ए एम टी इन्स्टिट्यूट ऑफ स्कील डेव्हलपमेंट संस्था नाशिक मध्ये सुरु

Dec 15, 2020

नाशिक : समाजाच्या गरजा ओळखून त्यानुसार कौशल्य अधिष्टित सन्माननीय उदरनिर्वाहाचे शिक्षण देणे हा दृष्टीकोन ठेवून ए एम टी इन्स्टिट्यूट ची स्थापना करण्यात आली आहे.
या संस्थेचे संस्थापक व व्यवस्थापन या मताचे आहेत कि नोकरी देणारे व व्यावसायिक यांच्या गरजा व आपल्या शिक्षण व्यवस्थेद्वारे देण्यात येणारे शिक्षण यात खूप अंतर असते. नव्यानेच व्यवसायात उतरलेल्या उमेदवारांना जसे कि उद्योगांमधील अभियंते, आर्थिक व व्यापारी क्षेत्रातील पदवीधर, ,आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी, विविध व्यवसायातील मदतनीस इत्यादिंना आपले काम परिणामकारकरित्या करण्याकरिता कौशल्य विकासाची आवश्यकता असते. पुस्तकी ज्ञान व प्रत्यक्षात नोकरीच्या ठिकाणची परिस्थिती यात महदंतर असते. त्यामुळे असे आढळून येते कि नोकर्या उपलब्ध असतात परतू ती नोकरी कार्यक्षमतेने करू शकणारे कुशल उमेदवार उपलब्ध नसतात. अशा लोकांना तयार करण्यासाठी सुयोग्य प्रशिक्षण देणे आवश्यक असते.
कोविड १९ नंतरच्या विद्यमान परिस्थितीत व्यापार व व्यवसायांमधील विद्यमान कर्मचाऱ्यांचे देखील कौशल्य सुधार मोठ्या प्रमाणावर आवश्यक झाले आहे. कोविड १९ नंतरच्या काळात अधिक लवचिक, विविध कौशल्ये अंगी असणारे व विशेष म्हणजे आरोग्य व सुरक्षितता याविषयी जागरूक असणाऱ्या कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे.
त्याचप्रमाणे, समाजाला विविध प्रकारच्या सेवा पुरविणाऱ्या छोट्या उद्योगांच्या उद्योजकांना तयार करण्याची देखील आवश्यकता भासणार आहे. लॉजिस्टिक्स, आरोग्य, फूड इंडस्ट्री, अॉटो सर्व्हिस इंडस्ट्री, घरांची देखभाल, परिचारिकांच्या सेवा आदी क्षेत्रात छोट्या छोट्या उद्योगांना खूप संधी आहेत. अशा व्यवसायांमध्ये स्थानिक तरुणांना मोठा वाव आहे.
हि परिस्थिती लक्षात घेऊन ए एम टी स्कील एन्हांसमेंट इन्स्टिट्यूटने गरजू युवकांची उद्यमशीलता व नोकरी करण्याची क्षमता वाढविण्याचे ध्येय ठरविले आहे. त्यासाठी नोकरी देण्याऱ्याच्या व एकंदरीतच समाजाच्या गरजा ओळखून त्यानुसार युवकांना व्यावहारिक कौशल्य शिकविले जाईल.
एएमटी इन्स्टिट्यूटमध्ये कोर्स डिझाईन व त्याची अंमलबजावणी ची ग्राहकाभिमुख पद्धत अवलंबिली जाते. आमच्या प्रशिक्षणार्थींना नोकरी देणाऱ्या संभाव्य व्यावसायिकाची मते जाणून घेऊन आमच्या कोर्सला सुरुवात होते. नोकरी देऊ शकणाऱ्या संस्था , कंपन्या व कॉम्प्यूटर सोसायटी ऑफ इंडिया सारख्या संस्थांना सहभागी करून घेऊन आम्ही प्रशिक्षण देतो.
उदाहरणार्थ आमचे अभियंत्यांसाठी व वाणिज्य शाखेच्या पदवीधरांसाठी असलेले कोर्सेस बघा. हे कोर्सेस ४ ते ५ आठवडे चालतात व त्यामुळे हे पदवीधर नोकरी करण्यासाठी तयार होतात. उद्योग व व्यावसायिक आस्थापनांमध्ये असलेल्या प्रत्यक्ष वातावरणात त्यांना प्रशिक्षण दिले जाते. उद्योगांना भेटी देण्याचे नियोजन केले जाते व तेथेही प्रशिक्षण दिले जाते. वाणिज्य शाखेतील पदवीधर अकौंटिंग, टॅली सोफ्टवेअर, आँडीटीन्ग वगैरेचा अभ्यास व सराव करतात. या प्रकारच्या प्रत्यक्ष अभ्यासामुळे आमचे विद्यार्थी नोकरीसाठीच्या मुलाखतींना आत्मविश्वासाने व अभ्यासपूर्ण रीतीने सामोरे जातात.
