नाशिक : भारतातील सर्वात मोठी वाईनरी असलेल्या सुला विनयार्डसतर्फे कोविड 19 विरूद्धच्या लढ्याला बळ देण्यासाठी वीस लाखांची भरीव मदत केलेली आहे. यापैकी आठ लाख रूपये पीएम-केअर व आठ लाख रूपये महाराष्ट्र स्टेट डिजास्टर मॅनेजमेंट ऑथोरिटी (एमएसडीएमए) यांना मदत म्हणून पाठविले आहे. तर उर्वरित रक्कम नाशिक परीसरातील विविध सामाजिक कामांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे.या आर्थिक मदतीसोबतच सुलाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेत त्यांच्या वैयक्तिक क्षमतांप्रमाणे वेगवेगळ्या रिलीफ फंडांना मदत निधी उपलब्ध करून देतांना सामाजिक भान जपले आहे. काहींकडून मास्क व गरजूंना भोजन उपलब्ध करून देण्याच्या कार्यातही हातभार लावण्यात आला आहे. सुलाच्या सीएसआर निधीतून केलेली मदत ही कोविड-19च्या उच्चाटनासाठी निश्चित उपयोगी ठरणार आहे. सामाजिक उत्तरदायित्त्व पार पाडत असतांना कंपनीतर्फे कर्मचाऱ्यांच्या मानसिक व शारीरीक आरोग्याचीदेखील काळजी घेतली जाते आहे. ‘वुई केअर’ या सुलाच्या अभिनव उपक्रमांतर्गत सर्व कर्मचाऱ्यांकडून शासनाने जारी केलेल्या दिशानिर्देशांचे काटेकोरपणे पालन केले जाते आहे.
समिट एसआयएफकडून समिट अॅक्टिव्ह अॅसेट अॅलोकेटर लाँग-शॉर्ट फंड लाँच
नाशिक: समिट एसआयएफने आज समिट अॅक्टिव्ह अॅसेट अॅलोकेटर लाँग-शॉर्ट फंडच्या लाँचची घोषणा केली. (हे...



