डॉ. धनंजय दातार यांची आखाती प्रदेशातील अब्जाधीश भारतीयांच्या यादीत आठव्या क्रमांकावर झेप

Jun 11, 2020

दुबई स्थित अल अदील ट्रेडिंग कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी आखाती प्रदेशातील अब्जाधीश भारतीयांच्या यादीत आठव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. अरेबियन बिझनेस या जागतिक ख्यातीच्या माध्यमगृहाने वर्ष २०२० साठीची ही यादी द इंडियन बिलीयनर्स क्लब या शीर्षकाखाली नुकतीच प्रसिद्ध केली. केवळ वर्षभरात त्यांनी व्यवसायाची प्रगती व विस्तार परिश्रमपूर्वक घडवत आखाती प्रदेशातील (जीसीसी रीजन) आघाडीच्या दहा अब्जाधीश भारतीयांमध्ये स्थान मिळवले आहे.

 

दुबईच्या शासकांनी धनंजय दातार यांना मसालाकिंग बहुमानाने संबोधून त्यांच्या परिश्रम आणि कर्तृत्वाचा यथोचित गौरव केला आहे. दातार यांना भारताबरोबरच जागतिक स्तरावरही अनेक प्रतिष्ठित पुरस्कार लाभले आहेत. फोर्ब्स मिडल ईस्ट तर्फे टॉप इंडियन लीडर्स इन द अरब वर्ल्ड यादीत मानांकन देऊन त्यांचा गौरव होत आहे. फोर्ब्स मिडल ईस्ट च्या मानांकन यादीत आखातातील आघाडीच्या १०० भारतीयांमध्ये सातत्याने झळकणारे ते बहुधा एकमेव महाराष्ट्रीय आहेत. भारतीय संस्कृतीचे आखाती देशांमध्ये संवर्धन करण्यास तसेच दुबईमध्ये मराठी उपक्रम राबवण्यास ते सातत्याने मदत करतात त्यांना मुंबईत मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे सामाजिक उद्योजकता क्षेत्रातील योगदानाबद्दल विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.अनेक भारतीय लोक आखाती देशांमध्ये अडकून पडले असून मायदेशी परतण्यासाठी आतुर आहेत. अशा गरजू भारतीयांच्या मदतीसाठी डॉ. दातार  यांनी  आतापर्यंत तीन हजारांहून अधिक निर्धन भारतीयांना परतीच्या प्रवासाचे मोफत विमान तिकीट  आणि  अनिवार्य वैद्यकीय चाचणीचा खर्चही उचलला आहे. हे काम पुढील काही महिने सुरूच राहील. महाराष्ट्रातून गेलेले सुमारे ६०,००० भारतीय अद्यापही दुबईत अडकून पडले आहेत. त्यांना लवकरात लवकर व सुखरुप घरी परतता यावे यासाठी डॉ. दातार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी नुकताच संपर्क साधला आहे. माननीय ठाकरे यांनीही त्वरित प्रतिसाद देऊन केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला आहे. परिणामी दुबई ते मुंबई दरम्यान विमान वाहतूक लवकरच पुन्हा सुरू होईल. आपल्या अधिकाधिक देशबांधवांना संकटाच्या काळात मदतीचा आधार देण्याचा निश्चय डॉ. दातार यांनी केला आहे.

अजून बातम्या वाचा..

ऍब्झॉर्बन्ट स्वच्छता उत्पादने बनवणाऱ्या नोबेल हायजीनचा आयपीओसाठी अर्ज दाखल

Nashik : नोबेल हायजीन लिमिटेड, आर्थिक वर्ष 2026 मधील प्युअर-प्ले (केवळ विशिष्ट उत्पादनांवर लक्ष...

read more
“ऑटोमेशन एक्स्पो 2026′  मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

“ऑटोमेशन एक्स्पो 2026′ मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

ऑटोमेशन एक्स्पो 2026 मध्ये तैवान एक्सलन्स पॅव्हेलियनमध्ये 22 पुरस्कारप्राप्त ब्रँड्स AI एज...

read more
Breaking News