आदिवासी पाड्यावर चिमुकल्यांसाठी भेटवस्तू घेऊन गेला वोक्हार्ट हॉस्पिटलचा सांता..

Dec 29, 2020

नाशिक – आरोग्य सेवेप्रमाणेच समाजसेवेतही सदैव अग्रेसर असणाऱ्या वोक्हार्ट हॉस्पिटलने परत एकदा समाजापुढे नवीन आदर्श मांडला आहे. सर्वत्र ख्रिसमस आणि नव वर्षाचे पर्व साजरे होत असतांना, वोक्हार्ट हॉस्पिटल नाशिक येथील कर्मचाऱ्यांच्या चमूने मोखाडा तालुक्यातील ‘चिंचुतारा’ या अगदी लहान आदिवासी पाड्यावर जाऊन तेथील स्थानिक आणि त्यांच्या लहान मुलांसोबत हे सण साजरे केले. सर्व कर्मचा-यांकडून कपडे, खेळणी, ब्लॅंकेट इत्यादी अशा अनेक वस्तू गोळा करून येथील चिमुकल्यांना संताद्वारे भेट करण्यात आल्या. शाळकरी लहान मुलांना वाह्या व पेन याचे वाटप करण्यात आले, त्यांना मिष्टान्न आणि खाद्य पदार्थ सुद्धा देण्यात आले. सांताला बघून चिमुकल्यांमधे आनंदाचे वातावरण होते आणि वयोवृद्धांनी सांता आपल्या आयुष्यात पहिल्यांदा बघितल्याची भावना व्यक्त केली.

या प्रसंगी बोलतांना वोक्हार्ट हॉस्पिटलचे मानव संसाधन प्रमुख श्री. देवेंद्र गायधनी म्हणाले या पाड्यावरील लोकांचे आजीवीकेचे साधन शेती, पशुपालन आणि मजुरी इतकेच आहे. पाड्यावरील लोकांपुढे स्वच्छ पाणी, पोषण आहार, पूरक उत्पन्न आणि आरोग्य या सर्वव्यापी समस्या आहे. या सर्व समस्या सोडविण्यासाठी या भागामध्ये ‘दिगंत स्वराज फाऊंडेशन’ ही सेवाभावी सामाजिक संस्था अविरतपणे काम करीत आहे, या संस्थेच्या संचालिका श्रीमती श्रद्धा श्रृंगारपुरे यांची या उपक्रमाला मोलाची साथ लाभली.

नाशिकच्या वोक्हार्ट हॉस्पिटल तर्फे प्रत्येक वर्षी हा उपक्रम एका अनाथाश्रमात जाऊन राबविला जातो, आम्ही या वर्षी काही नवीन करावयाचे ठरविले होते या संकल्पनेतून या पाड्यावर येऊन “बी अ सांता” हा उपक्रम राबविण्याचे निश्चित झाले. या आधी सुद्धा बाल सुधार आश्रमात सॅनीटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन बसवीणे आणी वृद्धाश्रमांना स्वास्थ्य संबंधी उपकरणे भेट देणे असे समाजोपयोगी उपक्रम वोक्हार्ट हॉस्पिटलच्या वतीने राबविण्यात आले आहेत. असे समाजोपयोगी उपक्रम येत्या काळात वोक्हार्ट हॉस्पिटलच्या वतीने सातत्याने राबविले जातील असे उद्गार विपणन प्रमुख श्री. संदीप वनमाळी यांनी या प्रसंगी काढले.

अजून बातम्या वाचा..

ऍब्झॉर्बन्ट स्वच्छता उत्पादने बनवणाऱ्या नोबेल हायजीनचा आयपीओसाठी अर्ज दाखल

Nashik : नोबेल हायजीन लिमिटेड, आर्थिक वर्ष 2026 मधील प्युअर-प्ले (केवळ विशिष्ट उत्पादनांवर लक्ष...

read more
“ऑटोमेशन एक्स्पो 2026′  मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

“ऑटोमेशन एक्स्पो 2026′ मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

ऑटोमेशन एक्स्पो 2026 मध्ये तैवान एक्सलन्स पॅव्हेलियनमध्ये 22 पुरस्कारप्राप्त ब्रँड्स AI एज...

read more
Breaking News