आमच्या आँटोमेशन कोर्समुळे अभियंत्यांना आँटोमेशन सिस्टीम व त्यासाठी वापरले जाणारे हार्डवेअर शिकायला मिळते.
विशिष्ट विषयाच्या तांत्रिक ज्ञानाबरोबरच आम्ही आमच्या कोर्सेस मध्ये व्यासायिक दृष्टीकोन व वागणुकीचे धडे देखील अंतर्भूत केले आहेत. आमच्या मते कोणत्याही नोकरीमध्ये योग्य दृष्टीकोन व नितीमुल्य खूप महत्वाची असतात व केस स्टडीज, रोल प्ले व परीक्षा यांच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना त्याची जाणीव करून देणे अत्यावश्यक ठरते. आमच्या सॉफ्ट स्कील मोड्यूल मुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास देखील वाढतो. संस्थेत प्लेसमेंट सेल असणार आहे त्यामुळे योग्य नोकरी शोधण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत मिळते.
आम्ही कौशल्य विकसित करणाऱ्या काही नामवंत संस्थांशी सहकार्य करार केले आहेत. त्यामुळे कौशल्य विकासाचे अत्यंत प्रगत असे आँटोमेशन, सी ए डी, सी ए एम, सी ए इ , सॉफ्ट स्कील्स आदी कोर्सेस आम्ही शिकवतो .
संभाव्य व्यावसायिक कुशल असतील व नोकरीतील नव्या अपेक्षांची पूर्तता करतील जसे:
* वेग हीच गुरुकिल्ली
* नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार
* अनलर्लिंग अँड रीलर्निंग
* मल्टीस्कीलिंग अँड मल्टीटास्किंग
ज्या या घडीच्या गरजा आहेत.
ए एम टी इन्स्टिट्यूट उद्योग व व्यवसाय क्षेत्रात प्रचंड अनुभव असलेल्या अधिकाऱ्यांच्या व्यवस्थापनाखाली व सहकार्याने कार्यरत आहे. आम्ही प्रचंड अनुभव असलेले प्रशिक्षक नेमतो. आम्ही उद्योग क्षेत्रातील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना व तज्ञ व्यावसायिकांना विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी आमंत्रित करतो. त्यामुळे उद्योग व व्यवसाय क्षेत्रात नेमकी कशाची गरज आहे याची विद्यार्थ्यांना माहिती होते.
थोडक्यात, ए एम टी स्कील एनहान्समेंट इन्स्टिट्यूट एल एल पी शासनाच्या ‘स्कील इंडिया ‘ मिशन मध्ये योगदान देईल व ‘हेल्दी इंडिया ‘ व ‘मेक इन इंडिया ‘ व डिजिटल इंडिया या उपक्रमांना पाठबळ देईल.
या पत्रकार परिषेद प्रसंगी व्यासपीठावर संदीप कारखानीस , निशिकांत अहिरे, दिलीप पाटील, पुर्वा अहिरे, सुरेंद्र पुजारी, दिनेश कोहक उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

ऍब्झॉर्बन्ट स्वच्छता उत्पादने बनवणाऱ्या नोबेल हायजीनचा आयपीओसाठी अर्ज दाखल

Nashik : नोबेल हायजीन लिमिटेड, आर्थिक वर्ष 2026 मधील प्युअर-प्ले (केवळ विशिष्ट उत्पादनांवर लक्ष...

read more
“ऑटोमेशन एक्स्पो 2026′  मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

“ऑटोमेशन एक्स्पो 2026′ मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

ऑटोमेशन एक्स्पो 2026 मध्ये तैवान एक्सलन्स पॅव्हेलियनमध्ये 22 पुरस्कारप्राप्त ब्रँड्स AI एज...

read more
Breaking News