सोनी पिक्‍चर्स नेटवर्क्‍सचा सेट्रीज सोबत सहयोग ; ८००० हून अधिक रोपट्यांचे वृक्षारोपण

Apr 24, 2021

नाशिक  : आपल्‍या सीएसआर कटिबद्धतेचा भाग म्‍हणून सोनी पिक्‍चर्स नेटवर्क्‍स इंडियाने (एसपीएन) वृक्षारोपण प्रयत्‍नांना पाठिंबा देण्‍यासाठी स्‍वयंसेवी संस्‍था सेट्रीज सोबत सहयोग केला आहे. एसपीएन व सेट्रीज यांनी सहयोगाने महाराष्‍ट्राच्‍या दुष्‍काळग्रस्‍त सातारा जिल्‍ह्यामधील तीन एकर जमिनीवर घनदाट वनीकरणाच्‍या माध्‍यमातून ८००० हून अधिक विविध रोपट्यांच्‍या स्‍थानिक प्रजातींची लागवड केली आहे. या रोपटांची लवकरच वाढ होऊन तेथे एक नैसर्गिक हरित आच्‍छादन बनेल. या प्रकल्‍पाचा पर्यावरणीय स्थिरता आणि वातावरणीय बदलाचा सामना करत जीवनाचा दर्जा सुधारण्‍यावर भर आहे. सेट्रीज सोबतचा सहयोग सोनी पिक्‍चर्स नेटवर्क्‍स इंडियाच्‍या या पर्यावरण व भूमातेचे संरक्षण करण्‍यासह पर्यावरणाचे संवर्धन करण्‍याच्‍या महत्त्वाबाबत इतरांना जागृत करण्‍याच्‍या थोर कार्याला अधिक प्रगतीपथावर घेऊन जातो. हा वृक्षारोपण प्रकल्‍प काळजी घेईल की, लागवड करण्‍यात आलेल्‍या प्रत्‍येक रोपट्याकडे आवर्जून व वैयक्तिक लक्ष दिले जाईल आणि वृक्षाची वाढ व पर्यावरणाच्‍या संवर्धनाला चालना देण्‍यासाठी सुयोग्‍य जागा मिळेल.  

अजून बातम्या वाचा..

Breaking News