महाराष्ट्रातील १५ पेक्षा जास्त टॉय्ज असोसिएशन्सने ऑल इंडिया टॉय्ज फेडरेशनला पाठिंबा

Mar 12, 2020

मुले खेळण्यांपासून वंचित राहू नये यासाठी महाराष्ट्रातील १५ पेक्षा जास्त टॉय्ज असोसिएशन्सने ऑल इंडिया टॉय्ज फेडरेशनला (एआयटीएफ) पाठिंबा दिला. खेळण्यांवरील आयात शुल्कात झालेल्या वाढीच्या विरोधात आवाज उठवणे हे त्यांचे मुख्य ध्येय आहे.आंदोलकांना संबोधित करताना एआयटीएफचे उपाध्यक्ष श्री. अब्दुल्ला शरीफ म्हणाले की “सरकारने आयात शुल्कात वाढ केली तसेच नवीन कडक गुणवत्ता नियंत्रण आदेश (क्यूसीओ) दिले त्याविरोधात आवाज उठवणे हे आमचे ध्येय आहे.”मुले खेळण्यांवाचून वंचित राहू नये म्हणून अनेक टॉय असोसिएशन एआयटीएफला पाठिंबा जाहिर करीत आहेत. युनायटेड टॉय्ज असोसिएशन, एलाईट टॉय्ज असोसिएशन, मास्टर्स टॉय्ज असोसिएशन, नाशिक टॉय्ज असोसिएशन, ऑल टॉय्ज असोसिएशन, डायमंड टॉय्ज असोसिएशन, स्काय टॉय्ज असोसिएशन, नागपूर टॉय्ज असोसिएशन, रायपूर टॉय्ज असोसिएशन, रॉयल टॉय्ज असोसिएशन, सुपर टॉय्ज असोसिएशन आणि चॉईस टॉय्ज असोसिएशन हे महाराष्ट्रातील एआयटीएफचे काही सदस्य आहेत.या प्रसंगी एआयटीएफचे प्रवक्ता रेहान धोराजीवाला म्हणाले की “या मंचामुळे खेळणी उद्योगाशी संबंधित सर्व समस्यांचे निराकरण एका छताखाली होणार आहे. आम्हाला आशा आहे की या उपक्रमामुळे आम्हाला एकतेचं बळ मिळेल तसेच उच्च अधिकार्‍यांशी चर्चा करताना लक्षणीय उपस्थिती दिसून येईल आणि या मोठ्या व अत्यावश्यक उद्योगाचा कोणताही भाग दुर्लक्षित राहणार नाही याची आम्ही खात्री करु शकतो.”मुंबई स्थित फेडरेशन भारतीय खेळण्याच्या उद्योगातील विविध स्तरातल्या सदस्यांचे प्रतिनिधित्व करते. सध्याच्या वाढीव आयात शुल्काविरोधात आवाज उठवण्याव्यतिरिक्त या मंचावर सर्व खेळण्याचे निर्माते आणि विक्रेते त्यांच्याशी संबंधित असलेल्या मुद्द्यांवर भेटून चर्चा करु शकतील, उहापोह करु शकतील आणि मोठ्या स्तरावर त्यांच्या तक्रारी आणि चिंता व्यक्त करु शकतील.   सबंध भारतात विविध केंद्रांवर एआयटीएफचे व्यापार प्रतिनिधी असतील. आवश्यकतेनुसार फेडरेशन सरकार आणि अन्य नियामक अधिकार्‍यांना निवेदन देईल. एआयटीएफ भारतीय खेळण्यांच्या उद्योगाचे प्रतिनिधित्व करते, मोठ्या प्रमाणात ग्राहक संख्या वाढवून एआयटीएफ २०२४ पर्यंत $3.3 बिलियनपर्यंत वृद्धींगत होण्याची अपेक्षा आहे. काळ बदलला असल्यामुळे पालक आणि मुले नाविन्यपूर्ण इलेक्ट्रॉनिक टॉय्ज, इंटलिजेंट टॉय्ज, प्लश टॉय्ज आणि रोल प्लेवर आधारित सेट्सकडे आकर्षित झाले आहेत. शैक्षणिक खेळणी, राईड-ऑन्स, कंस्ट्रक्षन आणि बिल्डिंग सेट्स, बाहुल्या आणि बोर्ड गेम्सना सुद्धा समान मागणी आहे.तथापि हा उद्योग आता आव्हानात्मक परिस्थितीला सामोरा जात आहे – जागतिक मंदी, स्थिर देशांतर्गत मागणी आणि दरांमुळे व्यापारी, किरकोळ विक्रेते, घाऊक विक्रेते आणि उत्पादक यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आणि त्यांच्या जीवनमानावर विपरित परिणाम होत आहे.

अजून बातम्या वाचा..

Breaking News