रियलमी ने रियलमी जीटी ५जी स्मार्टफोन सहीत भारतात पहिला रियलमी बुक (स्लिम) लॅपटॉप लाँच केला

Aug 20, 2021

नाशिक:5जी  सक्षम स्मार्टफोन लॉन्च करणारा भारताचा पहिला ब्रँड आणि भारताचा सर्वात वेगाने वाढणारा तंत्रज्ञान ब्रँड, रियलमी ने आज आपली फ्लॅगशिप किलर मालिका, रियलमी जीटी ५ जी मालिका सादर केली, ज्यात दोन अप्रतिम  ५जी  स्मार्टफोन – रियलमी जीटी ५जी आणि रियलमी जीटी मास्टर एडिशन  ५जी , आणि त्यांचा पहिला  लॅपटॉप, रियलमी बुक (स्लिम) लाँच केले.ऑटो उद्योगाच्या क्लासिक ग्रँड टूररने प्रेरित होऊन, रियलमी जीटी ५जी मालिका अत्यंत वेगवान, मास्टर डिझाईन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे, ज्यामुळे जुन्या स्थितीत सुधारणा येऊन, भारतीय ग्राहकांसाठी तंत्रज्ञानाचे नवीन बेंचमार्क बनले आहे. रियलमी, केवळ सर्वोत्तम सेवा देते, रियलमी जीटी ५जी मालिका, प्रीमियम सेगमेंटमधील स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी व्यापक अनुभवाचे वचन देते आणि रियलमीच्या ट्रेंडसेटींग तंत्रज्ञान आणि डिझाइनच्या उत्कृष्ट जीनसह सुपर-पॉवरेड ५जी , एक नवीनतम अनुभव देते. दुसरीकडे रियलमीचा अप्रतिम रियलमी बुक (स्लिम), शक्तिशाली हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचे परिपूर्ण मिश्रण आहे आणि या स्तराच्या लॅपटॉप मधला सर्वात हलका आणि स्लिम लॅपटॉप आहेलॉन्चवर प्रतिक्रिया देताना, श्री माधव शेठउपाध्यक्षरियलमी आणि मुख्य कार्यकारी अधिकारीरियलमी इंडिया आणि युरोप म्हणाले, आमचे ग्राहक सर्वोत्तम ५जी अनुभवासाठी पात्र आहेत असा, ५ जी लीडर आणि जगातील सर्वात वेगाने वाढणारा स्मार्टफोन ब्रँड म्हणून, रियलमी चा विश्वास आहे, आणि त्यासाठी ५ जी  सर्वोत्तम-इन-क्लास स्मार्टफोन वैशिष्ट्यांसह भविष्यासाठी तयार करणे हे आमचे ध्येय आहे. रियलमी जीटी  ५जी मालिका, हे त्याच दिशेने उचललेले अजून एक पाऊल आहे ज्याद्वारे आम्ही दोन आश्चर्यकारक ५ जी  स्मार्टफोन आणत आहोत – रियलमी जीटी ५जी  आणि रियलमी जीटी मास्टर एडिशन ५जी. आम्ही २०२१ मध्ये मोठ्या आणि धाडसी स्वप्नांसह पाऊल ठेवले आहे आम्ही सर्वोत्तम श्रेणीतील तंत्रज्ञान आणि नाविन्य-आधारित ऑफरसह प्रीमियम सेगमेंटमध्ये खळबळ माजवण्यास तयार आहोत.”“तसेच, आमच्या ‘१+५+टी ’धोरणाचा सर्वात महत्वाचा भाग, आमचा पहिला लॅपटॉप – रियलमी बुक (स्लिम) सादर करण्यासाठी आम्ही अत्यंत उत्साहित आहोत. आपल्या कामात आणि सर्जनशीलतेमध्ये लॅपटॉप सर्वोत्तम साथीदार आहेत. रियलमी बुक (स्लिम) सह, आम्ही आमच्या चाहत्यांना त्याच्या किंमतीच्या विभागात सर्वोत्तम प्रदर्शन, डिझाइन आणि उत्कृष्ट तंत्रज्ञान प्रदान करत आहोत. रियलमी चे उद्दिष्ट भारताचा नंबर १ ऑनलाइन लॅपटॉप ब्रँड बनण्याचे आहे आणि रियलमी बुक (स्लिम)  हे त्या दिशेने आमचे पहिले मोठे पाऊल आहे,” असे श्री माधव शेठ पुढे म्हणाले.रियलमी जीटी ५जी , ६५ डब्ल्यु सुपर-डार्ट चार्ज आणि ४५०० एमएएच च्या मोठ्या बॅटरीसह येतो स्मार्टफोनमध्ये ६४ एमपी सोनी ट्रिपल कॅमेरा आहे ज्यामध्ये नवीन सुधारित मल्टी-फ्रेम सिन्थेसिस अल्गोरिदम आहे जो १०८ एमपीच्या जवळ स्पष्टता देतो आणि सोनी १६ एमपी सह येतो. त्याची स्टेनलेस स्टील वेपर कुलिंग  सिस्टीम, पारंपारिक तांबे व्हीसी कूलिंग सिस्टीमच्या तुलनेत ४२ टाके जास्त शक्ती प्रदान करते. मल्टी-लेयर ३ डी ग्रेफाइट थर्मल कंडक्शन आणि कोर घटकांच्या १०० टक्के कव्हरेजसह, रियलमी जीटी ५जी मध्ये मोठ्या प्रमाणात सुधारित शीतकरण कार्यक्षमता आहे आणि गेमर्ससाठी फ्लॅगशिप गेमिंग अनुभव देऊ शकते. रियलमी जीटी ५जी मध्ये उद्योगातील, सर्वात मोठे डायनॅमिक रॅम एक्स्पान्शन तंत्रज्ञान आहे, ग्राहकांना, ७ जीबी एकस्पांडेबल रॅम असल्यामुळे, १९ जीबी पर्यंतचा अनुभव घेता येतो.