भुजबळ नॉलेज सिटी, पॉलिटेक्निक मध्ये १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी प्रवेश सुविधा केंद्र

Aug 26, 2020

मुंबई एज्युकेशनल ट्रस्ट संचलित, भुजबळ नॉलेज सिटी मधील पॉलिटेक्निक मध्ये इयत्ता दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी प्रथम वर्ष पॉलिटेक्निक प्रवेशासंदर्भात विशेष मार्गदर्शन कक्ष व सुविधा केंद्र १० ऑगस्ट २०२० पासून सुरु असून सदर सुविधा केंद्रामार्फत शैक्षणिक प्रवेश प्रकियेसंबधीत माहिती दिली जात असून या प्रवेश प्रक्रियेतून विद्यार्थ्यांना हवी असणारी शाखा कशी निवडावी, विकल्प अर्ज कसा भरावा, आवश्यक कागदपत्र व प्रवेश निश्चिती इत्यादी संदर्भातील माहिती दिली जात आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाच्या प्रवेश वेळापत्रकानुसार २५ ऑगस्ट २०२० पर्यंतची तारीख वाढून ०४ सप्टेंबर २०२० पर्यंत संगणक प्रणाली द्वारे अर्ज भरून निश्चित करता येईल. तसेच या सुविधा केंद्रामध्ये सर्व ऑनलाईन प्रक्रिया मोफत दिली जाणार आहे. तरी १० वी उत्तीर्ण विद्यार्थी, पालकांनी ह्या संधीचा लाभ घ्यावा, तसेच शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार सामाजिक अंतर ठेवुन एकमेकांना सुरक्षित ठेवण्याची काळजी घ्यावी असे आवाहन भुजबळ नॉलेज सिटी प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. हा कक्ष प्रवेश प्रक्रीये दरम्यान रोज सकाळी १०.०० ते साय. ५.३० वाजेपर्यंत सरु असणार आहे.

अजून बातम्या वाचा..

Breaking News