यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक आणि अण्णामलाई विद्यापीठाच्या मूल्यशिक्षणाच्या शास्त्रशुद्ध अभ्यासक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

Jul 3, 2019

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या शिक्षण प्रभागातर्फे  नुकतेच मूल्य आणि आध्यात्मिक शिक्षणाचे विविध अभ्यासक्रमाद्वारे चालविले जात आहेत. त्याअनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये मूल्यांच्या संवर्धनाच्या या प्रयत्नांची दखल घेऊन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक आणि अण्णामलाई विद्यापीठाच्या यांनी घेऊन मूल्यशिक्षणात बी.ए., बी.एस्सी., एम.एस्सी. अभ्यासक्रम सुरु केले असून त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. भारतात अशा प्रकारचे अभ्यासक्रम भारतातील  दहा विद्यापीठांमध्ये सुरु असून याद्वारे मूल्य शिक्षणामध्ये क्रांती झालेली आहे.
    समाजात नैतिक, चारित्रीक व इतर मूल्यांचा होणारा सतत ­हास, लोप चाललेली आध्यात्मिकता आणि पर्यायाने कमजोर होत चाललेल्या कुटुंब व्यवस्था आदि समस्यां सोडविण्यासाठी अनेक सामाजिक , आध्यात्मिक  पुढे
सरसावल्या असून त्याचाच एक भाग म्हणून ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय या आध्यात्मिक शिक्षण संस्थेचे शिक्षण प्रभाग  यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक  आणि तामिळनाडू, 
मुदराई स्थित अण्णामलाई विश्वविद्यालयाच्या निरंतर विस्तार शिक्षण विभागातर्फे मूल्य शिक्षण आणि आध्यात्मिकता या विषयावर पदव्यूत्तर पदवीका आणि पदवी (पीजीडिप्लोमा इन व्हॅल्यूज अँड स्प्रिच्युएलिटी व एम.एस.सी.) अभ्यासक्रम सुरु करण्यात आलेला आहे. हिंदी आणि इंग्रजी दोन्ही प्रकारात बहिस्थ / मुक्त शिक्षण  प्रवेश प्रक्रिया प्रकारात सदर अभ्यासक्रम उपलब्ध असून 12वी नंतर डिप्लोमा कोणत्याही विद्याशाखेच्या पदवी नंतर पदव्युत्तर  पदविका आणि ज्यांनी हा डिप्लोमा केला असेल त्यांच्यासाठी एक वर्षाची  एम.एस.सी. इन व्हॅल्यूज अँड स्प्रिच्युएलिटी तसेच एम.बी.ए. इन सेल्फ अॅण्ड क्रायसीस मॅनेजमेंट अशा चार प्रकारात सदर अभ्यासक्रम उपलबध आहे. प्रवेश प्रक्रिया ब्रह्माकुमारीज् तर्फे राबविण्यात येईल व परीक्षा, निकाल, पदवी प्रदान समारंभ आदि सर्व प्रक्रिया अण्णामलाई विद्यापीठातर्फे
होणार आहेत.  सदर अभ्यासक्रमाचा फायदा वैयक्तिक मूल्यसंवर्धनासाठी तर होईलच परंतु विविध सरकारी नोक­यांमध्ये, शिक्षकांना, एम.एस.डब्लू, मास कम्युनिकेशन, अंगणवाडी, बालवाडी, प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन  शिक्षक, समाजसेवेत करीयर क डिग्री इच्छिाणारे यांना होणार आहे.

बारावी उत्तीर्ण ही अट बी.ए.साठी असून 12 वी पेक्षा कमी शिक्षण झालेल्यांसाठी पूर्वतयारी परीक्षा देऊन प्रवेश घेता येईल. अभ्यासक्रमाविषयी अधिक साठी  माहिती ब्रह्माकुमारीज्  सेवाकेंद्रात संपर्क साधता येईल.  असे आवाहन डॉ सोमनाथ वडनेरे, माध्यम समनव्यक  यांनी केले आहे

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
Breaking News