उज्ज्वल फोर्सची ट्रॅव्हलर मोनोबसचा बाजारपेठेत प्रवेश

Nov 22, 2020

नाशिक : वाहन निर्मिती मधील अग्रेसर कंपनी असलेल्या फोर्स मोटर्स लि. पुणे ने आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने बस निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकले आहे. कंपनीने ट्रॅव्हलर मोनोबसमध्ये ३३ सिटर आणि ४१ सिटर ‘मोनोबस’ गाडीची निर्मिती केली असून मे. उज्ज्वल फोर्स सातपूर येथे या वाहनाचे लाँचिंग करण्यात आले आहे.

या कार्यक्रमप्रसंगी फोर्स मोटर्सचे जनरल मॅनेजर श्री. विनोद गुलाटी यांनी गाडीच्या संदर्भात सांगितले की, ही बस बॉडी मोनोकॉक असून प्रवासासाठी अत्यंत आरामदायी आहे. या बस रेंजमध्ये इतरांपेक्षा पावरफुल मर्सिडीज इंजिन उत्तम मायलेज देते. तसेच चारही चाकांना डिस्कब्रेक आणि कमी टर्निंग रेडीयसमुळे कमी जागेत झटपट वळणारी अशी मजबुत व सुरक्षा देणारी गाडी आहे. सदर कार्यक्रमासाठी बस आँपरेटर संघटना अध्यक्ष श्री. योगेश दुसाने व अन्य बस आँपरेटर आणि फोर्स मोटर्सचे सिनियर मॅनेजर श्री. सोमेश खरे, बिजनेस मॅनेजर श्री. राहुल बाळ, टेरीटरी सेल्स मॅनेजर श्री. विनायक कुशारे उपस्थित होते.

पहीली मोनोबस वितरण कर्नल गद्रे साहेब, डायरेक्टर साइटेक कंपनी सिन्नर यांना उज्ज्वल फोर्सचे डायरेक्टर श्री. मिनलशेठ चौधरी यांचे हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाचा समारोप उज्ज्वल फोर्सचे मॅनेजर श्री. प्रमोद मनचंदा यांनी सर्वांचे आभार मानून केला.

अजून बातम्या वाचा..

ऍब्झॉर्बन्ट स्वच्छता उत्पादने बनवणाऱ्या नोबेल हायजीनचा आयपीओसाठी अर्ज दाखल

Nashik : नोबेल हायजीन लिमिटेड, आर्थिक वर्ष 2026 मधील प्युअर-प्ले (केवळ विशिष्ट उत्पादनांवर लक्ष...

read more
“ऑटोमेशन एक्स्पो 2026′  मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

“ऑटोमेशन एक्स्पो 2026′ मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

ऑटोमेशन एक्स्पो 2026 मध्ये तैवान एक्सलन्स पॅव्हेलियनमध्ये 22 पुरस्कारप्राप्त ब्रँड्स AI एज...

read more
Breaking News