दूध उत्पादकांनी स्वतःच दुधाचे मार्केटिंग करावे:-डॉ मिलिंद भणगे

Sep 15, 2020

नाशिक : कृषिथॉन, नाशिक आयोजित दूध उत्पादक वेबिनारमध्ये प्रमुख वक्ते डॉ. मिलिंद भणगे यांनी दुग्ध व्यवसायिकांनी आपल्या पशूंची योग्य काळजी व व्यवस्थापन केल्यास उत्पादन खर्चात बचत करून दुग्ध व्यवसाय करावा. व पशुसंगोपनामध्ये नियमित लसीकरण,जंत निर्मूलन, आहारात खनिज मिश्रणाचा वापर केल्यास पशुधनाच आरोग्य अबाधित राहून दर्जेदार दुधउत्पादन मिळेल व दुग्ध व्यवसायात भरभराट होईल. दुधउत्पादकांनी संघटित होऊन दुग्ध व्यवसाय केल्यास व नजीकच्या शहरात दूध वितरित केल्यास दुधाला चांगला भाव मिळेल त्यातून दुध उत्पादकांना आर्थिक उत्पन्नाची नवी दिशा मिळेल असे आव्हान डॉ भणगे यांनी केले. प्रसंगी महाराष्ट्रातील दूध उत्पादकांना भेसवणाऱ्या समस्यांचे यावेळी डॉ भणगे यांनी निवारण केले. दूध उत्पादक वेबिनारचे सूत्र संचालन डॉ. वसंत ढिकले यांनी केले व कृषिथॉनचे समन्वयक श्री. नितिन मराठे यांनी आभार प्रदर्शन केले.

अजून बातम्या वाचा..

Breaking News