मेट भुजबळ नॉलेज सिटीतील द्वितीय वर्ष संगणक विभागाच्या विद्यार्थ्यांची नाविन्यपूर्ण टेकनॉलॉजि आधारित व्हाट्सएप सिरीज

Dec 3, 2020

मेट भुजबळ नॉलेज सिटीतील अभियांत्रिकी महाविद्यालयाचा संगणक विभाग नेहमी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यास अग्रेसर आहे हे विभागातील द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले.

या कोव्हीड महामारीच्या काळामध्ये सुद्धा आपले ज्ञानवर्धन न थांबवता संगणक विभागातील द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी स्वयंप्रेरणेने व स्वयंस्फूर्तीने विविध अद्ययावत टेकनॉलॉजिची माहिती दैनिक पोस्ट च्या माध्यमातून व्हाट्सएप ग्रुप वर सादर केली.या पोस्ट मध्ये गूगलअर्थ काय आहे, डार्क वेब म्हणजे काय, यूट्यूब कसे काम करते, जावास्क्रिप्ट लोकप्रिय होण्याची कारणे, होलोग्राम टेकनॉलॉजि काय आहे, अंडरवॉटर सर्वर कसे काम करतात, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय, बिग डेटा चा उपयोग कसा करतात, नॅनो डायमंड बॅटरी कशी आहे, अश्या वेगवेगळ्या जवळपास १५० विषयांवर द्वितीय वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांनी रोज एक या प्रमाणे पोस्ट टाकून त्यांच्यामध्ये असलेली नवनवीन तंत्रज्ञान शिकण्याची वृत्ती वृद्धिंगत केली. तसेच या तांत्रिक विषयांची माहिती सर्व विद्यार्थ्यांमध्ये व्हाट्सएपच्या माध्यमातून प्रसिद्ध केली.द्वितीय वर्षाच्या या सर्व विद्यार्थ्यांचे या आगळ्यावेगळ्या उपक्रमासाठी सर्व स्तरातून कौतुक होत आहे. विद्यार्थी समन्वयक अक्षया भन्साली द्वितीय वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांसोबत समन्वय साधून हे सर्व टेकनिकल पोस्ट एकत्रित केली. हा उपक्रम आजतागायत सुरु आहे.कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर वाणी, संगणक विभागप्रमुख डॉक्टर खरात, विभागातील सर्व प्राध्यापक वृंद यांनी विद्यार्थ्यांचे खूप कौतुक केले. तसेच मेट भुजबळ नॉलेज सिटीच्या व्यवस्थापिका डॉक्टर शेफाली भुजबळ यांनीसुद्धा या विद्यार्थ्यांचे कौतुक केले व यापुढे सुद्धा अश्याप्रकारे उपक्रम राबवण्यासाठी शुभेच्छा दिल्यात.

अजून बातम्या वाचा..

Breaking News