नाशिक: नाशिकच्या गंगापूर रोडवरील नव्यानेच सुरु झालेल्या द कॅलिस्टो मल्टि कुझीन रेस्टॉरंटचा सोमवार दि. १२ ऑक्टोबर २०२० रोजी आमदार डॉ. राहुल आहेर यांच्याहस्ते उदघाट्न सोहळा संपन्न झाला. या उदघाट्न सोहळ्याप्रसंगी राजलक्ष्मी बँकेचे संचालक नंदलाल काळे, परमानंद गुजराथी, अर्जुन कठपाल, कुणाल वाघ, शिवाजीराव बच्छाव, दिनकर देवरे, का.का. बच्छाव आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी रेस्टॉरंटच्या वतीने बाळासाहेब मगर, अजिंक्य मगर आणि ललित भामरे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
अत्याधुनिक सोयी-सुविधांयुक्त अशा या रेस्टॉरंटचा भव्य शुभारंभ संपन्न झाला. इथे व्हेज – नॉनव्हेज पदार्थांचे असंख्य प्रकार, टेस्टी डेजर्ट असून मेन्यु कार्ड मध्ये नसलेले परंतु आपल्याला हवी असलेली डिश बनवून देण्याची नवीन संकल्पना या रेस्टॉरंटमध्ये बघायला मिळत आहे. तसेच व्हेज – नॉनव्हेज पदार्थांसाठी स्वतंत्र किचनसह बसण्याची व्यवस्था देखील स्वतंत्र करण्यात आलेली आहे. या रेस्टॉरंटमध्ये लग्न समारंभ, साखरपुडा, वाढदिवस, डोहाळेजेवण इ. कार्यक्रमांसाठी मोठा हॉल नाशिककरांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. चविष्ट पदार्थ, अत्युत्तम शेफ, विनम्र व तत्पर सेवा हि या रेस्टॉरंटची वैशिष्ट्ये आहेत.
नाशिककरांनी एकदा तरी या रेस्टॉरंटला भेट देऊन व्हेज – नॉनव्हेज पदार्थांच्या मेजवानीचा आस्वाद लुटावा, असे आवाहन रेस्टॉरंटच्या वतीने करण्यात आले आहे.




