गुरु गोबिंद सिंग अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑनलाइन कॅम्पस ड्राइव्हचे यशस्वी आयोजन

Sep 9, 2020

नाशिक :- शहरातील गुरु गोबिंद सिंग अभियांत्रिकी महाविद्यालय आणि संशोधन केंद्रामध्ये मेकॅनिकल, इंजिनीअरिंग शाखेतील शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन कॅम्पस ड्राइव्हचे आयोजन करण्यात आले होते. गुरु गोबिंद सिंग अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रशिक्षण आणि प्लेसमेंट विभाग विद्यार्थ्यांच्या उज्वल व सुरक्षित भवितव्यासाठी सतत प्रयत्नशील असते. देशभरात कोरोनाच्या महामारीने सर्वच वयोगटातील लोक त्रस्त झालेले दिसून येत आहे. यात विद्यार्थी वर्ग देखील होरपळला गेला आहे. सर्वच स्तरातून चिंता वाढवणार्‍या या परिस्थितीत देखील महाविद्यालयाने ऑनलाइन कॅम्पस ड्राइव्ह आयोजित करून विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. शैक्षणिक वर्ष २०१९-२० च्या ३ विद्यार्थ्यांची निवड रायगड स्थित नागोठाणे प्लांट येथील जिंदाल प्राइव्हेट लि. मध्ये झाली आहे. निवड झालेले विद्यार्थी पदवीधर प्रशिक्षणार्थी अभियंता पदावर कार्यरत होतील. कंपनीच्या मानव संसाधन विभागाचे व्यवस्थापक श्री. अजय विद्याभानु यांनी या विद्यार्थ्यांची निवड केली. ही सर्व प्रक्रिया ऑनलाइन पार पडली. या विद्यार्थ्यांना तब्बल ३ लाखाचे वार्षिक पॅकेज देण्यात आले आहे.
गुरु गोबिंद सिंग फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी परमिंदर सिंग, प्राचार्य डॉ. नीलकंठ निकम, उपप्राचार्य डॉ. श्यामकुमार काळपांडे, विभागप्रमुख डॉ. चंद्रशेखर मोहोड यांच्या हस्ते निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांच्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन केले, त्यांना मार्गदर्शन करून उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. हा संपूर्ण ऑनलाइन कॅम्पस ड्राइव्ह यशस्वी होण्यासाठी साठी प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारी सहा. प्रा. विजय सरोदे, प्रितम कुदळे, विश्वेश काठे यांनी विशेष योगदान दिले

अजून बातम्या वाचा..

ऍब्झॉर्बन्ट स्वच्छता उत्पादने बनवणाऱ्या नोबेल हायजीनचा आयपीओसाठी अर्ज दाखल

Nashik : नोबेल हायजीन लिमिटेड, आर्थिक वर्ष 2026 मधील प्युअर-प्ले (केवळ विशिष्ट उत्पादनांवर लक्ष...

read more
“ऑटोमेशन एक्स्पो 2026′  मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

“ऑटोमेशन एक्स्पो 2026′ मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

ऑटोमेशन एक्स्पो 2026 मध्ये तैवान एक्सलन्स पॅव्हेलियनमध्ये 22 पुरस्कारप्राप्त ब्रँड्स AI एज...

read more
Breaking News