नाशिक ऍग्रो डीलर्स असोशिएशन (नाडा ) नाशिक च्या अध्यक्षपदी विजयनाना पाटील यांची निवड

Feb 27, 2021

नाशिक : नाशिक ऍग्रो डीलर्स असोशिएशन (नाडा ) ह्या संस्थेचे अध्यक्ष भगवाननाना खैरनार ह्यांचे निधन झाल्यामुळे नाडा कार्यकारिणीच्या मिटिंग मध्ये कै भगवाननाना खैरनार ह्यांना श्रद्धांजली अर्पण करून मिटिंग मध्ये कृषी निविष्ठा विक्रेते तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्या साठी अनुभवी आणि खंबीर नेतृत्व म्हणून कार्यकारिणीच्या सदस्यांनी एकमताने नाडाचे संस्थापक अध्यक्ष विजयनाना पाटील यांच्या कडे कार्यभार सोपविण्याचा निर्णय घेतला. ह्या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष अरुण मुळाने, सरचिटणीस लक्ष्मीकांत जगताप, खजिनदार मंगेश तांबट, सुनील पाटील, चंद्रकांत ठक्कर, विनोदशेठ खिवंसरा, रामभाऊ जाधव, जयराज पाटील आदी उपस्थित होते

अजून बातम्या वाचा..

Breaking News