कृषीथॉन “युवा सन्मान – २०२०” साठी ३२ पुरस्कारार्थींची निवड

Nov 9, 2020

नाशिक:- युवकांचा कृषीक्षेत्रातील सहभाग वृद्धिंगत व्हावा आणि त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव व्हावा या उद्देशनाने ह्युमन सर्व्हिस फाउंडेशन आणि मिडिया एक्झिबिटर्स यांच्या संयुक्तविद्यमाने कृषीथॉन युवा सन्मान पुरस्काराद्वारे प्रयोगशील युवकांना गौरविण्यात येते. साल २०२० च्या पुरस्कारार्थींची निवड जाहीर झाली आहे.कृषीक्षेत्रातील सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी व शेतीविषयक नवीन संकल्पना त्यांच्यापर्यंत पोहचविण्यासाठी कृषीपदवीधरांची भूमिका लाखमोलाची ठरणार आहे.अशा उपक्रमातून त्यांना प्रेरणा मिळावी व कृषीक्षेत्रात आदर्शवत कार्य व्हावे, हा यामागील मुख्य हेतू आहे अशी माहिती कृषीथॉनचे आयोजक संजय न्याहारकर यांनी दिली.

 पुरस्कारार्थींची नावे पुढीलप्रमाणे: श्वेता मुरलीधर जाधव (जळगाव, सातारा), कल्याणी सुभाष औटी (पारनेर, अहमदनगर), शुभम रमेश पिंपळकर (वणी, यवतमाळ), प्रांजल अनंतराव काळे (शेलगुंड, नांदगाव खांडेश्वर), सोनाली रावसाहेब शिरस्कर (वसमत, हिंगोली), विक्रमसिंह विलास पासले (वाडीकुरोली, सोलापूर), शिवानी सरजेराव देसाई (मिनचे खुर्द, कोल्हापूर), कोमल रामचंद्र चौगुले (नानगुर, कोल्हापूर), विजय दत्तात्रय वसेकर (अढिव, सोलापूर), परमेश्वर बाळासाहेब सोळंकी (शेवगा, जालना), डिंपल कैलासराव गावंडे (अलोडा, अमरावती), भूषण दत्तात्रय भोसले (कानसेवटी सातारा), विश्वतेज बलराम पवार (उस्मानाबाद), समर्थ विवेक तुपकर (गुंज, बुलढाणा), हर्षल राजेंद्र सोनवणे (चांदे, धुळे), तेजस राजेश सुथार (पुणे), ऋषिकेश सतीश धापटे (मालेगाव, बारामती), ऋषिकेश कीर्ती भरत पवार (जळोची, बारामती), कविता महाबळेश्वर पुजारी (श्रीस्थळ, गोवा), हर्षाली चंद्रशेखर गायकवाड (कवठेपीशन, सांगली), हिना मुकीमुद्दीन शेख (उत्तूर, कोल्हापूर), साईनाथ बाळासाहेब तळेकर (अनकुटे, येवला) ज्ञानेश्वर महादेव दराडे (पाथर्डी, अहमदनगर), आकाश विकास म्हसकर (चिंचोळी पिंप्री, जळगाव), शांतीकुमार चंद्रकांत पाटील (जैनापूर, कोल्हापूर), डॉ. अंबादास रखमाजी मडकर (इस्लामपूर, सांगली), सौरभ सुभाष केदार, (सेवापूर, अहमदनगर), निलेश विलास खाडे (लोणी खुर्द, अहमदनगर), मयुर मुरलीधर विसपुते (इज्जत नगर, बरेली), अश्विनी रामेश्वरराव चापळे (इज्जत नगर, बरेली), दर्शना भैसारे (वाडी, नागपूर), सुमेध देवीदास हिवाळे (मलकापूर, अकोला)

अजून बातम्या वाचा..

ऍब्झॉर्बन्ट स्वच्छता उत्पादने बनवणाऱ्या नोबेल हायजीनचा आयपीओसाठी अर्ज दाखल

Nashik : नोबेल हायजीन लिमिटेड, आर्थिक वर्ष 2026 मधील प्युअर-प्ले (केवळ विशिष्ट उत्पादनांवर लक्ष...

read more
“ऑटोमेशन एक्स्पो 2026′  मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

“ऑटोमेशन एक्स्पो 2026′ मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

ऑटोमेशन एक्स्पो 2026 मध्ये तैवान एक्सलन्स पॅव्हेलियनमध्ये 22 पुरस्कारप्राप्त ब्रँड्स AI एज...

read more
Breaking News