मिनिस्ट्री ऑफ ह्यूमन रिसोअर्स डेव्हलोपमेंट ( यच.आर.डी.सी ) द्वारे २०२० साली संपूर्ण भारत भरात घेण्यात आलेल्या महाविद्यालया च्या गुणवत्ता पूर्ण शिक्षण व संसाधने, संशोधण व उच्य व्यवसायिक शिक्षण, सर्वसमावेशकता या मुद्यांवर आधारित सर्वेक्षणात ११ जून २०२० रोजी मानव संसाधन व विकास मंत्री श्री रमेश पोखरियाल निशंक यांच्या कडून या मानांकनाची घोषणा करण्यात आली ज्यात ७५ ते १०० प्राधान्य श्रेणीत येण्याचा बहुमान मुंबई एजुकेशन ट्रस्ट चे इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी महाविद्यालयाने मिळवला आहे. २००६ मध्ये सुरु झालेल्या या महाविद्यालयाने आतापर्यंत एन. बी .ए ऍक्रिडिटेशन, पुणे विद्यापीठ स्टूडन्ट वेलफेयर असोसिएशन कडून दिला जाणारा उत्कृष्ट महाविद्यालयाचा पुरस्कार देखील मिळवला आहे. महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी अतिशय महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या जी.पॅट परीक्षेत उत्तम कामगिरी करत संस्थेच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवण्याचा काम करत आहे. फार्मसी व संशोधन च्या क्षेत्रात भरीव कामगिरी करत असताना अनेक शोधनिबंध नामांकित नियतकालिकांमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे तसेच एकना अनेक नाविन्यपूर्ण विषयांवर संशोधन करण्यासाठी लागणार निधी मिळवत संशोधन विद्यार्थ्यां कडून केले जात आहे. महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ते बरोबरच व्यक्तिमत्त्व विकासावर लक्ष दिले जात आहे, या व अश्या अनेक स्तरांवर यशस्वी वाटचाल करत संस्था यशाचे शिखर गाठत आहे यात मॅनॅजमेण्ट,ट्रस्टी, प्राचार्य संजय क्षीरसागर,सर्व शिक्षक यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.
ऍब्झॉर्बन्ट स्वच्छता उत्पादने बनवणाऱ्या नोबेल हायजीनचा आयपीओसाठी अर्ज दाखल
Nashik : नोबेल हायजीन लिमिटेड, आर्थिक वर्ष 2026 मधील प्युअर-प्ले (केवळ विशिष्ट उत्पादनांवर लक्ष...




