एचडीएफसी बँकेच्या #Parivartan च्या उपक्रमांनी २०२१-२१ मध्ये महाराष्ट्रातील ५४.०२ लाखांहून अधिक लोकांचे जीवन प्रभावित केले

Aug 22, 2021

मुंबई : एचडीएफसी बँकेकडून हाती घेण्यात येणा-या सर्व सामाजिक उपक्रमांचा समावेश असलेल्या एचडीएफसी #Parivartan या सर्वसमावेशक कार्यक्रमाने वर्ष २०२०-२१ मध्ये महाराष्ट्रातील ५४.०२ लाख लोकांच्या आयुष्यांवर सकारात्मक प्रभाव टाकला आहे. या कार्यक्रमांतर्गत बँक सातारा, अकोला, नागपूर, भंडारा, नांदेड, पुणे, अहमदनगर, जळगाव, परभणी, यवतमाळ, वर्धा, नाशिक, वाशिम, धुळे, उस्मानाबाद, नंदुरबार, जालना, हिंगोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांतील २५४ गावांपर्यंत बँकेचे उपक्रम पोहोचले आहेत. वाढ, विकास आणि सबलीकरणाची कास धरत देशभरातील आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या वंचित गटाला मुख्य प्रवाहात आणणे हे #Parivartan चे लक्ष्य आहे. एचडीएफसी बँकेने #Parivartan च्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर ६३४.९१ कोटी रुपये खर्च केले आहेत २०२०-२१मध्ये सीएसआर उपक्रमांवर सर्वाधिक खर्च करणा-या भारतीय कंपन्यांपैकी ती एक ठरली आहे. या खर्चाचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत १८.५ टक्‍के अधिक होते. 

गेल्या वर्षीच्या तुलनेत #Parivartan आणखी ७ लाख लोकांपर्यंत पोहोचले

महाराष्ट्रातील परिवर्तनची ठळक वैशिष्ट्ये:

“विविध सहयोगांच्या माध्यमातून शाश्वत परिसंस्था विकसित करण्याप्रती कटिबद्ध राहत, समुदायांचा विकास घडवून आणण्याचे, त्यांना प्रगत बनविण्याचे कार्य हाती घेतलेल्या कार्यक्रमांची निवड करून त्यांना पाठबळ देतो.”  एचडीएफसी बँकेचे ब्रांच बँकिंग विभागाचे प्रमुख श्री. अनिल भवनानी म्हणाले, “बँक, सीएसआर विभाग आणि सहयोगी स्वयंसेवी संस्था यांच्या टीम एकमेकांच्या निकटसंपर्कात राहून काम करतात व कोणत्या भागांतील, कोणत्या ठिकाणी, कोणत्या लोकांबरोबर काम करता येईल याचा शोध घेतात. यामुळे अत्यंत निकडीचे प्रश्न सोडविण्याच्या काम हाती घेण्यास मदत होते. आमच्या कार्यक्रमाचे स्वरूप हे सर्वसमावेशक असले तरीही राज्याला ज्या उपक्रमांतून सर्वाधिक लाभ पोहोचला अशा उपक्रमांअंतर्गत १.५४ लाखांहून अधिक आर्थिक साक्षरता व समावेशकता शिबिरांचा समावेश होता. १२.०७ लाखांहून अधिक लोकांना या उपक्रमांचा फायदा झाला व ६०,३८० महिला उद्योजक आणि १४,०३० युवकांना त्यातून कौशल्य प्रशिक्षण तसेच उदरनिर्वाहाचा अधिक चांगला मार्ग मिळाला.”

अजून बातम्या वाचा..

ऍब्झॉर्बन्ट स्वच्छता उत्पादने बनवणाऱ्या नोबेल हायजीनचा आयपीओसाठी अर्ज दाखल

Nashik : नोबेल हायजीन लिमिटेड, आर्थिक वर्ष 2026 मधील प्युअर-प्ले (केवळ विशिष्ट उत्पादनांवर लक्ष...

read more
“ऑटोमेशन एक्स्पो 2026′  मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

“ऑटोमेशन एक्स्पो 2026′ मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे 22 ते 25 जुलै दरम्यान आयोजित

ऑटोमेशन एक्स्पो 2026 मध्ये तैवान एक्सलन्स पॅव्हेलियनमध्ये 22 पुरस्कारप्राप्त ब्रँड्स AI एज...

read more
Breaking News