रियलमी जीटी ५जी , दोन डायनॅमिक रंगांमध्ये उपलब्ध असेल – डॅशिंग सिल्व्हर आणि डॅशिंग ब्लू, ८जीबी + १२८जीबी  स्टोरेज व्हेरिएंटमध्ये, ड्युअल टोन वेगन लेदर डिझाईन व्हेरिएंट, रेसिंग यलो, मधे असलेल्या या फोनची किंमत ३७,९९९ रुपये असेल, तसेच, १२जीबी + २५६जीबी  स्टोरेज व्हेरिएंटमध्ये ची किंमत ४१,९९९ रुपये असेल. पहिली विक्री २५ ऑगस्ट, दुपारी १२ नंतर realme.com, फ्लिपकार्ट आणि मेनलाइन चॅनेलवर होणार आहे.रियलमी जीटी मास्टर  एडिशन ५जी  ६५डब्ल्यु  सुपर-डार्ट सह येतो. या स्मार्टफोनचे वजन फक्त १७४ ग्रॅम आहे आणि जगातील प्रथम स्ट्रीट फोटोग्राफी मोड आहे. हा फोन ३२ एमपी सोनी सेल्फी कॅमेरा आणि सोनी सेन्सरसह सुसज्ज आहे; ज्यामुळे फोटोची गुणवत्ता वाढून आणि उच्च रिझोल्यूशन मिळते, आणि प्रत्येक सेल्फी सुपर शार्प बनते. ह्या फोन मधे बुद्धिमान समायोजन दृष्टिकोन, सिस्टम संसाधनांचे एकत्रित नियंत्रण आणि विशिष्ट परिदृश्य ऑप्टिमायझेश आहे ज्यामुळे एक विलक्षण गेमिंग अनुभव मिळतो. व्हॉयेजर ग्रे, लुना व्हाइट आणि कॉसमॉस ब्लॅक, अश्या तीन अप्रतिम रंगांमध्ये हे फोन उपलब्ध होतील. तीन  स्टोरेज प्रकारांमध्ये, ६जीबी + १२८जीबी , ८जीबी + १२८ जीबी आणि ८+ २५६जीबी मध्ये उपलब्ध असलेल्या या फोनची किंमत अनुक्रमे २५,९९९ रुपये २७,९९९ रुपये आणि २९,९९९ रुपये असणार आहे. पहिली विक्री २६ ऑगस्ट, दुपारी १२ नंतर रियलमी.com, फ्लिपकार्ट आणि मेनलाइन चॅनेलवर होणार आहे.रियलमी बुक (स्लिम)  सर्व बॉक्स चेक करते आणि यात नवीन ११ वी Gen Intelcore™ i5 आणि i3 प्रोसेसर आहेत. रियलमी बुक (स्लिम)  २१६०  x १४४० च्या रिझोल्यूशनसह येतो ज्याचा  डिस्प्ले सामान्य १०८०पी स्क्रीनच्या पिक्सेल संख्येच्या दीड पट आहे. १४ इंची स्क्रीन सोबत चांगली पोर्टेबिलिटी आणि दृश्यमानतेचे उत्तम संतुलन देते. त्याचबरोबर पारंपारिक १६:१० किंवा १६:९ स्क्रीनच्या तुलनेत, जे मायक्रोसॉफ्ट ऑफिस सॉफ्टवेअरमध्ये अधिक माहिती दर्शवू शकतात, ३:२ चा स्क्रीन रेशियो देखील देते. रियलमी बुक (स्लिम)  फक्त १४.९ मिलीमीटर जाड आहे आणि त्याचे वजन जेमतेम १.३८ किलोग्राम आहे. संपूर्ण धातूने बनलेले आहे.  आणि ते सर्व धातूच्या शरीरासह येते. मायक्रोसॉफ्ट ऑफिस २०१९ सह, विंडोज १० होम एडिशन, लॅपटॉप मध्ये प्रीलोडेड आहे.

अजून बातम्या वाचा..

ऍब्झॉर्बन्ट स्वच्छता उत्पादने बनवणाऱ्या नोबेल हायजीनचा आयपीओसाठी अर्ज दाखल

Nashik : नोबेल हायजीन लिमिटेड, आर्थिक वर्ष 2026 मधील प्युअर-प्ले (केवळ विशिष्ट उत्पादनांवर लक्ष...

read more
“ऑटोमेशन एक्स्पो 2026′  मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

“ऑटोमेशन एक्स्पो 2026′ मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

ऑटोमेशन एक्स्पो 2026 मध्ये तैवान एक्सलन्स पॅव्हेलियनमध्ये 22 पुरस्कारप्राप्त ब्रँड्स AI एज...

read more
Breaking News