राष्ट्रवादीकाँग्रेस पार्टीच्या माध्यमातून बेरोजगारांसाठी स्वयं रोजगाराची संधी

Aug 26, 2020

नाशिक – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून तसेच नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगनरावजी भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रयत्नातून  बेरोजगारांसाठी स्वयं रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजनेचे उद्घाटन शहराध्यक्ष रंजन ठाकरे व युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या हस्ते राष्ट्रवादी भवन येथे पार पडले. यावेळी महिला अध्यक्षा अनिता भामरे, शहर सरचिटणीस संजय खैरनार, धनंजय निकाळे व योजनेचे प्रतिनिधी सचिन पवार उपस्थित होते.  यावेळी शहराध्यक्ष रंजन ठाकरे म्हणाले कि, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जागतिक आर्थिक महामंदी निर्माण झाली असून यामुळे अनेकांचे रोजगार डबघाईला आले आहे. सर्वसामान्य नागरिकांना याची झळ बसू नये याकरिता  अन्न, नागरी पुरवठा तथा ग्राहक संरक्षण मंत्री व नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगनरावजी भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली बेरोजगारांसाठी स्वयं रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोरोना महामारी परिस्थितीत सर्वसामान्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देत आर्थिक दृष्टीने बळकट करण्याचा महाआघाडी सरकारचा प्रयत्न आहे. शासनाकडून नागरिकांच्या हिताकरिता अनेक योजना प्रसिद्ध होत आहे. यातीलच हि एक अतिशय उत्तम योजना असून बेरोजगारांसाठी स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. हि योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहचविणे आवश्यक असल्यानेच हा कार्यक्रम होत आहे. पूर्वी पासून लोक व्यवसाय करत असून दिवसेंदिवस व्यवसायाचे स्वरूप आता बदलत आहे. पूर्वी लोक रस्त्यावर व्यवसाय करत असत. नंतर त्याची जागा हातगाडीने घेतली. दिवसेंदिवस स्वच्छता वाढत असून निटनीटकेपणा वाढत आहे. यामुळे आता चारचाकी गाडीतून व्यवसाय होताना दिसत आहे. या व्यवसायामुळे रोगराईला आळा बसून शहर विद्रुपीकरण होणार नाही. व्यवसाय करण्याची अनेकांची इच्छा असते, परंतु भांडवलामुळे ते शक्य होत नाही. अशा व्यक्तींची चिंता दूर करत हि योजना शासनाने सर्वसामान्य जनतेकरिता अंमलात आणली आहे.युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे आपल्या भाषणात म्हणाले कि, सदरची योजना शासनाची असल्याने सर्वसामान्य जनतेकरिता आहे. या योजनेचा जास्तीत जास्त  नागरिकांनी लाभ घ्यावा. हि योजना दिनांक २६ ऑगस्ट ते २५ सप्टेंबर पर्यंत सुरु राहणार आहे. या योजनेतील लाभार्थ्यांना सबसीडीचा लाभ घेता येणार आहे. त्याकरिता नियमात असलेली कागदपत्रे आवश्यक राहणार आहे. नागरिक आपल्या मर्जीतील व्यवसाय करू शकणार असल्याने सर्वांसाठी हि एक सुवर्ण संधी असणार आहे. तरी इच्छुकांनी राष्ट्रवादी भवन, मुंबई नाका येथे सकाळी १०.३० ते ६.०० या वेळेत संपर्क करावा असे आवाहन यावेळी त्यांनी केले.      याप्रसंगी उदय सराफ, विलास बोराडे, निलेश सानप, संतोष भुजबळ, संदीप गांगुर्डे, हर्षल चव्हाण, राहुल तुपे, सागर बेदरकर, विक्रांत डहाळे, डॉ.संदीप चव्हाण, राहुल पाठक, जय कोतवाल, राहुल कमानकर, करण आरोटे, भूषण गायकवाड, स्वप्निल चुंभळे, संदीप खैरे, सचिन मोगल, किरण सूर्यवंशी, अविनाश मालुंजकर, अमोल सूर्यवंशी, अविनाश भुजबळ, सिद्धार्थ दोंदे, अमित ताठे, पुष्पा राठोड, अपेक्षा अहिरे, संगिता पाटील, मीनाक्षी गायकवाड, वैशाली वायंगणकर, अक्षय परदेशी, कृष्णा काळे, चेतन सूर्यवंशी, सुनिल शेवाळे, प्रशांत घनकुटे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिक उपस्थित होते. 

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

नाशिक : "सागरा प्राण तळमळला..." या अमर ओळींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली...

read more

तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची ३ ऑगस्ट रोजी शेगाव येथे राज्यस्तरीय बैठक

Nashik : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक रविवार, (दि. ३,...

read more
Breaking News