स्टेट बँक ऑफ इंडियाने त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टला दिला ७५ इंची एलईडी टीव्ही संच

Nov 28, 2020

उद्योजक, कामगारांसाठी त्र्यंबकरोड येथे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेचा शुभारंभ.

नाशिक: भारतीय स्टेट बँकेच्यावतीने बुधवार दि. २५ नोव्हेंबर २०२० रोजी श्री. त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टला ७५ इंची एलईडी टीव्ही संच सीएसआर अ‍ॅक्टिव्हिटी अंतर्गत भेट म्हणून देण्यात आला. हा टिव्ही देवस्थानतर्फे मंदिर आवारात भाविकांना गाभाऱ्यातील लाईव्ह दर्शन घेण्यासाठी लावण्यात येणार आहे.

भारतीय स्टेट बँकेचे मुख्य महाप्रबंधक (महाराष्ट्र) दिपक कुमार लल्ला व उत्तर महाराष्ट्रचे महाप्रबंधक बलदेव प्रकाश यांच्या हस्ते ही भेट देण्यात आली. याप्रसंगी नाशिक विभागाचे उपमहाप्रबंधक मुकेश कुमार सिंह, क्षेत्रीय प्रबंधक (ग्रामीण) सफल त्रिपाठी, शाखाधिकारी विवेक व्दिवेदी, त्रंबकेश्वर देवस्थाना तर्फे ट्रस्ट चे चेअरमन एम. एस. बोधनकर, सेक्रेटरी संजय जाधव, ट्रस्टी सत्य प्रिया शुक्ला, ट्रस्टी प्रशांत गायधनी, ट्रस्टी संतोष कदम, ट्रस्टी पंकज भुतडा, मुख्य कार्यकारी अधिकारी राजाभाऊ जोशी व मुख्य लेखाधिकारी अंकुश जाजडा उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्टेट बँक ऑफ इंडिया नाशिक झोनचे मुख्य प्रबंधक समीक विश्वास, प्रबंधक जगदिप बांगरे, जनसंपर्क अधिकारी यज्ञेश झंवर , लक्ष्मण पाटील, राजेश दाभाडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

उद्योजक आणि कामगारांसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाची अजून एक शाखा त्र्यंबकरोड येथे खुली करण्यात आली असून या शाखेचे उदघाटन स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्य महाप्रबंधक (महाराष्ट्र) दिपक कुमार लल्ला यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उत्तर महाराष्ट्रचे महाप्रबंधक बलदेव प्रकाश, नाशिक विभागाचे उपमहाप्रबंधक मुकेश कुमार सिंह, नाशिक शहराच्या क्षेत्रीय प्रबंधक शिताक्षी सिंह, नाशिक ग्रामीणचे क्षेत्रीय प्रबंधक सफल त्रिपाठी, शाखाधिकारी निलेश शिंदे, नाशिक झोन चे मुख्य प्रबंधक (ऋण) कमल किशोर, सातपूर शाखा मुख्य प्रबंधक मनिष भरतीया उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नाशिक शहर क्षेत्रीय मुख्य प्रबंधक मनोहर रिधुरकर, उपप्रबंधक संदीप ईमडे यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी उपस्थितांच्या हस्ते वृक्षारोपण करून झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देण्यात आला.

अजून बातम्या वाचा..

ऍब्झॉर्बन्ट स्वच्छता उत्पादने बनवणाऱ्या नोबेल हायजीनचा आयपीओसाठी अर्ज दाखल

Nashik : नोबेल हायजीन लिमिटेड, आर्थिक वर्ष 2026 मधील प्युअर-प्ले (केवळ विशिष्ट उत्पादनांवर लक्ष...

read more
“ऑटोमेशन एक्स्पो 2026′  मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

“ऑटोमेशन एक्स्पो 2026′ मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

ऑटोमेशन एक्स्पो 2026 मध्ये तैवान एक्सलन्स पॅव्हेलियनमध्ये 22 पुरस्कारप्राप्त ब्रँड्स AI एज...

read more
Breaking News