नाशिक -: वाधवानी फाऊंडेशनने (डब्ल्यूएफ) आज आर्थिक संकटाने बाधित एसएमईना मदत करण्यासाठी आणि सार्वजनिक आरोग्य कर्मचार्यांना त्यांचे कोविड 19 संबंधित ज्ञान व कौशल्ये सुधारण्यासाठी सहाय्यता उपक्रम सादर केले आहे. वाधवानी फाऊंडेशन ही एक अग्रणी ना-नफा संस्था आहे व भारत आणि इतर विकसनशील देशांमध्ये ही संघटना कार्य करते. वाधवानी फाऊंडेशनचे मिशन हे उद्योजकता, एसएमई संख्यात वाढ करणे आणि कौशल्याद्वारे रोजगारनिर्मितीला गती देणे आहे. सहाय्यतामध्ये वाधवानी फाऊंडेशनने २०० कोटींची गुंतवणूक केली आहे. या मोठ्या आणि गुंतागुंतीच्या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी डब्ल्यूएफने सरकारी मंत्रालये आणि एजन्सी, बँक आणि सल्लागार कंपन्यांशी भागीदारी देखील विकसित करत आहे.
वाधवानी फाऊंडेशन सहाय्यता उपक्रमामध्ये तीन कार्यक्रम आहेत. हे तीन कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहेत. सहाय्यता व्यवसाय स्थिरता कार्यक्रम, सहाय्यता कोविड 19स्किलिंग प्रोग्राम, सहाय्यता सार्वजनिक आरोग्य नावीन्यपूर्ण कार्यक्रम.या कार्यक्रमांवर वाधवानी फाऊंडेशन मागील नव्वद दिवस कार्य करत आहे. आता हे तीन सहाय्यता कार्यक्रम सुरू होण्यासाठी सज्ज आहेत. या कार्यक्रमांची सुरुवात ऑगस्ट 2020 मध्ये होईल.
वाधवानी फाउंडेशनचे संस्थापक आणि अध्यक्ष पद्मश्री डॉ. रोमेश वाधवानी म्हणाले की, कोविड 19 ने एक आरोग्य आणि आर्थिक संकट निर्माण केले आहे जे विशेषत: एसएमई आणि नोकरांना हानी पोहचवित आहे. कोणतीही योग्य पत आणि सल्लामसलत शिवाय एसएमई क्षेत्राचे अल्प आणि दीर्घकालीन नुकसान खूपच मोठे आहे. एसएमईसाठी भारत सरकारने अलीकडेच एक विस्तृत, महत्त्वपूर्ण पतपुरवठा कार्यक्रम स्थापित केला आहे. हा पतपुरवठा कार्यक्रम व सहाय्यता कार्यक्रमात फाउंडेशनची मोठी गुंतवणूक ही १०,००० एसएमईना कोविड 19 आव्हानांचा सामना करताना टिकून राहणे, स्थिर करणे आणि वाढीस आवश्यक असलेल्या तज्ञांसह त्यांना सुसज्ज करण्यास मदत करेल व एसएमईच्या क्षेत्रातील १०,००,००० रोजगार वाचवणे किंवा निर्माण करण्यात मदत करेल. फाउंडेशनचे स्वतःचे सल्लागार, विद्यमान आणि नवीन सामग्री आणि तंत्रज्ञान एसएमईंना प्रो बोनो पद्धतीने प्रदान केले जाईल.




