उज्ज्वल फोर्स मध्ये क्रुझर बी.एस. ६ दाखल

Aug 26, 2020

नाशिक: वाहन उत्पादन क्षेत्रातील नामांकित कंपनी फोर्स मोटर्सचे लोकप्रिय वाहन ‘क्रुझर’चे बी.एस. ६ मॉडेल नाशिकच्या सातपूरमधील शोरूममध्ये दाखल झाले आहे.
या मॉडेलचे अनावरण ए.यु स्मॉल बँक फायनांन्सचे मॅनेजर विनायक सरोदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चोलामंडलम फायनांन्सचे निलकंठ निकम, विनोद जगताप, प्रवण मुसळे, कोगटा फायनांन्सचे भगवान साहेब, मनोज वाघ तसेच इंडस बँकेचे अविनाश कावळे व एस. के फायनांन्सचे राकेश चंद्रात्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी मे. उज्ज्वल फोर्सचे डायरेक्टर श्री. मिनल शेठ चौधरी यांनी स्वागत केले.
‘क्रुझर’ बी.एस. ६ या वाहनाविषयी अधिक माहिती देताना फोर्स मोटर्सचे विनायक कुशारे म्हणाले, नवीन लूक, २.६ लि. कार्यक्षम इंजिनमुळे अधिक मायलेज व स्टायलिश डॅशबोर्डसह सी.एन.सी चेसीज हि ‘क्रुझर’ बी.एस. ६ ची वैशिष्ट्ये आहेत.

अजून बातम्या वाचा..

Breaking News