मेट भुजबळ नॉलेज सिटी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये फार्म.डी. या कोर्सला मान्यता.

Jul 23, 2020

मेट,भुजबळ नॉलेज सिटी आडगाव नाशिक येथील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये फार्म .डी. या कोर्सला AICTE, PCI व सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी (SPPU) मान्यता मिळाली असून 2020- 21 या वर्षापासून या कोर्सला सुरुवात होत आहे.

बारावी सायन्स उत्तीर्ण व फार्मसी जी अधिकृत सीईटी परीक्षा असेल ती विद्यार्थ्यांना द्यावी लागेल. ह्या फार्म. डी. कोर्सचा कालावधी सहा वर्षाचा असणार आहे.

बारावी नंतर सहा वर्ष असा हा कोर्स असून त्यात पाच वर्ष शिक्षण व प्रशिक्षण याचे मिश्रण आहे. हॉस्पिटलमध्ये ही प्रशिक्षण असेल. आणि नंतर 1 वर्षाच्या कालावधीसाठी हॉस्पिटलमध्ये इंटरंशिप असेल.

मेट भुजबळ नॉलेज सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये डी फार्म ते रिसर्च सेंटर म्हणजेच डी. फार्म. नंतर बी. फार्म.नंतर एम.फार्म. आणि तदनंतर संशोधन केंद्रात पीएचडी करणे या सुविधा उपलब्ध आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने प्लॅटिनम पुरस्काराने सन्मानित ही इन्स्टिट्यूट असून, शिक्षण व इंडस्ट्री सोबत संबंध आणि त्यातून संशोधन व नोकरी संदर्भात विद्यार्थ्यांना मिळणारी मदत म्हणून  इन्स्टिट्यूट चा लौकिक आहे.

फार्म. डी. या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना सलग सहा वर्ष शिकल्यानंतर ,फार्मासिटिकल इंडस्ट्रीमध्ये नोकरी व संशोधक म्हणून काम करता येणार आहे.

याचबरोबर शिक्षण तज्ञ म्हणजेच प्राध्यापक म्हणून देशविदेशात काम करण्याची संधी मिळणार आहे. संशोधन हा या कोर्स चा भाग असून संशोधक म्हणून सुद्धा देश-विदेशात काम करण्याची संधी मिळणार आहे.,ज्याला रिसर्च सायंटिस्ट असे म्हणतात. याचबरोबर क्‍लिनिकल फार्मासिस्ट तसेच अनलिटिकल केमिस्ट या पदावरही काम करता येणे सहज शक्य आहे.

हॉस्पिटलमध्ये विशेषता: प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये क्लीनिकल फार्मासिस्ट म्हणून काम मिळू शकते. याचबरोबर सरकारी नोकऱ्यांमध्ये देखील संशोधक तसेच ड्रग इंस्पेक्टर अशा विविध प्रकारच्या नोकऱ्यांमध्ये चांगली संधी मिळू शकते.

यापलीकडे म्हणून परदेशात देखील अग्रगण्य फार्मासिटिकल कंपनी मध्ये व हॉस्पिटलमध्ये  क्लीनिकल फार्मासिस्ट म्हणून संशोधक आणि अँकॅडमिशियन म्हणून मोठी संधी प्राप्त होऊ शकते. या फार्म. डी.कोर्सला फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया कडून मान्यताप्राप्त आहे.

आपण सर्वांनी फार्मसी या क्षेत्राचा होणारा विकास जवळून बघितला आहे, कोरोना किंवा covid-19 या आजाराच्या संदर्भात देखील आपले बघतो आहोत की उत्तरोत्तर फार्मसी म्हणजे औषधनिर्माणशास्त्र या विषयाची व्याप्ती वाढतच जाणार आहे.

संस्थेचे विश्वस्त समीर भुजबळ यांनी फार्म. डी.या कोर्सचा विद्यार्थी व पालकांनी पॉझिटिव्हली विचार करून विद्यार्थ्यांच्या उत्तम करिअरसाठी त्याची निवड करावी , त्यासंदर्भातील सीईटी परीक्षा द्यावी व आपले उत्तम करिअर घडवावे असा विचार व्यक्त केला आहे.

अधिक माहितीसाठी विद्यार्थी व पालकांनी  ९१५८५८२३२३/९८८११०००९९ या क्रमांकाची संपर्क साधावा असे आवाहन इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉ. संजय क्षीरसागर यांनी केले आहे.

 

अजून बातम्या वाचा..

ऍब्झॉर्बन्ट स्वच्छता उत्पादने बनवणाऱ्या नोबेल हायजीनचा आयपीओसाठी अर्ज दाखल

Nashik : नोबेल हायजीन लिमिटेड, आर्थिक वर्ष 2026 मधील प्युअर-प्ले (केवळ विशिष्ट उत्पादनांवर लक्ष...

read more
“ऑटोमेशन एक्स्पो 2026′  मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

“ऑटोमेशन एक्स्पो 2026′ मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

ऑटोमेशन एक्स्पो 2026 मध्ये तैवान एक्सलन्स पॅव्हेलियनमध्ये 22 पुरस्कारप्राप्त ब्रँड्स AI एज...

read more
Breaking News