अमेझॉन डॉट इन ने आपल्या विक्रेत्यांच्या सबलीकरणासाठी आणि वेगवान व्यवसायवृद्धीसाठी एसटीइपी (STEP) ही कामगिरीवर आधारित लाभ योजना सुरु केली आहे. एसटीइपी मध्ये विक्रेत्यांना त्यांच्या ग्राहकांचे समाधान करत व्यवसाय वाढवता यावा यासाठी त्यांच्या व्यवसायाशी सुसंगत, आणि व्यवहार्य सल्ले उपलब्ध होतील अशी रचना आहे. विक्रेत्यांची कामगिरी जशी उंचावत जाईल तसे त्यांना बेसिक, स्टॅंडर्ड, ऍडव्हान्स्ड, प्रिमिअम, अशा विविध पातळ्यांवरचे लाभ उपलब्ध होत जातील. या लाभांमध्ये फी माफी, पैसे वितरित करण्याची वेगवान पद्धती, जागतिक गुणवत्तेचे खात्याचे विनाशुल्क व्यवस्थापन असे लाभ अंतर्भूत आहेत. एसटीइपी मध्ये विक्रेत्यांना त्यांच्या यशाच्या मार्गावर योग्य निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते आणि या प्रक्रियेत विक्रेत्यांना त्यांच्या कामगिरीतील प्रगतीचा मागोवा घेणे, एखादा लाभ मिळवण्यापासून ते किती दूर आहेत हे पाहणे, हे एसटीइपी च्या डॅश बोर्ड वर किंवा सेलर सेंट्रल वर कोणत्याही क्षणी शक्य होईल.
विक्रेत्यांच्या व्यवसायाला सुयोग्य अशा व्यवहार्य शिफारसी करून एसटीइपी त्यांना कॅन्सलेशन रेट, लेट डिस्पॅच रेट यासारख्या महत्त्वाच्या निकषांच्या बाबतीत सतत सुधारणा करण्याची क्षमता मिळवून देते. कामगिरीनुसार विक्रेत्यांना ऑफ लाइन प्रशिक्षण, फी माफी, पैसे वितरित करण्याची वेगवान पद्धती, खात्याचे विनाशुल्क व्यवस्थापन असे लाभ मिळवता येतात. येत्या १ डिसेंबर २०२० पासून ३१ मार्च २०२१ पर्यंत
अमेझॉन डॉट इन च्या सर्व विक्रेत्यांना सॅन्डर्ड पातळीचे लाभ मिळतील आणि १ एप्रिल २०२१ नंतर त्यांना १ जानेवारी २०२१ ते ३१ मार्च २१२१ मधील कामगिरीनुसार बेसिक, स्टॅंडर्ड, ऍडव्हान्स्ड, प्रिमिअम अशा विविध पातळ्यांवरचे लाभ उपलब्ध होत जातील. सर्व विक्रेत्यांना त्यांच्या प्रत्येक तिमाहीतील कामगिरी नुसार वरच्या पातळीवर पोचून तिथे उपलब्ध लाभ मिळवता येतील.
अमेझॉन इंडिया चे उपाध्यक्ष श्री मनीष तिवारी म्हणाले, विक्रेता छोटा असो वा मोठा, जुना असो वा नव्याने नोंदणी केलेला- एसटीइपी सर्वांनाच ग्राहकाची पसंती मिळवून यशस्वीपणे व्यवसाय करण्यासाठी सक्षम करते. नेमके आणि पारदर्शी निकष आणि त्यांवर आधारित लाभ एसटीइपी मध्ये अंतर्भूत आहेत आणि त्यामुळे विक्रेत्यांना आपली कामगिरी किती सुधारली की काय लाभ मिळतील याचा अंदाज घेता येतो. ग्राहकांना दीर्घ काळ समाधानी ठेवण्यावर लक्ष केंद्रित करण्यावर आम्ही अमेझॉन मध्ये भर देतो. आम्ही एसटीइपी उपक्रमाचा तपशील ठरवण्यावर पुरेसा वेळ खर्च केला आहे आणि त्याचा प्रत्येक घटक ग्राहकाचे समाधान वाढवून आमच्या विक्रेत्यांचा व्यवसाय वाढवत त्यांना अमेझॉन डॉट इन वर यशस्वी करील अशी रचना केली आहे.
यावर्षी अमेझॉन डॉट इन ने आपल्या ७ लाख पेक्षा जास्त विक्रेत्यांना फायदेशीर ठरतील आणि त्यांच्या व्यवसायातील अडथळे दूर होऊन पूर्ववत स्थिती यावी यासाठी अनेक उपक्रम सुरु केले आहेत. यांत कोव्हिड – १९ साठी विमा (अमेझॉन आणि एकको ), मागणी करताच डे रकमेची अदा, कामगिरीचे निकष शिथिल करणे, शुल्क माफी, लहान विक्रेत्यांना ‘सेल ऑन अमेझॉन’ शुल्कात माफी अशा उपायांचा समावेश आहे.



