मॉडेल करिअर सेंटर (एमसीसी), करिअर समुपदेशना बरोबरच काऊन्सिलिंग वर प्रथम लक्ष देऊन विविध प्रकारच्या रोजगार संबंधित सेवा देण्याचे उद्दीष्ट ठेवते. सीआयआय मॉडेल करिअर सेंटर (सीआयआय एमसीसी) हा उपक्रम २०१६ मध्ये सुरू झाला, ज्यायोगे युवकांना करिअर समुपदेशन आणि प्लेसमेंट- नोकरी देण्याच्या उद्देश्याने प्रयत्न केले जात आहेत.
१२ लाख तरूणांना नोकरी मिळवण्यासाठी, त्यांच्या योग्यतेनुसार आणि क्षमतेनुसार नोकरीचा योग्य पर्याय निवडून देण्यासाठी सीआयआयने गुरुग्राम, मुंबई आणि चेन्नई येथे मॉडेल करियर सेंटर च्या स्थापन केल्या आहेत. आता संपूर्ण भारतात २४ सीआयआय एमसीसी सेंटर स्थापन झाले आहेत. सीआयआय-एमसीसी नोकरी शोधणाऱ्या तरूण / उमेदवारांची नोंदणी करतात, त्यांची इंटरेस्ट मॅपिंग टेस्ट घेऊन करिअर समुपदेशन सोबत काऊन्सिलिंग करून (व्यावसायिक मार्गदर्शनासाठी ऑनलाईन करिअर इंटरेस्ट टेस्ट साधन वापरुन) नोकरीच्या संधी निर्माण करतात आणि जॉब फेअर आयोजित करतात. पुढे स्कील्स गॅप विश्लेषण देखील करतात, नोकरी मिळे पर्यंत योग्य तो पाठपुरावा आणि नोंदणी हि करतात.
सीआयआय एमसीसी वतीने घेण्यात आलेले काही उत्तम उपक्र१. राज्यभरात २९ युवा रोजगार सेवा (येस) केंद्रे व्यवस्थापित करण्यात आली आहेत, यासाठी प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिट (पीएमयू) स्थापित करून. कर्नाटक राज्यातील वार्षिक ४०,००० पेक्षा जास्त तरुणांना मार्गदर्शन व नोकरी देण्यासाठी मदत करण्यात येणार आहे.
२.नीती आयोग यांच्या सोबत विशेष गरजू जिल्ह्यांमध्ये ट्रेनिंग सेंटर उभारून त्यांना मदत करण्याचा हेतू आहे. आता पर्यंत १२ जिल्ह्यांमध्ये काम चालू केले असून लवकरच सर्व जिल्ह्यांमध्ये आम्ही काम चालू करणार आहोत.
३. रेल टेल या प्रोजेक्ट अंतर्गत “रेल्वे साथी” – म्हणून आंध्र प्रदेश, गुजरात आणि अरुणाचल प्रदेश या तीन राज्यांतील ३४ रेल्वे स्थानकांवर कौशल्य उद्योजकांना प्रशिक्षण आणि माहिती देण्यासाठी रेलटेल सह भागीदारीत एक प्रकल्प चालू करण्यात आला आहे. हे रेल्वे साथी देखील मॉडेल करिअर सेंटर पॉईंट असतील. या मुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्यास मदत होईल.
४. एसएनडीटी विद्यापीठाच्या १५००० विद्यार्थिनींना करिअर समुपदेशन करून आणि सात हजार मुलींना इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करुन दिल्या. यासाठी UNDP महाराष्ट्र चे विशेष सहकार्य मिळाले.
५. “बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळा – २०१९”, यामध्ये राज्यभरातील १५ Job जॉब फेअरची मालिका DIC- उद्योग विभाग महाराष्ट्र सरकार यांच्या सहकार्याने केली गेली, महाराष्ट्रातील १
लाखांहून अधिक तरुणांना याचा नोकरी मिळण्याकरता विशेष फायदा झाला आणि राज्यातील ४०,००० हून अधिक तरुणांना रोजगार मिळाला उपलब्ध करण्यात आला.
६. भारतामधील ६ राज्यात ३०००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे करिअर काऊन्सिलिंग करता नोंदणी करून त्याचा विशेष फायदा घेतला.
७. अपंग विद्यार्थी आणि पोलीस वर्ग याच्या साठी विशेष मेळाव्यांचे आयोजन.
सीआयआय एमसीसीच्या माध्यमातून आम्ही चार लाखाहून अधिक लोकांना करिअर काऊन्सिलिंग देऊन आणि १.३५ लाखांना जॉब प्लेसमेंट उपलब्ध करून देऊन चांगला सामाजिक परिणाम घडविण्यास आम्ही मदत केली, तसेच भारतभर १०० पेक्षा जास्त जॉब मेळाव्यांचे आयोजन करून नोकरी उत्सुक मुलांना सहकार्य केले. यामुळे केवळ मोठ्या प्रमाणात औद्योगिक संस्थांना फायदा झाला नाही, तर उद्योगासाठी लागणारे मनुष्य बळ उभे करण्यास आम्हालाही हातभार लावता आला.
सीआयआय एमसीसी या उपक्रमाचे विस्तार करण्यासाठी, आम्ही आता अॅप आणि पोर्टलद्वारे डिजिटल करीत आहोत, ज्यायोगे नोकरी शोधणारे भारतातील तरुण कोठूनही नोंदणी करू शकतात आणि नोकरीमध्ये केवळ त्याच्या / तिच्या क्षेत्रातीलच नव्हे तर पूर्ण इंडियामध्ये नोकरीच्या संधीचा फायदा घेऊ शकतात. उद्योजक आपल्या उद्योगाची नोंदणी करू शकता, आणि आपल्या मनुष्य बळाच्या पूर्ततेसाठी पोस्ट करू शकता. यासाठी भारतातातील सर्व उमेदवार आपली नोंदणी करू शकतात. त्याद्वारे पुढील ५ वर्षांच्या कालावधीत २० लाखांहून अधिक तरूण / नोकरी साधकांना प्लेसमेंटच्या संधी प्रदान करून देण्याचा उद्देश आहे.यासाठी सर्व विद्यार्थ्यांना विशेष विनंती करतो कि, आपण अँप डाउनलोड करून आपली नोंदणी करावी आणि आपला आवडता जॉब लवकरात लवकर प्राप्त करावा. हि सेवा पूर्ण मोफत आहे.
अधिक माहितीसाठी : Dayal Kangne : Dayalk.ciimcc@apnajob.com
So please down load the app with help of following link
For candidates: https://bit.ly/apnajobcandidate
For industry to post their requirement: https://bit.ly/apnajobemployer




