‘महिंद्रा’तर्फे ‘प्लॅंटिंगमास्टर पोटॅटो प्लस’ सादर – एक प्रगत, अचूक बटाटा लागवड तंत्रज्ञान

Sep 11, 2020

मुंबई, 8 सप्टेंबर, 2020 : 19.4 अब्ज डॉलर्सची उलाढाल असलेल्या महिंद्रा समुहातील महिंद्रा अँड महिंद्रा लि. या कंपनीच्या शेती उपकरणे विभागाने बटाटा लागवडीसाठी नवीन प्रगत, अचूक स्वरुपाचे यंत्र, ‘प्लॅंटिंगमास्टर पोटॅटो प्लस’ सादर करीत असल्याची घोषणा आज केली.
बटाट्यासंबंधी यंत्रसामग्रीच्या क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या युरोपातील ‘ड्यूल्फ’ या कंपनीने डिझाइन व विकसित केलेले ‘प्लॅंटिंगमास्टर पोटॅटो प्लस’ हे यंत्र भारतीय शेतीला अनुकूल, तसेच अधिक उत्पादन व वर्धित गुणवत्तेसाठी विकसित करण्यात आले आहे.
बटाटा लागवड अचूकपणे करणारे नवीन प्रगत यंत्र बनविण्यासाठी महिंद्रा आणि ड्यूल्फ यांनी 2019 मध्ये पंजाबमधील पुरोगामी शेतकर्‍यांशी भागीदारी केली. शेतकर्‍यांनी या यंत्राचा वापर सुरू केल्यावर बटाट्याच्या उत्पादनात पारंपारिक पद्धतींपेक्षा 20-25 टक्क्यांची वाढीची नोंद झाली आहे.
महिंद्रा अँड महिंद्रा लि.च्या शेती उपकरणे विभागाचे प्रमुख हेमंत सिक्का म्हणाले, “जगातील दुसऱ्या क्रमांकाचा बटाटा उत्पादक देश म्हणून आपल्याकडे उत्पादन वाढविण्यासाठी आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रगत शेती यंत्रणेची आवश्यकता आहे. ‘प्लॅंटिंगमास्टर पोटॅटो प्लस’ या यंत्राद्वारे आम्ही बटाटा शेतीत उत्पादकता व गुणवत्ता सुधारण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान भारतीय शेतकऱ्यांसमोर आणत आहोत. आम्ही हे उत्पादन सादर करीत करतानाच, ते काही बाजारपेठांमध्ये भाडेतत्वावरदेखील उपलब्ध करीत आहोत, तसेच ते खरेदीसाठी सुलभ वित्तपुरवठा देण्यात येत आहे; जेणेकरून हे नवीन तंत्रज्ञान भारतीय शेतकर्‍यांना सहज उपलब्ध व्हावे.”
भारत हा बटाटा उत्पादनात जगातील दुसरा सर्वात मोठा देश आहे, परंतु एकूण उत्पादकतेमध्ये तो मागे पडतो. भारतात बटाट्याचे उत्पादन प्रति एकरात 8.5 टन इतके होते, तेच नेदरलँड्स या देशात प्रति एकरात 17 टन होत असते. या पिकाच्या उत्पादनाची पातळी निश्चित करणारे अनेक घटक आहेत. योग्य कृषियंत्राचा वापर हा यातील एक महत्त्वाचा घटक आहे.
नवीन ‘प्लॅंटिंगमास्टर बटाटा प्लस’ हे यंत्र पंजाबमध्ये विक्रीसाठी, उत्तर प्रदेशात विक्री व भाड्याने देण्यासाठी आणि महिंद्राच्या भाडे उद्योजक नेटवर्कद्वारे गुजरातमध्ये भाडेतत्वावर उपलब्ध होईल.
‘प्लॅंटिंगमास्टर बटाटा प्लस’विषयी
बटाटा लागवड करण्याचे पारंपारिक तंत्र भारतात मोठ्या प्रमाणात वापरले जात असले, तरी त्यात अनेक कमतरता आहेत. हातांनी लागवड केल्यावर या कमतरता कळून येतात, तसेच ते खूप कष्टदायकही असते.
‘प्लॅंटिंगमास्टर बटाटा प्लस’ हे बटाटा लागवड अचूकपणे करणारे यंत्र आहे. यामध्ये उच्च स्तराचे ‘सिंग्युलेशन’ होते, तसेच बटाटा बियाणे गहाळ होणे टाळता येते. (सिंग्युलेशन म्हणजे, एका जागी केवळ एकच बटाटा पेरला जातो, त्यापेक्षा जास्त बटाटा त्या जागी पडत नाही.) याव्यतिरिक्त, एकसमान खोलीवर आणि एकसमान अंतरावर बटाटा अचूकपणे पेरला जातो. यंत्राने तयार केलेल्या घळीत लागवड झालेल्या बटाट्यांवर माती पडण्याचे प्रमाण अगदी योग्य राखले जाते. त्यामुळे बटाटे योग्य पद्धतीने झाकले जातात. निरोगी कंद विकसित करण्यासाठी पुरेसे पाणी, सूर्यप्रकाश आणि जागा आवश्यक असते, ते येथे सुनिश्चित होते. परिणामी पिकाचे उत्पादन चांगले येऊन बटाट्याची गुणवत्ताही वाढते.
लागवडीचे बियाणे संपूर्ण बटाट्याचे किंवा कापलेले घ्यायचे, लावणी सरळ रेषेत की नागमोडी पद्धतीने करायची, तसेच मातीत किती खोलवर पेरणी करायची याचे निर्णय शेतकऱ्यांना स्वतः घेता यावेत, यासाठी या पेरणी यंत्रात हवे तसे बदल करता येतात.
महिंद्रा वितरकांच्या माध्यमातून सुलभ हप्त्यांवर, 1 वर्षाच्या वॉरंटीसह नवीन ‘प्लॅंटिंगमास्टर पोटॅटो प्लस’ शेतकऱ्यांच्या दारात उभा राहू शकतो. सुटे भाग व विक्रीपश्चात सेवा या सुविधा महिंद्रातर्फे नेहमीच्याच तत्परतेने दिला जाणार आहेत.

अजून बातम्या वाचा..

ऍब्झॉर्बन्ट स्वच्छता उत्पादने बनवणाऱ्या नोबेल हायजीनचा आयपीओसाठी अर्ज दाखल

Nashik : नोबेल हायजीन लिमिटेड, आर्थिक वर्ष 2026 मधील प्युअर-प्ले (केवळ विशिष्ट उत्पादनांवर लक्ष...

read more
“ऑटोमेशन एक्स्पो 2026′  मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

“ऑटोमेशन एक्स्पो 2026′ मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

ऑटोमेशन एक्स्पो 2026 मध्ये तैवान एक्सलन्स पॅव्हेलियनमध्ये 22 पुरस्कारप्राप्त ब्रँड्स AI एज...

read more
Breaking News