ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई) नवी दिल्ली भारत सरकार व कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सी आय आय ) यांच्या सर्वेक्षणात नाशिक येथील एमइटी भुजबळ नॉलेज सिटी चे फार्मसी कॉलेजला २०१७, २०१८ नंतर २०२० या वर्षा करिता तिसऱ्यांदा सर्वोत्तम अशा प्लॅटिनियम दर्जाने गौरवविण्यात आले. नाशिक परिसरातील फार्मसी विभागातून प्लॅटिनियम दर्जाचे हे एकमेव कॉलेज आहे.
एआयसीटीई-सीआयआय तांत्रिक संस्थांचे सर्वेक्षण हे तंत्र शिक्षण कॉलेज्यांची इंडस्ट्रीशी असलेले समन्वय त्यात विद्यार्थ्यांना भविष्याकरीता उपयुक्त असे रोजगार, नॊकरी, व्यवसाय, प्रोजेक्ट, ट्रैनिंग, प्लेसमेंट, सर्टिफिकेट कोर्सेस या व इतर बाबींवर करण्यात येते.
या सर्वेक्षणाचा उद्देश फार्मसी, अभियांत्रिकी, व्यवस्थापन आणि आर्किटेक्चरच्या अशा एआयसीटीई मान्यताप्राप्त तांत्रिक संस्थांमधील उद्योग भागीदारीचे उत्तम सराव दर्शविणे हा आहे.
या सर्व प्रकारचे उपक्रम एमइटी भुजबळ नॉलेज सिटी फार्मसी कॉलेजला कार्यान्वित असून त्या अंतर्गत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध विद्यापीठ व इंडस्ट्री यांसोबत एकूण ११ सामंजस्य करार (एम ओ यू ) साकारले आहेत
ट्रेनिंग प्लेसमेंट विभाग, फार्मसी उच्च शिक्षण मार्गदर्शन व समुपदेशन (फार मॅक्स ) विभाग कार्यान्वित करण्यात आले आहेत अशी माहिती प्राचार्य डॉ. संजय क्षीरसागर यांनी दिली.
मेट भुजबळ नॉलेज सिटी चे विश्वस्त, मुख्य प्रशासक सौ. शेफाली भुजबळ तसेच मेट चे पदाधिकारी यांनी कॉलेज, शिक्षक व शिक्षकतेर कर्मचाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन केले. या गौरवामुळे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.



