दक्षिण कोरियाने भारताच्या कोविड-19विरोधी लढ्यामध्ये योगदान देण्याच्या हेतूने मोफत वाटप करण्यासाठी टीव्हीएस मोटर कंपनीला दिले एक लाख मास्क

Sep 21, 2020

Nashik : Venerable Abbot, Subul Sunim यांचे नेतृत्व असलेल्या, दक्षिण कोरियातील Social Welfare Corporation Anguk Zen Centerने दोन्ही देशांतील एकतेचे आणि मानवतेचे प्रतिक म्हणून भारताच्या कोविड-19विरोधी लढ्यामध्ये योगदान देण्याच्या हेतूने मोफत वाटप करण्यासाठी टीव्हीएस मोटर कंपनीला एक लाख मास्क दिले आहेत. कोरियातील K-Art International Exchange Association आणि भारतातील InKo Centre यांनी या मदतीच्या बाबतीत समन्वय साधला.

TVS Motor Company चा सामाजिक सेवा विभाग असणाऱ्या Srinivasan Services Trust द्वारे मोफत वितरण करण्यासाठी Mr. Venu Srinivasan, Chairman, TVS Motor Company, and Managing Trustee, Srinivasan Services Trust; Chairman, InKo Centre आणि Goodwill Envoy for Culture and Diplomacy of the Republic of Korea यांच्याकडे आज मास्क (अंदाजे 150 दशलक्ष Korean Won) सुपूर्द करण्यात आले.

Venu Srinivasan Chairman, TVS Motor Company & Managing Trustee, Srinivasan Services Trust, यांनी सांगितले, “InKo Centre ला 1 लाख मास्क दिल्याबद्दल मी Venerable Abbot, माझे शिक्षक Subul Sunim यांचा मनापासून ऋणी आहे. मास्क घालणे, स्वच्छतेचे कडक नियम पाळणे आणि सामाजिक अंतर राखणे अत्यंत गरजेचे असलेल्या सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये अतिशय योग्य वेळी व मोलाची मदत केल्याबद्दल आम्ही खरेची आभारी आहोत. TVS Motor Company चा सामाजिक सेवा विभाग असणाऱ्या Srinivasan Services Trust द्वारे देशभरातील स्थानिक व्यक्तींना हे मास्क वाटले जातील, याची आम्ही पूर्ण काळजी घेऊ. लोकांना मदत करण्यातून अधोरेखित होणारे हे एकोप्याचे, तसेच Busan कडून Chennai ला असलेल्या पाठिंब्याचे विशेष प्रतिक हे दोन्ही देशांतील गहिरे नाते स्पष्ट करते.”

Mr Young-seup Kwon, Consul General of the Republic of Korea in Chennai, यांनी म्हटले, “जगभर निर्माण झालेली ही महामारी म्हणजे मानवाच्या इतिहासातील सर्वात गंभीर आव्हानांपैकी एक आहे. सक्षम होऊन आणि एकत्रितपणे काम करून या आव्हानावर मात करता येऊ शकते. नागरी समाजाच्या स्तरावर झालेल्या या सहयोगाच्या माध्यमातून, कोरिया व भारत येतील सर्वसामान्य व्यक्ती एकमेकाची किती काळजी घेतात, हे दिसून येते. तसेच, एकमेकाच्या पाठिशी उभे राहून या संकटाचा सामना करता येऊ शकतो.”

BlueIndus Co. Ltd ने तयार केलेले हे अतिशय दर्जेदार मास्क विशेषतः भारतात वितरित करण्यासाठी CEO Jeong Cheon-sik यांनी दिले. Yang Jae-saeng, CEO of Eunsan Shipping Air, Korea, यांच्यामुळे हे मास्क भारतात पाठवण्यात आले.

अजून बातम्या वाचा..

ऍब्झॉर्बन्ट स्वच्छता उत्पादने बनवणाऱ्या नोबेल हायजीनचा आयपीओसाठी अर्ज दाखल

Nashik : नोबेल हायजीन लिमिटेड, आर्थिक वर्ष 2026 मधील प्युअर-प्ले (केवळ विशिष्ट उत्पादनांवर लक्ष...

read more
“ऑटोमेशन एक्स्पो 2026′  मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

“ऑटोमेशन एक्स्पो 2026′ मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

ऑटोमेशन एक्स्पो 2026 मध्ये तैवान एक्सलन्स पॅव्हेलियनमध्ये 22 पुरस्कारप्राप्त ब्रँड्स AI एज...

read more
Breaking News