलनट ब्राँझ आणि व्हाइट मेटॅलिक सिल्व्हर या रंगांमध्ये उपलब्ध आहेत.
एअर प्युरिफिकेशन आणि एअर-कुलिंग विभागात हिंदवेअरच्या उपकरणांच्या अद्ययावत तंत्रज्ञान व संशोधनाधारित फीचर्सना स्वीकारार्हता आणि यश मिळाल्यानंतर कंपनीने सिलिंग फॅनच्या क्षेत्रात पदार्पण करून एअर ट्रिटमेंट व्यवसायातील आपल्या उत्पादनांच्या श्रेणीचा विस्तार केला आहे.
या लाँचवेळी सोमाणी होम इनोव्हेशन लिमिटेड कंपनीचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी आणि पूर्णवेळ संचालक राकेश कौल म्हणाले, ”ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊनच आम्ही फॅनच्या क्षेत्रात पदार्पण केले आहे. आमचे विस्तृत वितरण जाळे, संशोधन व विकसन आणि उत्पादन विकास विभाग आमच्या वाढत्या ग्राहकांच्या गरजांची पूर्तता करत आहे. आम्ही देशातील सर्वोत्तम उत्पादन व डिझायनिंग कंपन्यांशी हातमिळवणी केली असून, स्पर्धात्मक किंमतींत सर्वोत्तम कार्यक्षमता देणारी उत्पादने तयार करण्याचा आमचा मानस आहे.”
ते पुढे म्हणाले, ”आमचा ‘ग्राहकांच्या हाती सत्ता’ सोपवण्यावर विश्वास आहे आणि म्हणूनच आम्ही नुकतेच स्मार्ट (आयओटी सज्ज) किचन चिमणी, वॉटर प्युरिफायर आणि वॉटर हीटर बाजारात आणला आहे. येत्या काही काळात आम्ही आमच्या इतर उपकरणांमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटीची सोय उपलब्ध करून देणार आहोत.”भारतात दरवर्षी ११० दशलक्ष पंखे विकले जातात, या बाजारपेठेची वार्षिक उलाढाल सुमारे ८००० कोटी रुपये इतकी आहे. सिलिंग फॅन हे सामान्य घरांत वापरले जाणारे उपकरण असून गेल्या काही वर्षांत पंख्यांच्या व्यवसायात सातत्याने दोनअंकी वाढ झाली आहे. भारतातील पंख्यांच्या बाजारपेठेचा विचार केला तर सिलिंग, टेबल, वॉल, पेडेस्टल, एक्झॉस्ट आणि मल्टि युटिलिटी फॅन या प्रकारच्या पंख्यांचा समावेश होतो. या प्रकारच्या पंख्यांच्या एकूण विक्रीत सिलिंग फॅनचा वाटा ७७ टक्के आहे. इंडिया इलेक्ट्रिक फॅन मार्केट आउटलूक २०२० या मासिकातील माहितीनुसार गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत संघटित इलेक्ट्रिक पंख्यांच्या बाजारपेठेत १० टक्क्यांहून अधिक सीएजीआर वाढत आहे. वॉटर हीटर्स व वॉटर प्युरिफायर्सपासून ते एअर कूलर्स, एअर प्युरिफायर्स, एक्स्ट्रॅक्टर फॅन्स आणि किचन अप्लायन्सेस अशी उत्पादनांची श्रेणी उपलब्ध करून देणारी हिंदवेअर अप्लायन्सेस ही भारतातील वेगाने विकसित होणार ग्राहकोपयोगी वस्तू तयार करणारी कंपनी आहे. कंपनीची ही सर्व उत्पादने ही नव्या युगातील आजच्या जीवनशैलीला साजेशी असून, भारतातील घरांना नवेपणा देण्यामध्ये हातभार लावत आहेत. सध्या सोमाणी होम इनोव्हेशन लिमिटेडच्या (एसएचआयएल) व्यवसाय जाळ्यामध्ये ९२५० हून अधिक रिटेलर्स आणि मॉडर्न रिटेल आउटलेट्स, ५७५हून अधिक ट्रेड पार्टनर नेटवर्क आणि २००हून अधिक डिस्ट्रिब्युटर्सचा समावेश होतो. नुकतेच कंपनीने आयओटी सज्ज वॉटर प्युरिफायर्स, वॉटर हीटर्स आणि चिमणी ही उत्पादने बाजारात सादर करून आपली उत्पादन श्रेणी विस्तारली आहे.

अजून बातम्या वाचा..

Breaking News