गुरुगोविंद सिंग तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्यू द्वारे नामांकित कंपनीत निवड

Mar 27, 2021

गुरुगोविंद सिंग तंत्रनिकेतन नाशिक येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कॅम्पस प्लेसमेंट आयोजित करण्यात आले त्यामध्ये प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात आली.
 
गुरुगोविंद सिंग तंत्रनिकेतन नाशिक येथे रिलायबल ऑटोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
रिलायबल ऑटोमॅटिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे जयंत खेडेकर, ऑपरेशन प्रमुख डिफेन्स डिव्हिजन; राकेश जांगले, एच आर; कमलेश खैरनार आणि अनघा गूगले आदी उपस्थित होते. जयंत खेडेकर यांनी कंपनीचे प्रेझेंटेशन विद्यार्थ्यांसमोर सादर केले व विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. त्यानंतर लेखी परीक्षा घेण्यात आली त्यामध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची मुलाखत सुद्धा घेण्यात आली. लेखी परीक्षा आणि प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
 गुरुगोविंद सिंग तंत्रनिकेतन मधील स्किल डेव्हलपमेंट सेंटर , बॉश,  सिमेंस,  मेकॅट्रॉनिक्‍स, तसेच सीएनसी सेंटर, सेट- कॉम, इंडस्ट्री संलग्न प्रयोगशाळेमध्ये मिळालेल्या औद्योगिक प्रशिक्षणाचा फायदा मुलाखतीमध्ये झाला असे निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी सांगितले. तसेच पॉलीटेक्निक हा शिक्षणाचा एक उत्तम पर्याय आहे ज्यामध्ये शिक्षण संपताच तुमच्या हातामध्ये नोकरीचा पर्याय उपलब्ध असतो.
गुरु गोविंद सिंग फौंडेशनचे सिइओ माननीय परमिंदुर सिंग यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच प्राचार्य श्री श्रीहरी उपासनी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.प्रा. मधुकर दुबे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी व त्यांची सहकारी टीम  तसेच विभाग प्रमुख प्रा. विलास ढगाटे आणि शिक्षक वृंद यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

अजून बातम्या वाचा..

ऍब्झॉर्बन्ट स्वच्छता उत्पादने बनवणाऱ्या नोबेल हायजीनचा आयपीओसाठी अर्ज दाखल

Nashik : नोबेल हायजीन लिमिटेड, आर्थिक वर्ष 2026 मधील प्युअर-प्ले (केवळ विशिष्ट उत्पादनांवर लक्ष...

read more
“ऑटोमेशन एक्स्पो 2026′  मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

“ऑटोमेशन एक्स्पो 2026′ मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

ऑटोमेशन एक्स्पो 2026 मध्ये तैवान एक्सलन्स पॅव्हेलियनमध्ये 22 पुरस्कारप्राप्त ब्रँड्स AI एज...

read more
Breaking News