रुपारेल कॉमर्स ॲकेडमीच्या विद्यार्थ्यांची १२वी परीक्षेत बाजी

Jul 21, 2020

नाशिक : नाशिकच्या कॉलेज रोड येथील रुपारेल कॉमर्स ॲकेडमीच्या विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षेत घवघवीत यश मिळवून ॲकेडमीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. यात अनन्या सिंघ हिला अकाऊंट्स मध्ये ९८ मार्क, सेक्रेटरिअल प्रॅक्टिस मध्ये ९५ मार्क, ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स मध्ये ८९ मार्क मिळाले. तर, रिद्धी कलंत्री हिला अकाऊंट्स मध्ये ९२ मार्क, सेक्रेटरिअल प्रॅक्टिस मध्ये ९० मार्क, ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स मध्ये ९१ मार्क, इकॉनॉमिक्स मध्ये ८६ मार्क मिळाले. आणि जानवी सुखिजा हिला अकाऊंट्स मध्ये ९४ मार्क, सेक्रेटरिअल प्रॅक्टिस मध्ये ८८ मार्क मिळाले. तसेच आयुष भांगडीया याला अकाऊंट्स मध्ये ९२ मार्क मिळाले. त्याचबरोबर डिंपी पटेल हिला ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स मध्ये ९३ मार्क मिळाले. ॲकेडमीचे अन्य विद्यार्थीही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना रुपारेल कॉमर्स ॲकेडमी संचालक रितेश रुपारेल यांचे मार्गदर्शन लाभले. तर १००% विद्यार्थ्यांच्या यशस्वितेबद्दल संचालक रितेश रुपारेल यांनी समाधान व्यक्त करत विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले आहे. संपर्क : ८१४९१४८३४४ / ९८५००३८१७४

अजून बातम्या वाचा..

Breaking News